Tuesday 15 May 2018

टोपी रवा डोसा / Cone Shape Rawa Dosa



साहित्य :
१/२ वाटी रवा
१ वाटी तांदळाचे पीठ
१/४ वाटी मैदा
१/४ वाटी दही
१ कांदा बारीक चिरून
१ इंच आले किसून
कोथिंबीर बारीक चिरून
२ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
१/४ कप फ्रोजन वाटणे (ऐच्छिक )
मीठ चवीनुसार
जिरे
तेल
पाणी

कृती:

रवा डोशाचे पीठ

१. रवा , तांदळाचे पीठ, मैदा एकत्र करून घ्या .
२. त्यात दही आणि गरजेपुरते पाणी घालून डोशासाठीचे पीठ बनवून घ्या .
राव डोशाचे पीठ थोडे पातळ केल्यास जाळी छान पडते .
३. चवीनुसार मीठ घाला .
४. बारीक चिरलेला कांदा , कोथिंबीर , २ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या , वाटणे , जिरे, आल्याची पेस्ट / किसलेले आले घालून एकजीव करा .
५. हे पीठ १/२ तास ठेवून द्या .

रवा डोसा करण्याची कृती 

१. गरम झालेल्या नॉनस्टिक पॅनला कापलेल्या कांद्याने तेल पसरून घ्या .
२. पळीने किंवा मोठ्या वाटीने डोशाचे पीठ तव्यावर ओतून घ्या . पीठ पातळ असल्याने वाटीच्या खालच्या बाजूने फिरवण्याची गरज नाही. ते तवाभर पसरेल .

३. मध्यम गॅसवर साधारण १ ते १/२ मिनिटात डोसा भाजून होईल आणि तळव्यापासून वेगळा होईल .
४. ओल्या नारळाच्या चटणीसोबत गरम गरम डोसा सर्व्ह करा .

टोपी / कोन डोशाची कृती :


१. गरम झालेल्या नॉनस्टिक पॅनला कापलेल्या कांद्याने तेल पसरून घ्या . 
२. पळीने किंवा मोठ्या वाटीने डोशाचे पीठ तव्यावर ओतून घ्या . पीठ पातळ असल्याने वाटीच्या खालच्या बाजूने फिरवण्याची गरज नाही. ते तवाभर पसरेल . 
३. मध्यम गॅसवर साधारण १ ते १/२ मिनिटात डोसा भाजून होईल आणि तळव्यापासून वेगळा होईल . 
४. एका बाजूने मध्यापर्यंत डोश्याला चाकूने / कात्रीने  कापून घ्या . 

५. कापलेल्या बाजूने डोसा तव्यातच टोपीसारखा रोल करून घ्या . 

६. रोल करण्याआधी वरून शेंगदाणा चटणी लावल्यास चव छान येते . 

७. ओल्या नारळाच्या चटणीसोबत सर्व्ह करा . 
टीप : डोशाची टोपी करण्यासाठी तो पूर्ण भाजून कुरकुरीत झाला पाहिजे . अन्यथा बाजू एकमेकास चिकटून टोपी बनत नाही . 

Ingredients:

1/2 cups of semolina
1 cup rice flour
1/4 cup all purpose flour
1/4 cup curd
1 onion finely chopped
Chopped green chillies 2
1 tsp ginger paste
Coriander chopped finely
 1/4 cup green peas frozen (optional)
Salt to taste
Cumin seeds
Oil
Water

Recipe :

Rava dosa batter

1. Mix semolina, rice flour, all purpose flour together.
2. Add curd and water to make a dosa batter.
Make batter thin and watery to get nice net texture .  
3. Add salt to taste.
4. Add finely chopped onion, chopped coriander, 2 finely chopped green chillies, green peas, cumin seeds, ginger paste / grated ginger.
5. Keep this flour for 1/2 hours.

How to make Rava dosa

After 1/2 hour
1. Spread the oil on a heated nonstick pan with the onion.
2. Pour the batter into a pan with a big bowl. As the batteris thin, do not need to rotate on with the lower side of the bowl. It spreads well.
3. On medium heat, the dosa will roast in around 1 to 1/2 minutes and will separate from the pan.
4. Serve hot with fresh coconut chutney.

Cone shape rawa dosa :

1. Spread the oil on a chopped nonstick pan with the onion cut.
2. Pour the dough into a pan with a bowl or big bowl. Because the flour is thin, do not need to rotate on the lower side of the bowl. It spreads a whirlwind.
3. On medium heat, the dosa will roast around 1 to 1/2 minutes and will separate from the pan.

4. Cut the dosa with knife / scissor from one side edge to center.
5. Roll it on the cut side to form a cone.
6. Before rolling, spread roasted peanut chutney . It tastes nice with dosa.
7. Serve fresh with coconut chutney.

Note: To mold a cone, dosa should be roasted full crisp. Otherwise the sides sticks to each other and it can not form proper cone shape .

~ अमृता .. 

No comments:

Post a Comment

Popular Posts