Sunday 6 May 2018

जिरा राईस / Jeera Rice

करायला सोप्पं , कमी वेळखाऊ आणि सगळ्यांना आवडणारा भाताचा प्रकार म्हणजे जिरा राईस . पण तो सुटसुटीत झाला आणि चवीला छान लागला तरच मजा 

जिरा राईस करण्याच्या २ पद्धती आहेत 
एक म्हणजे उकळत्या पाण्यात तांदूळ घालून ८०% शिजवून पूर्ण निथळून घेणे 
किंवा 
तांदूळ भाजून त्यात गरम पाणी घालून भात शिजवणे 

हि रेसिपी तांदूळ भाजून शिजवून केलेल्या जिरा राईस ची आहे . 

तळलेल्या कांद्याच्या रेसिपीसाठी इथे क्लीक करा .



साहीत्य :  
१/२ किलो मोठा बासमती तांदूळ
जिरे
तेल , मीठ
२ लवंग, १/२ इंच दालचिनी

कृती :

१. तांदूळ धुवून त्यातील पाणी काढून १/२ तास तसाच ठेवा .
२. एका भांड्यात ४ चमचे तेल गरम करा .
३. त्यात जिरे , लवंग , दालचिनी घाला .
४. धुतलेला तांदूळ घालून पूर्ण भाजून घ्या . तांदूळ पूर्ण भाजला की तो सुट्टा  आणि हलका होतो .
५. तांदळाच्या दीड पट गरम पाणी घाला .
६. चवीनुसार मीठ घाला .
७. भाताला मोठ्या आचेवर एक उकळी येऊ द्या  आणि गॅस मंद करा  आणि झाकण लावून द्या .
८. साधारण ५ मिनिटात भात शिजेल .  
९. सर्व्ह करताना वरून तळलेला कांदा आणि  चिरलेली कोथिंबीर घाला .
तळलेल्या कांद्याच्या रेसिपीसाठी इथे क्लीक करा .

~ अमृता ..
  

No comments:

Post a Comment

Popular Posts