१ प्लेटसाठी रगडा पुरीसाठी साहित्य :
८ पाणी पुरीच्या पुऱ्या
१ कांदा बारीक चिरून
१ टोमॅटो बारीक चिरून
१ वाटी बारीक शेव
कोथिंबीर बारीक चिरून
१ बटाटा उकडून
१ वाटी चिंच गुळाची गोड चटणी
रगडा बनवण्यासाठी लागणारे साहित्य :
१ कप पांढरे / हिरवे कडक वाटाणे
चवीनुसार मीठ
१/४ चमचा हळद
१/२ चमचा लाल मिरची पावडर , गरम मसाला
१ लसणाची पाकळी
१/२ चमचा लिंबाचा रस
१/२ कांदा उभा चिरून
रगडा बनवण्याची कृती :
१. १ कप पांढरे / हिरवे कडक वाटाणे रात्रभर पाण्यात भिजत घालावे .
२. भिजल्यानंतर पाण्यातून उपसून घ्या .
३. वाटण्यात १/४ चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालून कुकरमध्ये ४ शिट्ट्या करून वाटणे उकडून घ्या .
४. एका भांड्यात फोडणीसाठी १ चमचा तेल गरम करा .
त्यात लसणाची पाकळी ठेचून घाला . १/२ चमचा लिंबाचा रस घाला .
५. उकडलेले वाटणे घाला .
६. १/२ चमचा गरम मसाला आणि लाल मिरची पावडर घाला .
७. गरंज पडल्यास १/२ चमचा साखर घाला .
८. मध्यम आचेवर उकळी काढून घ्या .
रगडा पुरी :
१. एका प्लेटमध्ये पाणी पुरीच्या पुऱ्यांचा चुरा करून घ्या .
उकडलेल्या बटाटा मॅश करून वर घाला .
२. त्यावर २ मोठ्या पळ्या गरम गरम रगडा घाला . रगड्याने पुऱ्या पूर्ण झाकल्या गेल्या पाहिजे .
३. चिरलेला कांदा आणि टोमॅटो पसरून घ्या .
४. १ पळी चिंच गुळाची पातळ चटणी पसरून घ्या .
५. बारीक शेव पसरून घ्या .
~ अमृता ..
No comments:
Post a Comment