Friday 29 June 2018

साबुदाणा वडा / Sabudaba Vada /Tapioca



साहित्य :
३ मोठे बटाटे उकडून 
१ कप साबुदाणे 
१/२ कप शेंगदाणे 
मीठ,जिरे
४ हिरव्या मिरच्या / लाल मिरची पावडर
कढीपत्ता , कोथिंबीर (ऐच्छिक )  

कृती :

१. २ मोठे बटाटे उकडून घ्या .
२. थंड झाल्यावर साले काढून मॅश करून घ्या .
३. १/२ कप शेंगदाणे भाजून , सोलून त्याचा कूट करून घ्या . शेंगदाण्याचा कूट एकदम बारीक करावा अन्यथा मोठ्या कणांमुळे वडे तळताना फुटतात.
४. ४ हिरव्या मिरच्या आणि १ चमचा जिरे मिक्सरमधून बारीक करून घ्या . हिरव्या मिरच्या ऐवजी लाला मिरची पावडर वापरली तरी चालेल .
५. वड्यासाठी बारीक / इन्स्टंट साबुदाणा वापरला तर वडे दिसायला नाजूक होतात .
 बारीक / इन्स्टंट साबुदाणा : १ कप साबुदाणा भांड्यात कडून त्यावर १ सेमी पाणी ठेवून १० मिनिटे भिजत ठेवा . १० मिनिटांनी साबुदाणा मऊ होइल . जास्तीचे पाणी निथळून काढून टाका .
मोठा साबुदाणा  : जर मोठा साबुदाणा वापरणार असाल तर तो ८ तास आधी भिजत घालावा लागतो .  १ कप साबुदाणा भांड्यात कडून त्यावर १ सेमी पाणी ठेवून १० मिनिटे भिजत ठेवा .  जास्तीचे पाणी निथळून काढून टाका . हा साबुदाणा ८ तास भिजू द्या . ८ तासांनी साबुदाणा आकाराने फुलेल आणि मऊ होईल .
६. मॅश केलेला बटाटा , भिजवलेला साबुदाणा , शेंगदाण्याचा कूट ,  मिरची ( बारीक केलेली हिरवी मिरची / लाल मिरची पावडर ),१/२   अख्खे जिरे , चवीनुसार मीठ एकत्र करा .
७. ते जिन्नस तेलाच्या हाताने मळून घ्या . मळताना अजिबात पाणी वापरू नये . साबुदाण्यात पाण्यामुळे पीठ पातळ झाले तर शेंगदाण्याचा कूट / राजगिरा पीठ वापरू शकता .
८. मळलेल्या पिठाचे लिंबाएवढे गोळे करून घ्या .
९. केळीच्या पानावर किंवा प्लॅस्टिकच्या पिशवीवर तेलाच्या हाताने वाडे थापून घ्या . वडा थापताना माध्यम पातळ थापावा . त्याला कुठेही चीर असू नये .
१०. पूर्ण कढलेल्या तेलात माध्यम आचेवर वडा दोन्ही बाजूनी सोनेरी रंग येईतोवर टाळून घ्या .
११. टिशूंपेपरवर ठेवून जास्तीचे तेल काढून घ्या .
१२. गरम गरम साबुदाणा वडे दह्यासोबत किंवा ओल्या नारळाच्या चटणीसोबत सर्व्ह करा .  

~ अमृता .. 

No comments:

Post a Comment

Popular Posts