Monday, 6 August 2018

रगडा पुरी चाट / रगडा चाट / Ragda Poori Chaat / Ragda Chaat


१ प्लेटसाठी रगडा पुरीसाठी साहित्य :

८ पाणी पुरीच्या पुऱ्या 
१ कांदा बारीक चिरून 
१ टोमॅटो बारीक चिरून 
१ वाटी बारीक शेव 
कोथिंबीर बारीक चिरून 
१ बटाटा उकडून 
१ वाटी चिंच गुळाची गोड  चटणी 

रगडा बनवण्यासाठी लागणारे साहित्य : 

१ कप पांढरे / हिरवे  कडक वाटाणे 
चवीनुसार मीठ 
१/४ चमचा हळद 
१/२ चमचा लाल मिरची पावडर , गरम मसाला 
१ लसणाची पाकळी 
१/२ चमचा लिंबाचा रस
१/२ कांदा उभा चिरून   


रगडा बनवण्याची कृती : 

१. १ कप पांढरे / हिरवे कडक वाटाणे रात्रभर पाण्यात भिजत घालावे . 
२. भिजल्यानंतर पाण्यातून उपसून घ्या . 
३. वाटण्यात १/४ चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालून  कुकरमध्ये ४ शिट्ट्या करून वाटणे उकडून घ्या . 
४. एका भांड्यात फोडणीसाठी १ चमचा तेल गरम करा .
त्यात लसणाची पाकळी ठेचून घाला . १/२ चमचा लिंबाचा रस घाला .
५. उकडलेले वाटणे घाला . 
६. १/२ चमचा गरम मसाला आणि लाल मिरची पावडर घाला . 
७. गरंज पडल्यास १/२ चमचा साखर घाला . 
८. मध्यम आचेवर उकळी काढून  घ्या . 
  

रगडा पुरी : 


१. एका प्लेटमध्ये पाणी पुरीच्या पुऱ्यांचा चुरा करून घ्या . 
उकडलेल्या बटाटा मॅश करून वर घाला  .  
२. त्यावर २ मोठ्या पळ्या गरम गरम रगडा घाला . रगड्याने पुऱ्या पूर्ण झाकल्या गेल्या पाहिजे . 
३. चिरलेला कांदा आणि टोमॅटो पसरून घ्या  .
४. १ पळी चिंच गुळाची पातळ चटणी पसरून घ्या . 
५. बारीक शेव पसरून घ्या . 
६. वरून चिरलेली कोथिंबीर घाला .


~ अमृता ..   

पाणी पुरीच्या पुऱ्या / Golagappa Poori / Pani Poori / Puri with step by step pictures


साहित्य :

१ कप रवा
२ चमचे मैदा / गव्हाचे पीठ
चवीनुसार मीठ
सोड्याचे पाणी / साधे पाणी
बेकिंग पावडर १/४ चमचा
 तळण्यासाठी तेल

कृती :

१.  कप रवा, मैदा, मीठ  आणि बेकिंग पावडर कोरडे एकत्र करून घ्या .
२.  गरजेनुसार  सोड्याचे पाणी / साधे पाणी  थोडे थोडे घालत मळून घ्या .

३. मळताना रवा हाताने दाब देऊन मऊ करून घ्यावा.
४. मळलेला रव्यावर ओले कापड झाकून  १/२ तास ठेऊन द्या .
५. अर्ध्य तासाने करवंदाइतके लहान गोळे करून घ्या .
खालील फोटोमध्ये आकाराचा अंदाज येण्यासाठी बाजूला मोठी लसूण पाकळी  ठेवली  आहे .

६. पातळ पुऱ्या लाटून घ्या . पुऱ्या लाटताना लाटण्याला आणि पळपाटाला तेल लावून घ्या . कोरडे पीठ लावू नये .

७. लाटलेल्या पुऱ्या ओल्या कापडाने झाकून घ्या .
८. एका मोठ्या भांड्यात पुऱ्या बुडतील इतके तेल कडकडीत गरम करून घ्या .
९. तेल कडल्यानंतर गॅस बंद करा .
१०. एक एक पुरी चमच्याने दाबून तळून घ्या . चमच्याने दाबल्याने ती फुगून येईल .
मोठ्या आचेवर तळल्यास पुऱ्या थंड झाल्यावर नरम पडतात . पुऱ्या कडक राहण्यासाठी मंद आचेवर / गॅस बंद करून गरम तेलात तळाव्या .
११. थंड झाल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवा .
१२. ह्या पुऱ्या ८ दिवस वापरता येतात .

टीप :
पुऱ्या थंड झाल्यावर नरम झाल्यास ओव्हनमध्ये १०० डिग्री टेम्परेचर ला १० मिनिटे  ठेवाव्या . कडक होतात .  
~ अमृता .. 

Popular Posts