Sunday 8 July 2018

चिंचेचा रस्सा / Tamarind Rassa/ Tamarind Curry

चिंच आणि आंबट पदार्थांची आवड असणाऱ्यांसाठी चिंचेचा रस्सा एकदम खास .. 
करायला सोपा , झटपट होणार आणि चवीला चटपटीत 

साहित्य : 

१ कप पिकलेल्या चिंचेचा कोळ 
२ पाकळ्या लसूण 
फोडणीसाठी तेल 
जिरे मोहरी
लाल मिरची पावडर 
१ सुकी मिरची 
मीठ , साखर 
१/२ चमचा हिंग 

कृती :

१. १ मूठ पिकलेली चिंच कोमट पाण्यात २ तास भिजवून तिचा कोळ काढून घ्या . 
२. फोडणीसाठी तेल गरम करा . 
३. त्यात १/२ चमचा जिरे मोहरी घाला . 
४. सोललेल्या लसणाच्या पाकळ्या ठेचून, १ सुकी मिरची  घाला . 
५. चिंचेचा कोळ घालून झाकली बंद करा . अशाने फोडणीचा वास जाणार नाही . 
६. अर्ध्या मिनिटाने झाकणी उघडून त्यात चवीनुसार मीठ , २ चमचे साखर , १ चमचा लाल मिरची पावडर, १/२ चमचा हिंग  घालून  एक उकळी काढा . 
७. मंद आचेवर २ मिनिट शिजवून घ्या . 
८. चिंचेचा हा रस्सा गरम भातासोबत खायला छान लागतो . 

टीप :
पित्ताचा त्रास असणाऱ्यांनी हा पदार्थ कमी प्रमाणात खावा .

~ अमृता ..  

No comments:

Post a Comment

Popular Posts