Wednesday 2 May 2018

गव्हाचे बटर कुकीज / Eggless wheat butter cookies


साहित्य :

२ कप  गव्हाचे पीठ
१/२ कप बटर
४ वेलदोडे पावडर
१/२ कप साखर
३ चमचे लिक्विड चॉकलेट ( ऐच्छिक )
सहवटीसाठी बडीशेपच्या गोळ्या
मीठ

कृती :

कणिक भिजवणे :

१. एका भांड्यात बटर गरम करा .
२. त्यात १/२ कप साखर घालून हलवून विरघळू द्या .
३. एका मोठ्या बाउल मध्ये गव्हाचे पीठ घ्या .
४. त्यात लिक्विड चॉकलेट , वेलदोडे पावडर आणि साखर घातलेले बटर घाला .
५. हाताने मळून घ्या .
६. मळताना वरून गरजेप्रमाणे थंड दूध घाला .
७. १५ मिनिट कणिक झाकून ठेवा .


बेकिंग :


१. इडली पात्राच्या तळाशी २ वाट्या मीठ घाला .
२. इडली पात्र झाकण लावून १५ मिनिट मोठ्या गॅसवर प्रीहीट करून घ्या .
३. इडली पात्राच्या स्टँडच्या प्रत्येक खोलगट भागास बटर लावून घ्या .
४. मळलेल्या कणकेचा छोटा गोळा घेऊन हवा तो आकार द्या .
५. इडली पात्राच्या स्टॅण्डमध्ये ठेवून द्या .
६. सजावटीसाठी बडीशेप गोळ्या लावा .
७. आता हे स्टॅन्ड प्रीहीट केलेल्या इडली पात्रात ठेवा . झाकणी  लावा .
८. मंद आचेवर २० मिनिटे ठेवून द्या .
९. २० मिनिटांनी गॅस बंद करा .
१०.  ५ मिनिटांनी इडली स्टॅन्ड बाहेर काढून कुकीस थंड होऊ द्या .


 Ingredients:

2 cups wheat flour
1/2 cup butter
4 green cardamom powder
1/2 cup sugar
3 spoon liquid chocolate (optional)
Salt
For decoration : colored mini sprinkles

Recipe:

Make a dough :

1. Heat the butter in a bowl.
2. Add 1/2 cup sugar to it and stir it .  Let it dissolve.
3. Take wheat flour in a large bowl.
4. Add liquefied chocolate, green cardamom powder and butter.
5. Mix it with hands and start making dough.
6. When making dough , add cold milk as needed.
7. Cookies dough should be soft
8. Cover dough for the 15-minute .

Baking cookies :


1. Spread 2 cups of salt on the bottom of the idli maker.
2. Cover it with lit and preheat it for 15 minutes.
3. Apply a butter on each holder of the idli maker stand.
4. Make a small ball of dough and shape it as you wish.
5. Put it in Idli Patra's stand.
6. Spread colored mini sprinkles for decoration.
7. Now place this stand in preheat idli maker. Cover with lit.
8. Keep on low flame for 20 minutes .
9. Off gas in 20 minutes.
10. Take out the idli stand from maker in 5 minutes and let the cookies cool down.

~ अमृता ..


No comments:

Post a Comment

Popular Posts