कच्छी दाबेली हा गुजरातमधील लोकप्रिय खाद्यपदार्थ आहे. अहो नुसता गुजरातचा काय आपलाही आहेच की आवडीचा :)
गुजरातमधील कच्छ प्रदेशातून जन्माला आल्यामुळे तिचे नाव कच्छी दाबेली
आता दाबेली इतकी अंगवळणी पडलीये ना की हि गुजराती की स्थायिक ... उत्तर देताना जरा बावचळायला होत
लादीपावामुळे तो दिसतो बर्गरसारखा पण त्याची चव खूपच वेगळी आहे. त्याची ही आंबट, गोड , तिखट चव रस्त्यावरून चालता चालता आपल्याला भुरळ पडते .
सगळयांचा लाडका स्ट्रीट फूड आयटम कच्छी दाबेली
६ लादी पाव
४ बटाटे उकडून , सोलून
१ कप शेंगदाणे भाजून सोललेले
१ कप बारीक शेव
द्राक्षे , चेरी
१ मोठा कांदा बारीक चिरून
लाल तिखट
हिंग
गरम मसाला / तयार दाबेली मसाला
कृती :
१. खजूर चिंचेची गोड चटणी तयार करून घ्या . खजूर चिंचेच्या गोड चटणी साठी इथे क्लिक करा .
२. कांदा बारीक कापून त्यात १/२ चमचा चाट मसाला घालून एकजीव करा .
३. भाजके शेंगदाणे फोडून अर्धे करून घ्या .
४. त्यात वरून तिखट मीठ लावून घ्या .
५. द्राक्षे उभे कापून अर्धे करून घ्या .
६. चेरी चे छोटे काप करून घ्या .
दाबेलीच्या आतील स्टफिंग
१. सोलून उकडलेले बटाटे किसणीवर किसून घ्या .
२. पॅन गरम करून त्यात ४ मोठे चमचे खजूर चिंचेची चटणी घाला
३. १/२ चमचा लाल मिरची पावडर , गरम मसाला , जिरे पावडर, हिंग , हळद , चवीनुसार मीठ घालून एक उकळी येऊ द्या .
४. त्यात किसलेले बटाटे घालून हलवून घ्या .
५. हे स्टफिंग मंद आचेवर दोनच मिनिटे शिजवून घ्या .
६. थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून जाडसर पसरून घ्या .
७. त्यावर कापलेले द्राक्षे , चेरीज , मसाले शेंगदाणे , शेव पसरून दाबून घ्या .
८. हे स्टफिंग १० मिनिट थंड होऊ द्या .
दाबेलीची कृती :
१. लादीपाव सुरीने मध्यभागी कापून घ्या .
२. तयार केलेलं स्टफिंग त्यात चमच्याने भरून घ्या .
३. त्यावर चिरलेला कांदा, शेव आणि अजून शेंगदाणे घालून पाव बंद करून हाताने दाबून घ्या .
४. एका नॉनस्टिक पॅनमध्ये १ चमचा बटर घालून लादीपाव दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्या .
५. भाजलेल्या पावाच्या कापलेल्या तीनही बाजू गॉड चटणीमधे बुडवून बारीक शेवेवरून घोळून घ्या . अशाने शेव वरच्या बाजूसही चिकटेल
६. वरून पुन्हा थोडा कांदा , शेव आणि शेंगदाणे घालून गरम गरम कच्छी दाबेली सर्व्ह करा . .
No comments:
Post a Comment