Thursday 19 April 2018

मसाला टोस्ट / Masala Toast

संध्याकाळी बागेतून खेळून आल्यावर या आपल्या बच्चे कंपनीला खूप भूक लागते . 
पण पोळी भाजीला आधीच लाल सिग्नल मिळालेला असतो . 
मग डोक्यात चक्र सुरु होतात . आज काय बनवून ठेवायचं संध्याकाळसाठी .  
मसाला टोस्ट हा लहान मुलांना पटकन आवडेल असा पदार्थ . 
आणि आईलाही खूप वेगळं काही नाही करावं लागत. 
मग आई ही खुश आणि मुलंही 


साहित्य :

बटाट्याच्या stuffing  साठी 
२ बटाटे उकडून 
१ इंच आल्याची पेस्ट 
१ कांदा बारीक चिरून 
२ हिरव्या मिरच्या वाटून 
फोडणीसाठी तेल , हिंग, हळद 
चवीनुसार मीठ , साखर 

टोस्ट साठी 
२ व्हाईट ब्रेड 
बटर 

हिरव्या  चटणीसाठी 
१ वाटी कोथिंबीर निवडून धुवून 
२ लसूण पाकळ्या 
२ हिरव्या मिरच्या 
१ चमचा लिंबाचा रस 
मीठ 
४ ते ५ पुदिन्याची पाने धुवून  


कृती:  
हिरव्या चटणीची कृती : 

१. १ वाटी कोथिंबीर , सोललेल्या २ लसूण पाकळ्या ,२ हिरव्या मिरच्या,१ चमचा लिंबाचा रस , पुदिन्याची पाने आणि चवीनुसार मीठ घालून मिक्सरमधून वाटून घ्यावे 
२. वाटताना गरज पडली तरच पाणी घालावे 
३. हिरवी चटणी घट्ट झाली तर टोस्ट ला लावताना सोपी जाते . 
४. खजूर चिंचेची गोड चटणी कृतीसाठी इथे क्लिक करा

बटाट्याचे stuffing :

१. २ बटाटे कुकरमधून उकडून घ्यावे . 
२. थंड झाल्यावर सोलून मॅश करून घ्यावे .
३. १ इंच आले आणि हिरव्या मिरच्या वाटून घ्याव्या . 
४. १ कांदा बारीक कापून घ्यावा . 
५. फोसणीसाठी गरम करत ठेवलेल्या तेलात जिरे घालावे . 
६. तडतडल्यानंतर कांदा घालून २ मिनिट भाजून घ्यावा . 
७. हळद , हिंग , वाटलेले आले मिरची घालून १ मिनिट परतून घ्यावे . 
८. मॅश केलेलं बटाटे घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे .   
९. २ मिनिट मंद आचेवर शिजू द्यावे . 

मसाला टोस्ट : 

१. दोन्ही बाजूस बटर लावून २ व्हाईट ब्रेड  नॉनस्टिक पॅनमध्ये भाजून घ्यावे 
(टोस्टर असल्यास पॅनवर भाजण्याची गरज नाही . ब्रेडमध्ये बटाट्याचे मिश्रण आणि चटणी भरून टोस्टरमध्ये ठेवावे . )
२. भाजलेल्या एका ब्रेडवरहिरवी चटणी पसरून घ्यावी . 
३. त्यावर बटाट्याच्या भाजीचे मिश्रण चमच्याने भरून घ्यावे . 
४. त्यावर कांद्याचे २ पातळ गोल अखंड काप ठेवावे . 
५. भाजलेला दुसरा ब्रेड त्यावर ठेवून दाबून बसवावा . 
६. सर्व्ह करताना हे मसाला टोस्ट पुन्हा एकदा तव्यावर गरम करावे . 
७. ब्रेडला मधून कापून त्रिकोणी आकार द्यावा . वरून थोडी बारीक शेव घालावी . 
८. खजूर चिंचेच्या  गोड चटणी सोबत किंवा टोमॅटो सॉस सोबत घरं गरम खायला द्यावे .  

खजूर चिंचेची गोड चटणी कृती साठी इथे क्लिक करा

टीप :
 घरी बटाट्याची पिवळी भाजी खूप उरली असेल तर ती मॅश करून टोस्ट मध्ये भरली तरी चालते 

~ अमृता .. 

No comments:

Post a Comment

Popular Posts