Wednesday, 25 July 2018

व्हेजिटेबल पुलाव / Vegetable Pulao


साहित्य : 

२ वाट्या अख्खा बासमती तांदूळ
१ चमचा जिरे
१ मोठा चमचा तेल
१ इंच दालचिनी
२ लवंग
१ तमालपत्र
२ हिरवे वेलदोडे
चवीनुसार  मीठ
१ गाजर
१/ २ कप वाटण्याचे दाणे
१ शिमला मिरची
कोथिंबीर चिरून

कृती : 

१ . बासमती तांदुळ धुवून पाणी निथळून घ्या . १/२ तास भिजण्यास ठेवून द्या .
२. एका मोठ्या भांड्यात फोडणीसाठी १ मोठा चमचा तेल गरम करा .
३. त्यात जिरे , लवंग , दालचिनी , तमालपत्र , वेलदोडे घाला .
४. गाजर आणि शिमला मिरचीचे चोथे उभे काप घाला .
५. १/२ कप वाटण्याचे दाणे घाला .
६. बासमती तांदूळ घालून पूर्ण हलका होईतोवर भाजून घ्या .
७. तांदळाच्या १ १/२ पट गरम पाणी घाला .
८. चवीनुसार मीठ घाला .
९. मोठ्या आचेवर एक उकळी काढा .
१०. नंतर हा पुलाव माध्यम आचेवर शिजवा .
११. पुलाव पूर्ण शिजला कि भातावर हात दाबल्यास बोटाना चिकटयाचा बंद होतो .
१२. १/२ चमचा तूप घाला .
१३. चिरलेली कोथिंबीर घालून हलकेच हलवा . पुलाव हलवताना त्याची शिते मोडणार नाहीत याची काळजी घ्या .

~ अमृता ..


घराच्या घरी लसूण पनीर / Homemade Garlic Flavour Paneer with step by step pictures



साहित्य :
१ लिटर दूध
१ चमचा लिंबाचा रस / १ चमचा व्हिनेगर
१ पेला साधे पाणी
४ पेले थंडगार पाणी
१/२ चमचा किसलेले लसूण  (ऐच्छिक)

कृती :

१. १ लिटर दूध एका मोठ्या भांड्यात पूर्ण उकळून घ्या .

२. उकळलेले दूध गॅसवरून उतरून घ्या .
३. त्यात १ चमचा लिंबाचा रस / १ चमचा व्हिनेगर आणि १/२ चमचा किसलेले लसूण  घालून हलवून घ्या .
४. ३ ते ४ मिनिटे हलवत राहा . दूध पूर्ण फाटून पाणी आणि घट्ट फटाके दूध वेगळे दिसू लागेल .

५. एका स्वच्छ सुती  कापडात हे मिश्रण ओता .
६. १ पेला पाणी ओतून स्वच धुवून घ्या .
७. कापड गच्चं पिळून गाणी काढून घ्या .

८. एका मोठ्या पसरत भांड्यात ४ पेले थंड पाणी घ्या . आता हे अर्धवट कोमट पिळलेले सुती  कापडातील मिश्रण थंड पाण्यात १ मिनिट कापडासहित बुडवून ठेवा .
९. पुनः एकदा पिळून घ्या .
१०. आता हे मिश्रण घट्ट झालेले असेल . त्याचा पनीर तयार होईल  . त्याला एकत्र करून चौकोनी आकार देऊन घ्या .

११. पुन्हा चौकोनी पनीर भोवती कापड गुंडाळून घ्या .
१२. त्यावर वजनाने जड, तळाशी पसरट वस्तू ठवून द्या . १० मिनिटांनी पनीर चैकोनी आकारात घट्ट बसेल .
13. त्याचे लहान काप करून घ्या .


१३. बाहेरच्या पनिरपेक्षा घरी केलेला पनीर मऊ आणि चवीला छान लागतो .
१४. फ्रिजमध्ये ठेवून पुढे ४ दिवस वापरता येतो .

टीप :
१. हे पनीर किसलेले लसूण न घालताही करता येते .
२. इतर आवडीचे फ्लेवर घालूनही हे पनीर बनवू शकता .
३. लसूण पनीर हा भाजी , बिर्याणीसारख्या तिखट पदार्थांसाठी वापरू शकता .
४. गोड पदार्थ बनवायचा असेल तर लसूण न घालता वरील प्रमाणे साधे पनीर बनवता येते .

~ अमृता .. 

बाकरवडी / Bakarwadi with step by step pictures





साहित्य :

२ कप मैदा 
२ मोठे चमचे छान डाळीचे पीठ (बेसन)
२ चमचे तेल 
चवीनुसार मीठ 
१/२ चमचा ओवा, १/२ चमचा जिरे  
१/२ चमचा लाल मिरची पावडर 
१/४ हळद  

सारणासाठी :
१ वाटी किसलेले सुके खोबरे 
१ चमचा आल्याची पेस्ट 
२ मोठे चमचे लसूण किसून 
४ मोठे चमचे बारीक शेव
१ मोठा चमचा तीळ 
१ मोठा चमचा बेसन 
१ छोटा चमचा बडीशेप 
चवीनुसार मीठ 
१ छोटा चमचा धने पूड / धने 
१ चमचा गरम मसाला 
१ चमचा लाल मिरची पावडर 
२ चमचे पिठी साखर 
बारीक चिरलेली कोथिंबीर  
१/२ लिंबाचा रस

कृती :

बाकरवडीच्या वरच्या आवरणाचे कणिक :

१. २ कप मैदा आणि २ मोठे चमचे बेसन कोरडे एकत्र करून घ्या .
२. त्यात चवीनुसार मीठ , १/२ चमचा ओवा, १/२ चमचा जिरे  ,१/२ चमचा लाल मिरची पावडर ,१/४ हळद घालून एकत्र करा .
३. २ मोठे चमचे कढलेले तेल घाला .
४. आवश्यक तितके पाणी घालून पीठ घट्ट मळून घ्या .
५. ओला कापडा झाकून ३० मिनिटे कणिक भाजू द्या .  

बाकरवडीचे सारण: 
१. १ वाटी  सुके खोबरे बारीक किसून घ्या . तव्यावर भाजून घ्या . 
२. १ मोठा चमचा बेसन  भाजून घ्या . 
३. १ मोठा चमचा तीळ  आणि १ छोटा चमचा बडीशेप भाजून घ्या .
४. वरील सर्व जिन्नस एकत्र करा .   
५. त्यात १ चमचा आल्याची पेस्ट, २ मोठे चमचे लसूण किसून घाला . 
६. ४ मोठे चमचे बारीक शेव  घाला . 
७. चवीनुसार मीठ,१ चमचा गरम मसाला,१ चमचा लाल मिरची पावडर ,२ चमचे पिठी साखर ,बारीक चिरलेली कोथिंबीर १/४ कप घाला . 
८. १ छोटा चमचा धने पूड / धने भाजून घाला . 
९. १/२ लिंबाचा रस घाला . 
१०. हे सर्व एकजीव करून किंचित चिकटपणा येईतोवर हाताने घट्ट दाबून मळा . 

बाकरवडी :

१. बिजलेल्या कणिकेचा मोठ्या लिंबाएवढा गोळा करून तो लांबट लाटून घ्या . 
२. त्यावर २ -३ थेम्ब पाणी पसरून वरचा भाग ओलसर करून घ्या. 
३. लाटलेल्या बाकरवडीच्या पानावर २ ते ३ मोठे चमचे सारण पसरून घ्या .
४. हाताने दाबून घट्ट बसवून घ्या . 
५. लाटलेल्या पानाचा घट्ट रोल करून घ्या . रोल सैल बसला तर तळताना सारण बाहेर येईल . 
६. रोलचे २ ते ३ सेन्टी मीटरचे काप करून घ्या . 
७. बाकरवडी पूर्ण बुडेल इतके तेल तळण्यासाठी  गरम करून घ्या . 

८. मंद आचेवर बाकरवडी सोनेरी रंग येइतोवर तळून घ्या . बाकरवडी मंद आचेवर तळली तरच कुरकुरीत होते अन्यथा वरचे आवरण मऊ पडते आणि आतील सारण कच्चे राहते . 
९. थंड झाल्यावर हवाबंद डब्यात ठेवाव्यात .  

~ अमृता ..  

Friday, 20 July 2018

पुदिना चटणी / Mint chutney




साहित्य : 

१५ ते २० ताजी पुदिन्याची पाने 
कोथिंबीर 
१ लिंबू 
मीठ 
साखर 
४ पाकळ्या लसूण सोलून 
जिरे 
१/२ कांदा चिरून 

कृती : 

१. पुदीना आणि कोथिंबीर  पाण्याने धुवून घ्या . 
२. लिंबाचा रस काढून घ्या . 
३. साहित्यात लिहिलेल्या सगळ्या वस्तू मिक्सरमध्ये घालून बारीक पेस्ट करा . 
४. मीठ आणि साखर चवीनुसार वापरा . 

टीप : 
जास्त प्रमाणात आणि घट्ट चटणी हवी असल्यास मिक्सरमध्ये लावताना  १ ब्रेडचा तुकडा घाला . 

~ अमृता ..    

चना चाट / Chana chat


साहित्य : 

१ कप मोठे चणे (छोले) उकडून
हिंग , मीठ हळद , ला मिरची पावडर
चिंच गुळाची चटणी
कोथिंबीर पुदिन्याची हिरवी चटणी
दही
१ कांदा बारीक चिरून
१ टोमॅटो बारीक चिरून
कोथिंबीर बारीक चिरून
शेव २ चमचे
चाट मसाला

कृती :

१. १ कप छोले ८ तास पाण्यात भिजत घाला .
२. कुकरमधून उकडून घ्या .
३. मीठ , हिंग , मीठ , हळद ,लाल मिरची पावडर घालून फोडणी द्या .



४. एका मोठ्या बाऊलमध्ये तळाला हे फोडणीचे चणे / छोले घाला .
५. चिंच गुळाची चटणी , पुदिन्याची हिरवी चटणी , दही घाला .

६. बारीक चिरलेला कांदा , टोमॅटो आणि कोथिंबीर घाला .

७. १/२ चमचा चाट मसाला घाला .
८. वरून भरपूर शेव घाला .


~ अमृता

आंब्याचा केक / Mango cake


साहित्य :

१ कप मैदा
२ चमचे बेकिंग पावडर
१ अंडे
१/२ कप पिठी साखर
३ मोठे चमचे बटर
वेलची पूड
१ हापूस आंबा पूर्ण पिकलेला
१/४ कप दूध
ड्रायफ्रूट आवडीनुसार

सजावटीसाठी 
जॅम
आंब्याचे पातळ काप
आवडीची फळे

कृती :

१. एका भांड्यात १ कप मैदा आणि २ चमचे बेकिंग पावडर एकत्र करून घ्या .
२. एका मोठ्या बाऊलमध्ये १ अंडे फोडून घ्या

३. . ते फुगून येईतोवर ३ ते ४ मिनिटे फेटून घ्या .
४. फेटलेल्या अंड्यात १/२ काप पिठी साखर आणि ३ चमचा बटर घाला .

५. मिश्रण अंदाजे ५ मिनिट फेटून घ्या .
६. ह्या फेटलेल्या मिश्रणात मैदा आणि बेकिंग पावडरचे मिश्रण १ -१  चमचा घालत फेटत राहा .
७. मैदा पूर्ण घालून करून झाल्यावर १/४ कप थंड दूध घाला.
८. १० मिनिट मिश्रण एकाच बाजूने फेटून घ्या .

९. १/२ आंब्याचा गर काढून त्याची मिक्शरमधून पेस्ट करून घ्या .
१०. ही पेस्ट या मिश्रणात घालून पुन्हा ५ मिनिट फेटून घ्या .
११. उरलेल्या आंब्यांपैकी अर्ध्या आंब्याचे छोटे काप करून मिश्रणात टाका .
१२. आवडीनुसार ड्रायफ्रूट घाला .

१३. मिश्रण अजून एकवार चांगले फेटून घ्या

बेकिंग :
१. ओव्हन १०० डिग्रीला २ ते ३ मिनिट प्रीहीट करून घ्या .
२. केक ज्या भांड्यात करणार ते ही भांडे ओव्हनमधून प्रीहीट करून घ्या .
३. या भांड्याला तळाला बटर पेपर लावून घ्या .
   बटर पेपर नसेल तर तळाला बटर लावून घ्या
४. फेटलेले मिश्रण भांड्यात ओता .

ओव्हन नसेल तर केक कुकरमध्येही करता येतो . त्यासाठी खालील टीप वाचा . 
५. ओव्हनमध्ये १५० डिग्री तापमानाला ३० मिनिट ठेवून द्या .
६. ३० मिनिटांनी केक चे भांडे बाहेर काढून तो पूर्ण बेक झाल्याची खात्री करून घ्या .
त्यासाठी केक च्या मध्यभागी सूरी पूर्ण खालीपर्यंत घालून पुन्हा वर काढा . सुरीला काहीही न चिकटता ती स्वच्छ अली पाहिजे .
सूरीला लागून मैदा थोडाजरी आला असेल तर अजून २ मिनिट बेक करा . पुन्हा एकदा चेक करा .

७. बेक झालेला केक १० मिनिट पूर्ण थंड होऊ द्या .

८. कडांनी सूरी पुरवून कडा भांड्यापासून सोडवून घ्या .
९. भांडे उलटे करून केक काढून घ्या .

१०. पूर्ण फुगलेला केक भांड्यातून अलगद  बाहेर येईल.
११. फुगलेली बाजू वर येण्यासाठी केक पुन्हा एकदा प्लेटमध्ये उलटा  करा .

१२. जॅम , आंब्याचे काप , आवडीची फळे लावून सजवून घ्या .  

टीप : 

१. ओव्हन नसेल तर हा केक कुकरमध्ये ही करता येतो .
२. कुकरमध्ये तळला मीठ घालून ५ मिनिट कुकर गरम करून घ्या .
कुकर गरम करण्याआधी त्याची शिटी बाजूला काढून ठेवा .
३. कुकरच्या भांड्याला बारात लावून केकचे मिश्रण त्यात ओता .
४. गरम कुकरमध्ये एक छोटी  वाटी उपडी ताण आणि त्यावर केकचे हे भांडे ठेवा .
५. यामुळे केळीच्या भांड्याला गॅसची जास्त उष्णता लागणार नाही .
६. झाकणी लावून ३० मिनिटे  ठेवून द्या .
७ बाकी कृती वरील प्रमाणे 

Wednesday, 18 July 2018

Mint Sharbat / पुदीना शरबत

I have so much of.mind growing in my terrace garden . You no need to take care much of this plant. No need any special efforts . It grows easily and fast .

When you will buy mint next time, use fresh leaves and preserve mint stem which have little roots growing along .

Just push mint root side  stem inside soil from your garden , water it daily and wait.
I was so happy to see tiny mint leaves started showing there beautiful appearance.

They joy of creation is incomparable .  Growing plant teach you to wait , patience and trust that ond day it will come out with green leaves.

Just pluck fresh leaves or cut stem when you want to make any mint dish .  The plant will continue to grow  as previous.

You can use this mint leaves to make chutney, add nice flavour to biryani, Paratha and salads.


Today I made it's sharbat and trust me it tastes awesome.

I used chilled water to make this mint sharbat. You can use Sprite instead to make Mojito

Ingredients

10 fresh mint leaves
Fresh juice of 1 lemon
Salt per taste
3 to 4 spoon sugar
Green cardamom 1
Chilled water

Recipe

1. Wash fresh mint leaves with water.
2. Add mint leaves and cardamom in blender and blend it for 1 minute .
3. Take 3 to 4 glass chilled water.
4. Add mixture from blender.
5. Add lemon juice , sugar .
6. Add salt per taste.
7. Stir it well.
8. Serve chilled mint sharbat .

- Amruta


Sunday, 8 July 2018

कणसाचा चिवडा / Corn chivda



साहित्य :

२ कणीस सोलून दाणे काढून
१ कांदा चिरून
फोडणीसाठी तेल
लाल मिरची पावडर , हळद
 मीठ चवीनुसार
१/२ लिंबाचा  रस

कृती :

१ . कणीस सोलून दाणे काढून घ्यावे .
२. कणसाचे अर्धे दाणे खलबत्त्यात घालून चेचून घ्यावे . चेचाताना दाणे फुटणार नाहीत याची काळजी घ्यावी .
३. उरलेले दाणे एकत्र करावे .
४. भांड्यात २ चमचे तेल गरम करून घ्या .
५. त्यात हे कणसाचे दाणे घालून भाजून घ्या . एका प्लेटमध्ये काढा .
६. याच भांड्यात अजून १ चमचा टेक घालून गरम होऊ द्या .
७. १ कांदा चिरून घाला
८. १/४ चमचा हळद , मीठ चवीनुसार , १ चमचा ला मिरची पावडर घाला .
९. परतून घ्या
१०. लगेचच भाजलेले कणीसाचे दाणे घाला आणि परतून घ्या .
११. हे करताना गॅसची आच मंद ठेवा अन्यथा लाल मिरची पावडर करपते .
१२. १/२ लिंबाचा  रस पिळून गरम गरम खायला द्या .

~ अमृता .. 

चिंचेचा रस्सा / Tamarind Rassa/ Tamarind Curry

चिंच आणि आंबट पदार्थांची आवड असणाऱ्यांसाठी चिंचेचा रस्सा एकदम खास .. 
करायला सोपा , झटपट होणार आणि चवीला चटपटीत 

साहित्य : 

१ कप पिकलेल्या चिंचेचा कोळ 
२ पाकळ्या लसूण 
फोडणीसाठी तेल 
जिरे मोहरी
लाल मिरची पावडर 
१ सुकी मिरची 
मीठ , साखर 
१/२ चमचा हिंग 

कृती :

१. १ मूठ पिकलेली चिंच कोमट पाण्यात २ तास भिजवून तिचा कोळ काढून घ्या . 
२. फोडणीसाठी तेल गरम करा . 
३. त्यात १/२ चमचा जिरे मोहरी घाला . 
४. सोललेल्या लसणाच्या पाकळ्या ठेचून, १ सुकी मिरची  घाला . 
५. चिंचेचा कोळ घालून झाकली बंद करा . अशाने फोडणीचा वास जाणार नाही . 
६. अर्ध्या मिनिटाने झाकणी उघडून त्यात चवीनुसार मीठ , २ चमचे साखर , १ चमचा लाल मिरची पावडर, १/२ चमचा हिंग  घालून  एक उकळी काढा . 
७. मंद आचेवर २ मिनिट शिजवून घ्या . 
८. चिंचेचा हा रस्सा गरम भातासोबत खायला छान लागतो . 

टीप :
पित्ताचा त्रास असणाऱ्यांनी हा पदार्थ कमी प्रमाणात खावा .

~ अमृता ..  

Pineapple Mango smoothie


साहित्य :

१ कप पिकलेले अननसाचे काप 
१/२ पेला आंब्याचा / सफरचंदाचा ज्युस 
२ चमचे साखर 
१/२ चमचा लिंबूचा रस 
१ लहान कप केक चुरा करून 

कृती :

१. साहित्यात दिलेले सर्व पदार्थ एकत्र करा . 
२. मिक्सरमधून बारीक स्मूथी करून घ्या . मिक्सरमध्ये कपकेक घालू नये . 
३. १ लहान कपकेक चा चुरा घालून हलवून घ्या . 
४. सर्व्ह करताना थंड ग्लासच्या कडांना चॉकलेट सॉस टाकून घ्या. 
५. तयार smoothie ग्लासमध्ये भरून घ्या . 
६. वरून अननसाचे काप लावून सजवा. 

टीप : 
Pineapple Mango smoothie बनवताना दूध वापरू नये . अननसाच्या आम्बटपणामुळे दूध फुटू शकते . त्याऐवजी mango / apple ज्युस वापरावा . 

~ अमृता .. 

Popular Posts