Monday 30 April 2018

कॉर्नफ्लेक्स चिवडा / Cornflakes chivda


साहित्य : 
१ मोठ बाउल प्लेन कॉर्नफ्लेक्स 
तेल 
१/४ चमचा  जिरे 
२ चमचे आले लसूण पेस्ट 
१/४ चमचा हिंग 
१/४ चमचा हळद 
चवीनुसार मीठ,साखर
१ चमचा लाल मिरची पावडर   
कढीपत्ता 
भाजके शेंगदाणे १/२ वाटी 
१/२ वाटी फुटाणा डाळ 
१/२ वाटी फुटाणा डाळ पावडर 
जिरे पावडर 

कृती :

१. एका मोठया भांड्यात फोडणीसाठी तेल गरम करा . 
२. गरम तेलात जिरे आणि कढीपत्ता घाला . 
३. २ चमचे आले लसूण पेस्ट , हिंग घालून १/२ मिनिट भाजून घ्या . 
४. भाजके शेंगदाणे , १/२ वाटी फुटाणा डाळ घाला .  
५. हळद , लाल मिरची पावडर , मीठ घालून हलवा . 
६. या मिश्रणात प्लॅन कॉर्नफ्लेक्स घालून मिश्रण हलवून घ्या . 
७. चवीनुसार साखर घाला . 
८. १/२ वाटी फुटण्याची मिक्सरमधून पावडर करून घ्या . ती कॉर्नफ्लेक्स चिवड्यात घाला . 
९. मिश्रण हलवून घ्या . 
१०. सर्व्ह करताना वरून कारि चिरलेला कांदा आणि कोथिंबीर घाला .  


Ingredients:

1 Big Bowl Plain Cornflakes
Oil
1/4 tsp cumin seeds
2 tablespoon ginger garlic paste
1/4 spoon asafoetida
1/4 tsp turmeric powder
Salt and sugar to taste 
1 spoon red chilli powder
Curry leaves
Roasted peanuts 1/2 cups
1/2 cup roasted daria (gram / chana)
1/2 cup  roasted daria (gram / chana) powder
Cumin powder

Recipe:

1. Heat oil for tempering in a large pot.
2. Add cumin seeds and curry leaves in hot oil.
3. Add 2 tbsp garlic paste, asafoetida , and roast it for 1/2 minutes.
4. Add roasted peanuts, 1/2 cup roasted daria , ad mix it well.
5. Add turmeric powder, red chili powder, salt and stir.
6. Add plain cornflakes to this pot and mix it well.
7. Add sugar to taste.
8. Make a powder 1/2 cup roasted daria in blender. Put it in the cornflakes mixture.
9. Mix it well.
10. Serve it with chopped onion and coriander.

~ अमृता .. 

Monday 23 April 2018

कोथिंबीर वडी / Kothimbir Wadi / Crispy Coriander Fritter

बाजारात कोथिंबीर स्वस्त झाली की कोथिंबीर वडी खायची इच्छा होते . 
अहो .. इतरवेळी होत नाही असा नाही काही .. 
पण इतरवेळी भाजीला पुरेशी मिळाली तरी बस .. अशी अवस्था असते .. 
हो...  माझ्याही आणि तुमच्याही घरी
आज भाजीमंडईत कोथींबीर हवी तशी , हवी तितकी मिळाली 
मग म्हटलं घालूयाच घाट आज कोथिंबीर वडीचा   




साहित्य
१ मोठी पेंडी कोथिंबीर निवडून , धुवून
१ वाटी बेसन ( चणा डाळ )
लाल मिरची पावडर , ओवा , मीठ , हळद , खायचा सोडा
तळण्यासाठी तेल

 कृती :

कोथिंबीर वडीचे पीठ  
१. कोथिंबीर वाडीला कोथिंबीर निवडताना देठाचा भाग अजिबात घेऊ नये . फक्त पाने निवडून घ्यावी.
२. निवडलेली कोथिंबीर स्वच्छ धुवून वर्तमानपत्र / स्वच्छ कापडात घालून सावलीत कोरडी करावी .
३. कोथिंबीर बारीक चिरून घ्या .
४. त्यात १ वाटी चाळणीने चाळलेले बेसन घाला .
५. लाल मिरची पावडर , बारीक केलेला ओवा  , हळद , खायचा डोसा आणि चवीनुसार , मीठ घाला .
६. १/२ वाटी पाणी घालून वडीचे पीठ घट्ट होईतोवर तेलाच्या हाताने एकजीव  करून घ्या .

कोथिंबीर वडीचे पीठ वाफवण्याची क्रिया :

७. या पिठाचे सामान ४ ते ५ भाग करा .
८. प्रत्येक भागाचे उभट लांबट नण्यासारखे रोल बनवून घ्या .
९. एका चाळणीला तेल पसरून त्यावर हे रोल ठेवा.
१०. एका भांड्यात १/२ भांडे पाणी गरम करत ठेवा . जास्त पाणी भांड्यात ठेवले तर भांड्यावर असणाऱ्या चाळणीला त्याची उकळी चिकटू शकते .
११. पाण्याला उकळी अली की चाळणी पाण्यावर ठेवून झाकणी लावा .
१२. साधारण १० मिनिटात पीठ पूर्ण वाफवून निघेल . पीठ वाफवले आहे याची खात्री करण्याकरिता त्यात आरपार सूरी खुपसा . सूरी बाहेर काढल्यावर टी पीठ न चिकटता बाहेर अली पाहिजे . सुरीला पीठ चिकटले असेल तर अजून थोडा वेळ वाफवण्याची गरज आहे .
१३. वाफवलेले पिठाचे रोल थंड झाले कि चाकूने कापून त्याच्या वड्या पाडा . वडया पडताना फार पातळ कापू नये . पातळ वड्या तळताना करपतात .

कोथिंबीर वडी तळण्याची क्रिया :

१४. एका खोलगट भांड्यात तळण्यासाठी तेल गरम करा .
१५. तेल पूर्ण तापले की मंद आचेवर वाफवलेल्या वड्या तळून घ्या.
१६. तळताना वड्याचा हिरवा रंग बदलून लालसर व्हायला सुरु झाला कि त्या तेलातून काढाव्या . झारीने तेल पूर्ण निथळवून घ्या .
१७. गरम गरम कोथिंबीर वड्या खायला खुशखुशीत , खमंग लागतात .
१८ .. हवाबंद डब्यात ठेवून २ दिवस खाऊ शकता .

Ingredients :

1 large bowl washed coriander
1 cup gram flour (Chana Dal)
Red Chilli Powder
Carom seeds, Salt
Turmeric Powder,
Baking soda
Oil for frying

Recipe:


How to make Coriander flitter batter:

1. When choosing coriander leaves for this recipe, you should not take any part of its stem. Just pick the leaves.

2. Wash coriander leaves and press it in the newspaper / clean cloth and dry it in the shade.

3. Chop the coriander finely.

4. Add 1 cups of gram flour to it.

5. Add red chili powder, carom seeds, turmeric, baking soda and salt as per taste.

6. Add 1/2 cup water and make this batter firm.


How to steam batter


7. Make its small 4 to 5 pieces.

8. Make each piece in roll shape.

9. Spread the oil on a stainless steel sieve . Put all rolls on it.

10. Heat the water in a bowl of 1/2 of its size. If more water is kept in a vessel, then the sieve on the vessel can stick to it. Be careful.

11. Put sieve on boiled water and cover it.

12. After about 10 minutes, the batter will cook. In order to ensure that the batter is steamed, push knife in it. After extracting, knife should non-sticky. If batter comes out with knife, then it needs to be cook for a while.

13. After cooking it well. Make it cold. Cut it into small pieces. It should not be cut very thin.


Frying coriander flitter


14. Heat oil for a frying pan.

15. Fry coriander flitters on low flame.

16. When the green color of the flitter begins to become reddish, it should be removed from the oil.

17. Crispy coriander fliters are ready to eat.

18 .. You can keep it for two days .


~ अमृता ..  
  

उरलेल्या भाताचा डोसा / झटपट डोसा / Leftover rice dosa/ Instant dosa

घरी बऱ्याचवेळा भाताचा अंदाज चुकतो आणि आपला भात शिल्लक राहतो. 
हा भात शिळा करून नुसता खायला फारचं जीवावर येत हो .
मग त्याचा डोसा केला तर ?
घरी नक्कीच सगळे आवडीने खातील  आणि भात ही संपेल ... 
म्हणजे हे कसं झालं माहितीये का ..
 स्वार्थात परमार्थ :D 



साहित्य :
१ कप शिजलेला भात 
१ कप तांदळाचे पीठ 
१/२ कप गहू पीठ 
१/४ कप आंबट दही 
चवीनुसार मीठ 
१/२ चमचा खायचा सोडा 

कृती :

डोश्याचे पीठ :

१. शिजलेला भात , तांदळाचे पीठ , गव्हाचे पीठ एकत्र करून घ्या . 
२. आवश्यकतेनुसार पाणी घालून मिक्सरमधून त्याची पेस्ट करून घ्या .  
३. एका मोठ्या भांड्यात हे मिश्रण काढून घ्या . 
४. त्यात १/४ कप आंबट दही घालून चांगले हलवून घ्या . 
५. चवीनुसार मीठ घाला . 
६. तव्यावर डोसे घालता येतील इतके डोश्याचा पीठ घट्टसर करून १/२ तास भिजत ठेवा .  
६. डोसे  करतेवेळी १/४ चमचा खायचा सोडा घालून हलवून घ्या .  

डोसे करण्याची कृती :

१. नॉनस्टिक पॅन  गरम करून घ्या . 
२. एका वाटीत मिठाचे पाणी घ्या . 
३. ताव चांगला तापला की तव्यावर मिठाचे पाणी पसरून  स्वच्छ कापडाने पुसून घ्या . 
४. पॅन नॉनस्टिक वापरत नसाल तर कांदा मध्यभागी चिरून तेलात बुडवून प्रत्येक डोसा करण्याआधी तवा कांद्याच्या तेलाने पुसून घ्या . 
५. तळाला पसरट असणारया मोठ्या वाटीने डोश्याचे पीठ तव्याच्या मध्यभागी घाला . 
६. वाटीचा खालचा भाग तव्यातील पिठावर गोल फिरवत पीठ तवाभर पसरून घ्या . (वाटी तव्यावर फिरवताना एकाच दिशेने फिरवावी .)
७. १/२ मिनिटाने डोश्यावर आणि कडांना १ चमचा तेल सोडा . 
८. डोसा योग्य भाजला की आपोआप काठ सुटतात . 
 ९.  उरलेल्या भाताचा हा गरम गरम डोसा बटाट्याच्या भाजीसोबत किंवा ओल्या खोबऱ्याच्या चटणी सोबत खायला द्या . 


Ingredients:

1 cup cooked rice

1 cup rice flour

1/2 cup wheat flour

1/4 cup sour yoghurt

Salt to taste

Baking soda 1/2 cup spoon


Recipe:

Dosa batter

1. Combine cooked rice, rice flour, wheat flour.Mix it well.

2. Add sufficient water and make a fine paste in a mixer.

3. Take this mixture into a large vessel.

4. Add 1/4 cup sour yogurt and stir well.

5. Add salt to taste.

6. keep aside for 1/2 hours.

6. While making the dosa, add 1/4 tsp of baking soda and stir.

Dosa recipe:

1. Heat a nonstick pan.

2. Take a cup of salt water.

3. Spread salt water on heated pan and wipe it with clean cloth.

4. If you are not using nonstick pan, wipe heated pan with chopped onion piece dipped in oil. 

5. Put dosa batter at center of pan with large bowl.

6. Spread the bottom of the bowl on the batter in the pan and spread the flour through the pan. (Rotate the bowl in one direction.)

7. Leave 1 teaspoon oil on the dough and wait for 1/2 minutes.

8. When dosa is properly baked, the edges comes up automatically.

9. Take dosa out of heated pan.

10. Serve hot dosa with potato bhaaji and coconut chutney.

~ अमृता .. 

चॉकलेट फ्रुट कस्टर्ड / Chocolate fruit custard

उन्हाळा सुरु झाला रे झाला की आईस्क्रीमचे डोहाळे लागतात सगळ्यांना . अगदी लहानापासून मोठ्यांपर्यंत .

उन्हाळ्याची सुट्टी म्हणून मग पिल्लांसाठी घरी बाबानी वेगवेगळी फळेही आणून ठेवलेली असतात. पण नुसती फळे आवडीने खातील तर ती मुलं कसली :)

मग त्या फळांचं कस्टर्ड केलं तर ? भारी आयडिया आहे .....

आता घरी कस्टर्ड पावडर नाहीये म्हणून उगाच कारणं नकोयेत ..... 
कारण हे फ्रुट कस्टर्ड आपण कुठल्याही इसेंन्स आणि पावडरशिवाय १००% फळांपासून करणार आहोत . 
आहेत कुठे .... 
कॅलरीजची आकडेमोड करून खाणाऱ्या महाभागांना .... अ ... चुकून म्हटलं बर का :P 
तर कॅलरीजची आकडेमोड करून खाणाऱ्यांनाही  मनसोक्त खाता येईल अशी डिश.. 

चॉकलेट फ्रुट कस्टर्ड 

आणि चॉकलेट म्हटलं की कुठलं आलाय पथ्य आणि कॅलरीज .... :D 
      


साहित्य :
६ पूर्ण पिकलेली केळी
१/४ वाटी दूध
१ सफरचंद
१ वाटी द्राक्षे
४ ते ५ स्ट्रॉबेरी
२ चमचे साखर
१ चमचा पीनटबटर
१ चमचा न्यूटेला ( किंवा चॉकलेट सिरप )
२ कप केक  ( ऐच्छिक )
बदामाचे काप सजावटीसाठी

कृती :


१. सर्व केळी सोलून, साखर घालून  मिक्सरमधून फिरवून त्याची पेस्ट करून घ्या .  ही पेस्ट करताना गरज वाटल्यास १/४ वाटी थंड दूध वापरा .

२. केळ्याची पेस्ट केला मोठ्या बाऊलमध्ये काढून घ्या .

३. त्यात १ चमचा पीनटबटर , १ चमचा न्यूटेला ( किंवा चॉकलेट सिरप ) घालून चांगले एकजीव करून घ्या .
४. सफरचंदाचे बारीक पातळ काप करून घ्या . साल काढण्याची गरज नाही .
५. स्ट्रॉबेरीचे लहान काप करून घ्या .
६. आता बाऊलमधील मिश्रणात सफरचंदाचे काप , द्राक्षे , स्ट्रॉबेरीचे काप घालून एकत्र करा .
घरी अजून कोणती गोड फळे असतील तर ती ही वापरण्यास हरकत नाही .
 ७. २ कप केकचा हाताने चुरा करून मिश्रणात मिसळा .
८.  हे चॉकलेट फ्रुट कस्टर्ड १/२ तास थंड होण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवून द्या . (जिथे आपण बर्फ करतो त्या फ्रिजरमध्ये नाही .)
९.  १/२ तासांनी हे चॉकलेट फ्रुट कस्टर्ड खाण्यास तयार ....
१०. सर्व्ह करताना एका काचेच्या बाऊलमध्ये ३/४ चॉकलेट फ्रुट कस्टर्ड  भरून घ्या .
११. वरून अजून थोडे फळांचे काप पसरावा .
१२. सजावटीसाठी वरून बदामाचे काप घाला .


Ingredients:

6 full-riped bananas

1/4 cup milk

1 apple

1 cup grapes

4 to 5 strawberries

2 tsp sugar

1 spoon peanutbuter

1 spoon nuella (or chocolate syrup)

2 cups cake (optional)

For decoration almonds

Action:

1. Peel all the bananas, add 2 tsp sugar and put them in a mixer and make a paste of it. Use 1/4 cup cold milk if needed.

2. Transfer banana paste in a large bowl.


3. Add 1 spoon peanut butter, 1 spoon of nutella (or chocolate syrup) and mix it well.

4. Finely chop the apple in thin n small pieces. No need to remove it's cover.


5. Chop strawberries into small slices.

6. Now mix the apple slices, grapes, strawberry slices in a bowl of banana mixture.

If there are other  sweet fruits at home then you can use it.

7. Smash 2 cup cakes and mix it in the bowl.

Chocolate fruit custard is ready.

8. Put this chocolate fruit custard in the refrigerator to cool for 1/2 hours.

9. Chocolate fruit custard will ve ready to eat in 1/2 hour.

10. Fill 3/4 chocolate fruit custard in a glass bowl while serving.

11. Put some more fruit slices on top of it.

12. Put almond slices on top for decoration.


~ अमृता    

Friday 20 April 2018

कोल्हापुरी पांढरा रस्सा / Kolhapuri pandhara rassa

कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा ही कोल्हापूर ची खासियत आहे . 

पांढऱ्या रश्याची जी चव कोल्हापूरकरांना जमते ती दुसऱ्या कुणालाही जमत नाही हे अगदी विश्वासाने सांगू शकते मी ..... 
कदाचित कोल्हापूरच्या पाण्याची चव वेगळी असावी :)

हा पांढरा रस्सा प्यायला १ नंबर लागतो . ७ ते ८ वाट्या पांढरा रस्सा कोल्हापूरकर सहज पितात . 
कार्यक्रमात जेवणाच्या पंगतीत पांढरा रस्सा वाढायला वाढपी येताना दिसला 
कि सगळ्यांच्या ताटातील रश्याच्या वाट्या आपोआप रिकाम्या होतात . 
यावरूनच त्याच्या चवीचा अंदाज आला असेल . 

कोल्हापूरकर असा वा नसा ... एकदा पांढरा रस्सा करून बघाच .... दरवेळी करायची इच्छा होईल 

जगात भारी .... कोल्हापुरी ! उगाच नाही म्हणत  :) 



साहित्य
१/२ किलो मटण किंवा चिकण हाडांसहित
१ वाटी दही (सायट्याचे दही नको)
२ चमचे आले लसूण पेस्ट
तेल
१ मध्यम आकाराचा कांदा
१ नारळ
१० काजू
४ चमचे खसखस
२ लवंग
१ इंच दालचिनी
तमालपात्री
२ सुक्या लाल मिरच्या
मीठ

कृती :

चिकन शिजवण्याची कृती
१. चिकन स्वच्छ धुवून घ्या .
२. त्यात १ वाटी दही , २ चमचे आले लसूण पेस्ट घालून एकत्र हलवा .
३. हे मिश्रण १ तास मुरण्यासाठी ठेवूं द्या .
४. १ तासानंतर चिकन शिजवण्याच्या भांड्यात फोडणीसाठी तेल गरम करून घ्या .
५. त्यात १ बारीक चिरलेला कांदा घालून २ मिनिट परतून घ्या .
६. मॅरीनेट केलेलं चिकन घालून हलवून घ्या .
चिकन फोडणी घालताना हळद वापरायची नाही . आपल्याला रस्सा पांढरा हवाय .
७. आवश्यक तितके मीठ घालून हलवा  .
८. झाकणी लावून मंद आचेवर शिजत ठेवा .(शक्यतो झाकण्यासाठी खोलगट ताट वापरावे . त्यावर पाणी ठेवता येईल आणि वाफेवर आतील चिकन शिजेल ).  मिठामुळे चिकनला पाणी सुटेल . याच पाण्यात चिकन शिजू द्या .
९.  चिकनला सुटलेले पाणी संपले की मग ताटावर गरम करत ठेवलेले पाणी अर्धी वाटी चिकन मध्ये ओता .
१०. पुन्हा झाकलेल्या ताटावर पाणी भरून ठेवा.
११. जोवर चिकन शिजत नाही तोवर ते तटावरच्या गरम पाण्याने शिजवा
चिकनमध्ये एकदम सगळे पाणी ओतू नये . अर्धा वाटी पाणी संपल्यावर मगच पुढील पाणी ओतावे . चिकन लवकर शिजते आणि हाडांचा सूप चांगला येतो .

मटण  शिजवण्याची कृती
 १. मटण स्वच्छ धुवून घ्या .
२. मटणाला दही लावून मॅरीनेट करण्याची गरज नाही .
३. भांड्यात फोडणीसाठी तेल गरम करा .
 वरील चिकन शिजवण्याची कृती मधील क्र . ५ पासून कृती पहा
चिकन शिजवण्याच्या पद्धतीनेच मटण  शिजवा .

चिकन / मटण शिजल्यानंतर त्यातील फोडी बाजूला काढून घ्या .

पांढरा रस्सा कृती :

१. एक नारळ फेसून खवणून घ्या .
२. मिक्सरमध्ये थोडं पाणी घालून बारीक करून त्याचे दूध काढून घ्या .
३. नारळाचा चव पूर्ण कोरडा होईतोवर मिक्सरमधून पुन्हा पुन्हा फिरवून घट्ट दाबून दूध काढा'.
४. गाळण्याने गाळून घ्या .
५. ४ चमचे खसखस गरम पाण्यात अर्धा तास भिजत घाला.
४. मिक्सरमध्ये त्याची पेस्ट करून घ्या .
५. मिक्सरमधून काजुंचीही पेस्ट करून घ्या .
६. पांढरा  रस्सा फोडणीसाठी भांड्यात तेल गरम करून घ्या . चिकन / मतं शिजवताना आपण आधीच तेल वापरले असल्याने रस्सा फोडणीसाठी कमी तेल घाला
७. काढलेल्या तेलात लवंग,  दालचिनी , तमालपत्र , वेलदोडे , सुक्या लाल मिरच्या घाला .
८. त्यात खसखस पेस्ट घालून परतून घ्या .
९. काजू पेस्ट घालून परतून घ्या .
१०.  मटण / चिकन शिजवलेले सूप घाला व एक उकळी काढा .
११. नारळाचे दूध घालून ढवळून घ्या आणि गॅस बारीक करा .  नारळाचे दूध घातल्या नंतर रश्याला उकळी येत काम नये अन्यथा पांढरा रस्सा फुटतो .
१२. चवीनुसार मीठ घाला . शिजतेवेळी आपण मीठ घातले असल्याने रश्यात जास्त मीठ घालण्याची गरज नाही .
१३.  गरम गरम पंधरा रस्सा प्यायला १ नंबर लागतो :)

जगात भारी .... आम्ही कोल्हापुरी :)

~ अमृता ..  

Thursday 19 April 2018

मसाला टोस्ट / Masala Toast

संध्याकाळी बागेतून खेळून आल्यावर या आपल्या बच्चे कंपनीला खूप भूक लागते . 
पण पोळी भाजीला आधीच लाल सिग्नल मिळालेला असतो . 
मग डोक्यात चक्र सुरु होतात . आज काय बनवून ठेवायचं संध्याकाळसाठी .  
मसाला टोस्ट हा लहान मुलांना पटकन आवडेल असा पदार्थ . 
आणि आईलाही खूप वेगळं काही नाही करावं लागत. 
मग आई ही खुश आणि मुलंही 


साहित्य :

बटाट्याच्या stuffing  साठी 
२ बटाटे उकडून 
१ इंच आल्याची पेस्ट 
१ कांदा बारीक चिरून 
२ हिरव्या मिरच्या वाटून 
फोडणीसाठी तेल , हिंग, हळद 
चवीनुसार मीठ , साखर 

टोस्ट साठी 
२ व्हाईट ब्रेड 
बटर 

हिरव्या  चटणीसाठी 
१ वाटी कोथिंबीर निवडून धुवून 
२ लसूण पाकळ्या 
२ हिरव्या मिरच्या 
१ चमचा लिंबाचा रस 
मीठ 
४ ते ५ पुदिन्याची पाने धुवून  


कृती:  
हिरव्या चटणीची कृती : 

१. १ वाटी कोथिंबीर , सोललेल्या २ लसूण पाकळ्या ,२ हिरव्या मिरच्या,१ चमचा लिंबाचा रस , पुदिन्याची पाने आणि चवीनुसार मीठ घालून मिक्सरमधून वाटून घ्यावे 
२. वाटताना गरज पडली तरच पाणी घालावे 
३. हिरवी चटणी घट्ट झाली तर टोस्ट ला लावताना सोपी जाते . 
४. खजूर चिंचेची गोड चटणी कृतीसाठी इथे क्लिक करा

बटाट्याचे stuffing :

१. २ बटाटे कुकरमधून उकडून घ्यावे . 
२. थंड झाल्यावर सोलून मॅश करून घ्यावे .
३. १ इंच आले आणि हिरव्या मिरच्या वाटून घ्याव्या . 
४. १ कांदा बारीक कापून घ्यावा . 
५. फोसणीसाठी गरम करत ठेवलेल्या तेलात जिरे घालावे . 
६. तडतडल्यानंतर कांदा घालून २ मिनिट भाजून घ्यावा . 
७. हळद , हिंग , वाटलेले आले मिरची घालून १ मिनिट परतून घ्यावे . 
८. मॅश केलेलं बटाटे घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे .   
९. २ मिनिट मंद आचेवर शिजू द्यावे . 

मसाला टोस्ट : 

१. दोन्ही बाजूस बटर लावून २ व्हाईट ब्रेड  नॉनस्टिक पॅनमध्ये भाजून घ्यावे 
(टोस्टर असल्यास पॅनवर भाजण्याची गरज नाही . ब्रेडमध्ये बटाट्याचे मिश्रण आणि चटणी भरून टोस्टरमध्ये ठेवावे . )
२. भाजलेल्या एका ब्रेडवरहिरवी चटणी पसरून घ्यावी . 
३. त्यावर बटाट्याच्या भाजीचे मिश्रण चमच्याने भरून घ्यावे . 
४. त्यावर कांद्याचे २ पातळ गोल अखंड काप ठेवावे . 
५. भाजलेला दुसरा ब्रेड त्यावर ठेवून दाबून बसवावा . 
६. सर्व्ह करताना हे मसाला टोस्ट पुन्हा एकदा तव्यावर गरम करावे . 
७. ब्रेडला मधून कापून त्रिकोणी आकार द्यावा . वरून थोडी बारीक शेव घालावी . 
८. खजूर चिंचेच्या  गोड चटणी सोबत किंवा टोमॅटो सॉस सोबत घरं गरम खायला द्यावे .  

खजूर चिंचेची गोड चटणी कृती साठी इथे क्लिक करा

टीप :
 घरी बटाट्याची पिवळी भाजी खूप उरली असेल तर ती मॅश करून टोस्ट मध्ये भरली तरी चालते 

~ अमृता .. 

कच्च्या कैरीचे झटपट लोणचे / Kairiche Lonche / Quick Raw Mango Pickle

लहानपणी आमच्या अंगणात एक मोठं आंब्याचं झाड होत . उन्हाळा सुरु झाला की प्रत्येक फांदीला कैऱ्या लगडलेल्या दिसायच्या .

मग त्या कैऱ्यांची राखण आणि  झाडावर आहेत तोवरच मोजून भावंडांमध्ये त्यांची वाटणी असे बरेच उदयॊग दिवसभर चालायचे .

दुपारच्या जेवणाची वेळ झाली की आई आम्हाला झाडावर चढून २ कैऱ्या काढायला सांगायची . 

काय सरसर चढायचो झाडावर तेव्हा .... भारी होत सगळंच ... अख्खी सुट्टी आंब्याच्या भोवती नाचायची :)
मग त्या नुकत्याच तोडलेल्या कैरीचं आई ५ मिनिटात लोणचं करायची . आई त्याला कैरीचं करम असंच म्हणते
  
आणि मग आम्ही सगळे ते भांड चकचकीत दिसेतोवर चाटून पुसून खायचो :)  


साहित्य :

२ कच्च्या कैऱ्या
लाल तिखट , मीठ , साखर
२ लसूण पाकळ्या सोलून
फोडणीसाठी तेल , जिरे, मोहरी, हिंग

कृती :

१. कैऱ्या स्वच्छ धुवून चिरून लहान फोडी करून घ्यावा.
२. २ लसूण पाकळ्या सोलून चेचून घ्याव्या .
३. फोडणीसाठी २ चमचे तेल गरम करावे .
४. त्यात जिरे मोहरी घालावे .
५.  चेचलेला लसूण घालावा
६. , १/२ चमचा हळद, १/२ चमचा हिंग, १ चमचा लाल तिखट, १/२ चमचा साखर घालावे
७. मिश्रण परतवून लगेचच गॅस बंद करून भांडे गॅसवरून उतरवून ठेवावे .
८. फोडणी थंड झाल्यावर त्यात कैरीच्या फोडी घालून हलवून घ्यावा जेणे करून फोडणी सगळ्या फोडींना व्यवस्थित लागेल .
 ९. चवीनुसार मीठ घालावे.
१०. एकदा हलवून झाकणी बंद करून ५ मिनिटं लोणचे तसेच ठेवावे . त्याला पाणी सुटले की चव चांगली येते .


Ingredients:

2 raw unripped mangos
Red chili powder
salt, sugar
2 peeled garlic cloves

For tempering oil, cumin seeds, mustard seeds, asafoetida

Action:

1. Clean the raw mangoes and chop them into small pieces.
2. Peel 2 garlic cloves.
3. Heat 2 tbsp oil for tempering in a pot.
4. Add cumin seeds.
5. Add chopped garlic
6. Add 1/2 spoon turmeric powder, 1/2 spoon asafoetida, 1 spoon red chilli powder, 1/2 spoon sugar
7. Mix it well.
Turn off gas n put a pot down.
8. Once the tempering is cool, add chopped mango pieces and stir it so that the tempering should be done properly.
9. Add salt to taste.
10. Once done, close the lid and keep the pickle for 5 minutes .

~ अमृता .. 

कैरीची लाल चटणी / Raw mango chutney

कच्च्या कैरीची खूप वेगवेगळ्या प्रकारे चटणी करता येते . यातील माझ्या आवडीची ही 
कैरीची  लाल चटणी
खूप पटकन ही होते आणि फार काही जिन्नस ही नाही लागत . 
कच्च्या कैरीची आंबट गोड लाल चटणी 
साहित्य :

२ कच्च्या कैऱ्या 
१/२ वाटी सुके खोबरे 
२ लसूण पाकळ्या (ऐच्छिक)
मीठ , गूळ , लाल मिरची पावडर , हळद
फोडणीसाठी तेल , मोहरी 

कृती :

१. कैऱ्या स्वच्छ धुवून त्याची साले काढून घ्याव्या  . 
२. कैरीचे बारीक  काप करून ठेवावे . 
३. १/२ वाटी सुके खोबरे आणि १ मच्यम आकाराचा गुळाचा खडा किसून घ्यावे . 
४. मिक्सरमध्ये कैरीचे काप , किसलेले सुके खोबरे , लसूण पाकळ्या  आणि गूळ बारीक करून घ्या . 
५. फोडणीसाठी तापवलेल्या तेलात मोहरी,  घालावी . 
६. मोहरी तडतडली की  १/२ चमचा हळद ,  १ चमचा लाल मिरची पावडर घालून परतून घ्यावे . 
७. लगेचच  मिक्सरमधील मिश्रण घालून वरून झाकणी झाकावी . लगेच मिश्रण घातल्याने हळद करपणार नाही आणि झाकणीमुळे फोडणीचा वास चटणीमध्येच राहील . 
८. चवीनुसार मीठ घालून चटणी घट्ट होईतोवर मंद आंचेवर हलवत रहा. 


Ingredients:


2 raw mangoes

1/2 cup dried coconut

2 garlic cloves (optional)

Salt, jaggery, red chilli powder, turmeric powder

For tempering oil, mustard seeds


Recipe:


1. Clean raw mangoes and peel it.

2. Chop it in small pieces.

3. Grate 1/2 cup dry coconut and 1 medium-sized jaggery

4. Grate raw mango pieces, grated dried coconut, garlic cloves and jaggery in a mixer.

5. Add mustard in  frying oil  heated for  tem.

6. Add 1/2 spoon turmeric powder, 1 spoon red chilli powder and sauté it.

7. Immediately add a grated paste of raw mango  and cover the lid.

8. After adding the salt as per your taste, keep stirring chutney for some time.

~ अमृता .. 

कच्च्या कैरीचे पन्हे / Kairi panhe / Raw Mango Juice for summer

अक्षयतृतीयेच्या निमित्ताने  हळदी कुंकवाचा कार्यक्रम होता . चैत्रागौरीच हळदी कुंकू म्हटलं की कैरी पन्हे आणि आंबे डाळ हे अगदी खूप जुनं समीकरण आहे . 
हे कैरी पन्हे म्हणजे करायला सोपे , कमी वेळ खाऊ , प्यायला  खूपचं  आल्हाददायक आणि उष्मा  कमी करणारे .... 
म्हणून या उन्हाळ्यात नक्की करून पहा कैरी पन्हे  .....
 कैऱ्या पिकण्याच्या आधी  :P 


आंबे डाळ च्या कृतीसाठी इथे क्लिक करा



साहित्य :

७ ते ८ कच्च्या कैऱ्या
१ वाटी किसलेला गूळ
३ ते ४ वेलदोडे
१/२ लिंबाचा रस

कृती :

१. कैऱ्या स्वच्छ धुवून घ्या . देठाची बाजू सुरीने गोल कापून देठ काढून टाका.
२. कुकरमध्ये पाणी घालून ४ शिट्ट्या देऊन कैऱ्या उकडून घ्या . कैऱ्या उकडण्यासाठी कमी पाणी घालावे अन्यथा पन्हे पांचट होते .
३. उकडलेल्या कैऱ्या थंड झाल्या कि सोलून सालं बाजूला काढावी .
४. हाताने पिळून गर काढून घ्या . सालीला लागलेला गर चमच्याने काढून घ्या .
५. १ वाटी गूळ किसून घ्या .
६. कैरीचा गर , गूळ  आणि वेलची मिक्सरमधून पूर्ण पेस्ट होईतोवर फिरवून घ्या . उकडताना वापरलेले पाणी कुकरच्या भांड्यात शिल्लक असेल तेच मिक्सरमध्ये वापरावे .
७. मिक्सरमधून काढलेले मिश्रण एकदा गाळण्याने गाळून घ्या . म्हणजे त्यात कोणताही घट्ट भाग राहणार नाही .
८. कैरी पाण्याचे हे जाडसर मिश्रण बाटलीमध्ये भरून फ्रिजमध्ये ठेवल्यास हवे तेव्हा वापरता येते .
९. प्यायला घेताना १/४ पेला घट्ट कैरीचे पन्हे आणि ३/४ पेला थंड पाणी एकत्र ढवळून २ थेंब लिंबाचा रस घालून घेणे .

टीप :

१. आवडीनुसार आणि गुळाच्या गोडीनुसार गुळाचे प्रमाण कमी जास्त करू शकता .
२. करी पन्ह्याच्या कैऱ्या या जास्त आंबट असाव्यात .
३. जर कैऱ्या आंबट नसतील तर आंबटपणासाठी १/२ लिंबाचा रस घाला .

Ingredients:

7 to 8 raw mangoes
1 cup grated jaggery
3 to 4 green cardamoms
1/2 lemon... It's  juice

Recipe:

1. Clean the raw mangoes.
2. Add water to the cooker . Cook raw mangoes in cooker for 15 minutes. Pour less water to boil the cooker.
3. After cooking , let mangoes get cold. Peel them.
4. Squeeze with hands and remove a mango pulp.
5. Mix 1 cup jaggery in mango pulp.
6. Take mango pulp, jaggery and cardamom into grinder. Use water from cooker to make its fine paste.
7. Filter mixture to remove hard and big pieces from.it.
8. Keep thick mixture of raw mangos juice in the bottle and keep in the refrigerator . Use as n when you want.
9. Take 1/4 glass of raw mango juice thik mixture and mix 3/4 cup cold water and add 2 drops of lemon juice.

Raw mango juice is ready to drink.

~ अमृता .. 

आंबे डाळ / Raw mango chutney / Ambe dal

आंबे डाळ ही चैत्रागौरीच्या हळदी कुंकवासाठी करतात . 
कच्च्या कैरीची ही डाळ नुसती खायला ही बऱ्याच जणांना आवडते .

करीचे पन्हे कृतीसाठी इथे क्लिक करा .

साहित्य 
१ वाटी कच्ची कैरी सोलून किसून 
१ १/२ वाटी चणा डाळ 
२ हिरव्या मिरच्या 
कोथिंबीर 
१/२ लिंबाचा रस 
फोडणीसाठी तेल , हिंग , मोहरी 
मीठ 

कृती :
चणा डाळ आदल्या दिवशी भिजत घालावी 

१. साधारण २ कच्च्या कैऱ्या सोलून घ्यावा . 
२. कैऱ्या किसणीने किसून घ्यावा . 
३. ७ ते ८ तास पाण्यात भिजलेली छान डाळ पाण्यातून उपसून घ्यावी . 
४. मिक्सरमधून जाडसर वाटून घ्यावी . 
५. चणाडाळ वाटताना त्यात  २ हिरव्या मिरच्याही वाटून घ्यावा. 
६.  एका भांड्यात फोडणीसाठी २ चमचे तेल गरम करावे . 
७.  त्यात मोहरी आणि चिमूटभर हिंग घालावा . 
८. वाटलेली डाळ घालून चटकन झाकण लावावे जे ने करून फोडणीचा वास जाणार नाही .
९. गॅसवरून भांडे उतरवून घ्यावे . 
१०. त्यात किसलेली कैरी , चवीनुसार  मीठ घालावे . 
११. आंबटपणा कमी पडल्यास २ चमचे लिंबाचा रस घालावा  
१२. १/२ चमचा भाजलेले मेथी दाणे पूड करून घातल्यास कैरी डाळ खायला छान लागते .

~ अमृता .. 

Saturday 14 April 2018

हिरव्या मिरचीचा खरडा/ ठेचा / Green Chilli Kharada / Thecha

हिरव्या मिरचीचा खरडा आणि भाकरी ..... १ नंबर 

आजपर्यंत भारतीय आणि भारताच्या बाहेर ही खूप डिश खाल्ल्या . पण खरड्यासारखी tempting आजवर सापडली नाही मला . 
पहिला खास खाल्ल्या खाल्ल्या जिभेला कशी चरचरी येते . आम्हा कोल्हापूरकरांनी जितकं प्रेम रंकाळ्यावर केलय तितकंच कदाचित त्याहून थोडं जास्तच खरडा भाकरीवर केलंय 

पूर्वीच्या बायका मिक्सरऐवजी खरडा खलबत्यात ठेचून बनवतं . कदाचित यामुळेच त्याला मिरचीचा ठेचा असंही नाव आहे .  

इतकं तिखट नसेल जमत ( पचत  :P ) खायला  तर तुम्ही का हिरव्या मिरचीचा खरडा दह्यासोबत खाऊन बघा . थोडा तिखटपणा कमी जाणवेल आणि न खाल्ल्याचं दुःख ही नाही राहणार कोण्या खवय्याला  :)      

ज्या लोकांना खुपच कमी तिखट खाण्याची सवय असेल त्यांनी टीप क्र ४ आवर्जून वाचावी . 


साहित्य :

२० ते २२ हिरव्या मिरच्या (टीप क्र . १)
१ मोठी वाटी कोथिंबीर निवडून , धुवून
२ चमचे मोठे मीठ (पांढरे)
७ ते ८ लसूण पाकळ्या
१ मध्यम आकाराचा कांदा उभा कापून
१/ २ चमचा लिंबाचा रस (ऐच्छिक)

कृती :

१. हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून , कापडाने पुसून कोरड्या करून घ्या .
२. मिरचीची देठे खुडून घ्या .
३. ७ ते ८ लसूण पाकळ्या सोलून घ्या .
४. १ मोठी वाटी कोथिंबीर निवडून , धुवून उन्हामध्ये पसरवून वाळवून घ्या.
५. १ मध्यम आकाराचा कांदा उभे काप करून घ्या .
६.  तापलेल्या लोखंडी तव्यावर  मिरच्या , लसूण आणि कांदा २ चमचे तेल घालून चांगला भाजून घ्या
७. भाजलेले हे पदार्थ थंड होऊ द्या .
८. त्यात २ चमचे मोठे मीठ घालून खलबत्त्यात मिरचीचा ठेचा चांगला ठेचून घ्या .  (टीप क्र.  ३)
हल्ली बऱ्याच घरी खलबत्ता मिळत नाही . ज्यांच्याकडे नसेल त्यांनी हे मिश्रण मिक्सरमधून फिरवून घ्या .
९. १/ २ चमचा लिंबाचा रस खालून एकजीव करून घ्या .

टीप :
१. खरड्यासाठी मिरच्या घेताना गडद हिरव्या काळपट रंगाच्या आणि अंगाने बारीक घ्याव्या . कारण जाडी वाढली की तिखटपणा कमी येतो ...... मिरचीचा :)
२. मिरचीचा  देठाला बाजूने वास घेऊन मिरची किती तिखट आहे हे ओळखता येते .
३. खलबत्त्याने ठेचून केलेल्या खरड्याची चव मिक्सरमधून काढलेल्या खरड्यापेक्षा जास्त चांगली लागते . शेवटी जुनं ते सोनंच :)
४. खरड्याचा तिखटपणा कमी करण्यासाठी बारीक करताना त्यात १/२ वाटी भाजके शेंगदाणे सोलून घालावे .

मग काय ..... कधी करताय खरडा भाकरी :)


Ingredients:

20 to 22 green chillies (Refer note no. 1)
1 large bowl coriander washed
2 tbsp salt (white)
7 to 8 garlic cloves1
1 medium size chopped onion
1/2 spoon lemon juice (optional)

Recipe:

1.Wash green chillies, dry them with clean cloth.
2. Chop the chilli's stem.
3. Peel 7 to 8 garlic cloves.
4. Take 1 large bowl of coriander. Wash it well. Wipe with tissue or cloth . Make it dry in sunlight.
5. Chop 1 medium sized onion.
6. Add chilli, garlic and onion and 2 tbsp oil to an iron pan and roast it well.
7. Keep it cool down.
8. Add 2 tbsp of salt to it and crush it well. (Note no.3)
Use traditional stone grinder to make this recipe. If it's not available, you can use regular electric grinder.
9. Take 1/2 spoon of lemon juice and mix it well.

Note:

1. While selecting green chilli for Khar, take dark green coloured  and thin chillies.
2. If you will cut chilli's stem part and smell,  you can guess how spicy chilli is .
3. Taste of chilli thech made with traditional stone grinder is  awesome than electric grinder.Afterall old is gold.
4. To make thech less spicy, add roasted crushed peanuts .

~ अमृता 

कांदा भजी / खेकडा भजी/ Onion Bhaji / Kanda Bhaji

बाहेर रिमझिमणारा पहिला वहिला गारांचा पाऊस ...
 झाडांची टिपटिपणारी पानं , टपटप आवाज करत वाजणाऱ्या कौलारू घरांच्या खापऱ्या  

सुवासिकतेच्या सगळ्या मर्यादा ओलांडून हवेत विरघळून गेलेला , 
सगळीकडे दरवळणारा ओल्या मातीचा धुंदी चढायला लावणारा वास ... 
आणि सोबतीला प्लेट भरून कांदा भजी .. 
अहाहा .. कदाचित स्वर्गसुख काय ते हेच हो .. 
अजून काय हवय आनंदी राहायला :)

चला तर मग ...... आजची स्पेशल .... कांदा भजी 
याला खेकडा भजी असही  म्हणतात हे मला पुणेकरांकडूनच कळलं :) 
असो ...... 
सांगायला करू ना सुरुवात ? 

साहित्य :

४ मोठे कांदे उभे पातळ चिरून 
३/४ कप बेसन (चणा  डाळीचे पीठ )
मीठ , हिंग  
१ चमचा लाल मिरची पावडर ,
१/२  चमचा ओवा
भाजके जिरे किंवा जिरे पावडर  
१/२ चमचा खायचा सोडा (ऐच्छिक )
१/२ चमचा हळद 
तळण्यासाठी तेल 

कृती :

१. कांदे सोलून मध्यभागी कापून अर्धे करून घ्या . 
२. त्याचे उभे आणि अगदी पातळसे काप करून घ्या . चारी बाजूने वापरायची किसणी घरी असेल तर हे काम फारच सोपं होईल आणि सगळे काप पातळ आणि सामान  आकाराचे होतील . 
३. कापलेला कांदा हाताने कुसकरून घ्यावा म्हणजे पाकळ्या एकमेकांपासून विलग होतील . 
४. त्यात मीठ , लाल तिखट , हळद, खायचा सोडा , १ चिमट हिंग , भाजके जिरे किंवा जिरे पावडर घालावे . 
५. ओवा दोन्ही तळहाताच्या मध्ये चोळून घ्यावा अन मगच कांद्यात घालावा . त्यामुळे त्याचा जास्त वास येईल .
६. हे मिश्रण हलवून एकजीव करावे . 
७. झाकली लावून १५ मिनिट ठेवून द्यावे . 
८. १५ मिनिटांनी मिठामुळे कांद्याला चांगले पाणी सुटलेले दिसेल . 
९. त्यात एक एक चमचा करत चणाडाळीचे पीठ घालून हलवत राहणे . 
भजीचे पीठ भिजवण्यास पाणी वापरू नये 
१०. हाताने मळून पीठ एकजीव करून घ्यावे . 
११. भजीचे पीठ १० मिनिटे झाकून ठेवावे . 
१२. तळण्यासाठी तेल तापत ठेवा . भाजी पूर्ण बुडतील इतपत तेल कढईत असावे . तळण्यासाठी नेहमीच खोलगट कढई वापरावी . कमी तेलात भजी पूर्ण बुडते .  
१३.  काढलेल्या तेलात हाताच्या चार बोटानी भजीचे पीठ तेलात सोडावे . 
१४.  मंद आचेवर भजी तळाव्या म्हणजे आतून कच्च्या रहात नाहीत . मोठ्या आचेवर तळल्यास आतून कच्च्या राहतात व बाहेरून पटकन करपतात. 
१५ . भजी तळून झाल्यावर त्याच तेलात हिरव्या मिरच्या ही अखंड तळून घ्या . थंड झाल्यावर एकावर मिठामध्ये घोळवून घ्या .   
१६ . गरम गरम भजी तळलेल्या  मिरची सोबत आणि सुक्या खोबऱ्याच्या चटणीसोबत खायला मस्त लागते . 

टीप :
१. कांदा अगदी पातळ कापावा . जाड कापल्यास तो भजीत कुरकुरीत लागत नाही .     
२. कांदा एकजीव होण्या इतपतच बेसन घालावे . बेसन जितके कमी तितक्या भजी चांगल्या होतात . 
३. पीठ भिजवण्यास अजिबात पाणी वापरू नये . भजी मऊ होतात . कांद्याला सुटलेल्या पाण्यातच हत्येने मळून पीठ भिजवावे  . 
४. बऱ्याच ठिकाणी भजीसोबत मिरच्या उकडून देतात . पण तळलेल्या मिरचीची चव उकडल्याहून छान लागले . 

~ अमृता .. 

Thursday 12 April 2018

कॉर्नफ्लेक्स भेळ / Corn flakes bhel

परवा संध्याकाळी खूप भूक लागली आणि जिभेलाही काहीतरी चटपटीत हवं होत . 
पटकन जाऊन कोल्हापूर ची राजाभाऊ भेळ खाऊ असा वाटायला लागलं . पण मी हा पल्ला गाठेतोवर कोल्हापूरकरांनी सकाळ उजाडली असती . :) आणि भडंगही अशी आणीवेळी संपलेली असते  

मग काय .... घरी असलेल्या प्लेन  कॉर्नफ्लेक्सची भेळ बनवली .छान जिभेचे चोचले पुरवेल अशी चटपटीत झाली .     

साहित्य :
१ मोठा बाऊल कॉर्नफ्लेक्स (without honey)
१ कांदा बारीक चिरून 
१/२ टोमॅटो बारीक चिरून 
१/२ कप काकडी बारीक चिरून 
कोथिंबीर बारीक चिरून 
१/२ लिंबाचा रस 
बारीक शेव 
खारी बुंदी
१ वाटी भाजके शेंगदाणे सोलून   
हिरवी चटणी (कृती खालील प्रमाणे)
खजूर चिंचेची गोड चटणी (ऐच्छिक ) कृतीसाठी इथे क्लिक करा
चाट मसाला १ चमचा 
मीठ , साखर चवीनुसार 

हिरवी चटणी कृती :

१. ४ हिरव्या मिरच्या , २ लसूण पाकळ्या ,१/४ कप चिरलेला कांदा पॅनमध्ये १ चमचा तेलावर भाजून घ्या . 
२.  कोथिंबीर , मीठ आणि पॅनमधील  भाजलेले साहित्य एकत्र करून मिक्सरमधून फिरवून बारीक करून घ्या . 
३. ही चटणी मिक्सरमध्ये वाटताना पाणी वापरू नये . 

कॉर्नफ्लेक्स भेळ ची कृती :

१. एका मोठ्या भांड्यात कॉर्नफ्लेक्स काढून घ्या . 
२. त्यात चिरलेला कांदा , टोमॅटो,काकडी,कोथिंबीर , भाजके शेंगदाणे , खरी बुंदी, बारीक शेव  घाला . 
३. १/२ लिंबाचा रस , १ चमचा चाट मसाला  , १ चमचा हिरवी चटणी, खजूर चिंचेची गोड चटणी  घाला . 
४. चवीनुसार  मीठ आणि साखर घालून हलवून एकजीव करा . 
५.  सर्व्ह करताना वरून अजून थोडी शेव घाला . 

टीप : यामध्ये खजूर चिंचेची गोड चटणी  घातली तर भेळ  आणखीन  छान  होते . 

~ अमृता .. 

Popular Posts