Sunday 24 June 2018

चिकन काला / Chicken kala





साहीत्य :

मसाल्यासाठी : 

१ कांदा कापून
५ हिरव्या मिरच्या
२ लवंग
१ इंच दालचिनी
१ तमालपत्र
३ वेलदोडे
६ लसणाच्या पाकळ्या
२ इंच आले
पुदिना कापून
कोथिंबीर कापून
हिरव्या मिरच्यांची उभे काप
१ चमचा  गरम मसाला , धने पावडर , जिरे पावडर ,
मीठ
हळद ,
२ चमचा  लाल मिरची पावडर ,
१ मोठा बाऊल दही
१ लिंबाचा रस

चिकन १/२ किलो
तळलेल्या कांद्यासाठी  ७ ते ८ मोठे कांदे

कृती :

चिकन मॅरीनेट
१. साहित्यामध्ये दिलेला खडा मसाला (लवंग, दालचिनी , तमालपत्र , वेलदोडे ), १ मोठा कापलेला कांदा , लसूण ,आले , ५ हिरव्या मिरच्या , १/२ लिंबाचा रस एकत्र घरून घ्यावे . 
२.  मिक्सरमधून त्याची पेस्ट करून घ्या . 
३. एका मोठ्या भांड्यात चिकन स्वच्छ धुवून , आवश्यक त्या आकारात काप करून घ्या . 
४. त्यामध्ये वरील पेस्ट घाला. 
५. १ मोठा बाऊल दही घाला . ४  चमचे कच्चे तेल घाला . 
६. चवीनुसार मीठ , प्रत्येकी १ चमचा गरम मसाला, धने पावडर , जिरे पावडर , १/२ चमचा हळद, २ चमचे लाल मिरची पावडर घाला .  
७. बारीक कापलेली पुदिन्याची पाने , बारीक कापलेली  कोथिंबीर , उभ्या कापलेल्या हिरव्या मिरच्या घाला . (पुदिना आणि कोथिंबीरच्या मध्यम आकाराच्या पेंडीपैकी साधारण अर्धी पेंडी मॅरीनेट करताना वापरावी . )
८. मिश्रण एकजीव करून पूर्ण १ रात्र मॅरीनेट होण्यास फ्रिजमध्ये ठेवून द्या. 

चिकन शिजताना त्यामध्ये पाणी घालण्याची अजिबात गरज नाही . नुसत्या मसाल्याच्या सुटलेल्या पाण्यावर पूर्ण चिकन शिजून निघते . 

१. पूर्ण १ रात्र चिकन मॅरीनेट केल्यामुळे सगळ्या मसाल्याची चव चिकनमध्ये उतरते . 
२.  मॅरीनेट केलेलं चिकन सकाळी फ्रिजमधून बाहेर काढून १/२ तास ठेवून द्या . 
३. जाड बुडाच्या भांड्यात हे मिश्रण घाला . 
४. हे चिकन १० मिनिट मोठ्या आचेवर शिजू द्या    . 
५. आच मंद करून साधारण १/२ तास त्याला शिजवा . 
६. शिजताना मध्ये मध्ये हलवत राहा . त्यामुळे सगळ्या बाजूने छान शिजेल . 
८. चिकन शिजत आले की त्यात तळलेला कांदा (३ ते ४ माध्यम आकाराचे कांदे ) घालून अजून ५ मिनिट शिजवून घ्या .

तळलेला कांदा भरपूर घातल्याने याला काळसर रंग येतो आणि चवही नेहमीच्या चिकन पेक्षा झणझणीत लागते

~ अमृता ..   

No comments:

Post a Comment

Popular Posts