Saturday 25 July 2020

रोग प्रतिकारक शक्ती काढा


 रोग प्रतिकारक शक्ती काढा:

- 1 ग्लास पाणी

- अडीच इंच दालचिनी

- 5 काळी मिरी

- 3 लवंग

- 2 वेलदोडे

- अर्धा इंच आले

- अर्धा चमचा हळद

- 8 ते 10 तुळशीची पाने 

- 2 ते 3 गवती चहा

- चवीसाठी थोडासा गुळ / मध

*कृती:*

१. लवंग, दालचिनी, वेलदोडे, काळी मिरी मिक्सरमधून वाटून घ्या.

२. १ ग्लास पाणी उकळत ठेवा.

३. त्यात १/२ चमचा बारीक केलेला मसाला घाला. 

४. १/२ चमचा हळद घाला.

५.  आले किसून घ्या. पाण्यात घाला.

६. तुळशीची पाने आणि गवती चहा घाला.

७. साधारण ३-४ मिनिट उकळू द्या.

८. चवीसाठी मध / साखर घाला.

१०. काढा गाळून घ्या.

११. गरम गरम काढा प्यायला द्या.

हा काढा  रोगप्रतिकार क्षमता वाढविण्यासाठी खूप फायदेशीर आहे.

Wednesday 20 May 2020

ब्रेड बॉल्स

ही रेसिपी मी माझ्या मोठ्या बहिणीकडून शिकली आहे . अगदी फोटो ही तिचेच आहेत . 
Thank you दिदी (नेहा मंडलिक )


साहित्य

वाटण करण्या साठी
 1 वाटी ओल्या खोबर्याचा चव-  अर्धी वाटी
चिरलेली कोथिंबीर 
पुदीना 5/7 पाने 
कढीपत्ती 5/7 पाने  
जीरे 1 छोटा चमचा  
हिरवी मिरची आवडीनुसार  2/3  चमचे
मीठ चिमूटभर 
साखर

इतर
ब्रेड स्लाइस
थंड जाडसर दही
काळे मीठ
मिरची पावडर
बारीक चिरलेली कोथिंबीर

कृती

१. सर्व मिश्रण मिक्सरला थोडे फिरवून घ्या बारीक वाटण नको

२. दही साखर व मिठ घालून पळीने घालण्याइतके एकसारखे करून थंड करायला ठेवा.

३. ब्रेडची कडा काढलेली स्लाईस पाण्यात ओलीकरून हलकेच पाणी काढून घ्या.



४. मधोमध सारण घालून चारी बाजूनी बंद करत गोल लाडू  Boll बनवा.



५. डीशमध्ये दोन Boll ठेवून वरून भरपूर थंड दही घाला चाट मसाला काळे मिठ व मिरची पावडर भुरभुरा वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.

६ कलरफूल छान दिसतात.



~ अमृता

Monday 6 August 2018

रगडा पुरी चाट / रगडा चाट / Ragda Poori Chaat / Ragda Chaat


१ प्लेटसाठी रगडा पुरीसाठी साहित्य :

८ पाणी पुरीच्या पुऱ्या 
१ कांदा बारीक चिरून 
१ टोमॅटो बारीक चिरून 
१ वाटी बारीक शेव 
कोथिंबीर बारीक चिरून 
१ बटाटा उकडून 
१ वाटी चिंच गुळाची गोड  चटणी 

रगडा बनवण्यासाठी लागणारे साहित्य : 

१ कप पांढरे / हिरवे  कडक वाटाणे 
चवीनुसार मीठ 
१/४ चमचा हळद 
१/२ चमचा लाल मिरची पावडर , गरम मसाला 
१ लसणाची पाकळी 
१/२ चमचा लिंबाचा रस
१/२ कांदा उभा चिरून   


रगडा बनवण्याची कृती : 

१. १ कप पांढरे / हिरवे कडक वाटाणे रात्रभर पाण्यात भिजत घालावे . 
२. भिजल्यानंतर पाण्यातून उपसून घ्या . 
३. वाटण्यात १/४ चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालून  कुकरमध्ये ४ शिट्ट्या करून वाटणे उकडून घ्या . 
४. एका भांड्यात फोडणीसाठी १ चमचा तेल गरम करा .
त्यात लसणाची पाकळी ठेचून घाला . १/२ चमचा लिंबाचा रस घाला .
५. उकडलेले वाटणे घाला . 
६. १/२ चमचा गरम मसाला आणि लाल मिरची पावडर घाला . 
७. गरंज पडल्यास १/२ चमचा साखर घाला . 
८. मध्यम आचेवर उकळी काढून  घ्या . 
  

रगडा पुरी : 


१. एका प्लेटमध्ये पाणी पुरीच्या पुऱ्यांचा चुरा करून घ्या . 
उकडलेल्या बटाटा मॅश करून वर घाला  .  
२. त्यावर २ मोठ्या पळ्या गरम गरम रगडा घाला . रगड्याने पुऱ्या पूर्ण झाकल्या गेल्या पाहिजे . 
३. चिरलेला कांदा आणि टोमॅटो पसरून घ्या  .
४. १ पळी चिंच गुळाची पातळ चटणी पसरून घ्या . 
५. बारीक शेव पसरून घ्या . 
६. वरून चिरलेली कोथिंबीर घाला .


~ अमृता ..   

पाणी पुरीच्या पुऱ्या / Golagappa Poori / Pani Poori / Puri with step by step pictures


साहित्य :

१ कप रवा
२ चमचे मैदा / गव्हाचे पीठ
चवीनुसार मीठ
सोड्याचे पाणी / साधे पाणी
बेकिंग पावडर १/४ चमचा
 तळण्यासाठी तेल

कृती :

१.  कप रवा, मैदा, मीठ  आणि बेकिंग पावडर कोरडे एकत्र करून घ्या .
२.  गरजेनुसार  सोड्याचे पाणी / साधे पाणी  थोडे थोडे घालत मळून घ्या .

३. मळताना रवा हाताने दाब देऊन मऊ करून घ्यावा.
४. मळलेला रव्यावर ओले कापड झाकून  १/२ तास ठेऊन द्या .
५. अर्ध्य तासाने करवंदाइतके लहान गोळे करून घ्या .
खालील फोटोमध्ये आकाराचा अंदाज येण्यासाठी बाजूला मोठी लसूण पाकळी  ठेवली  आहे .

६. पातळ पुऱ्या लाटून घ्या . पुऱ्या लाटताना लाटण्याला आणि पळपाटाला तेल लावून घ्या . कोरडे पीठ लावू नये .

७. लाटलेल्या पुऱ्या ओल्या कापडाने झाकून घ्या .
८. एका मोठ्या भांड्यात पुऱ्या बुडतील इतके तेल कडकडीत गरम करून घ्या .
९. तेल कडल्यानंतर गॅस बंद करा .
१०. एक एक पुरी चमच्याने दाबून तळून घ्या . चमच्याने दाबल्याने ती फुगून येईल .
मोठ्या आचेवर तळल्यास पुऱ्या थंड झाल्यावर नरम पडतात . पुऱ्या कडक राहण्यासाठी मंद आचेवर / गॅस बंद करून गरम तेलात तळाव्या .
११. थंड झाल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवा .
१२. ह्या पुऱ्या ८ दिवस वापरता येतात .

टीप :
पुऱ्या थंड झाल्यावर नरम झाल्यास ओव्हनमध्ये १०० डिग्री टेम्परेचर ला १० मिनिटे  ठेवाव्या . कडक होतात .  
~ अमृता .. 

Saturday 28 July 2018

दही वडा / Dahi Vada / North Indian Dahi Bhalle

साहित्य :

१ १/२ कप उडीद डाळ 
२ १/२ कप पाणी 
मीठ 
तळण्यासाठी तेल
साखर 
२ मोठे बाउल दही 
जिरा पावडर 
लाल मिरची पावडर 
कोथिंबीर बारीक चिरून 
चिंच गुळाची गॉड चटणी 


कृती :
 १. १ १/२ कप उडीद डाळ स्वच्छ धुवून २ १/२ कप पाण्यात  ६ तास भिजत ठेवा . 


२. ६ तासांनी त्यातील नाही काढून मिक्सरमधून पेस्ट करून घ्या .
३. चवीनुसार मीठ घाला .

४. एका भांड्यात तळण्यासाठी  तेल गरम करा .
५. तेल पूर्ण तापले की त्यात चमच्याने वडे सोडा . लहान चमच्याच्या मागच्या बाजूने तेलात सोडलेल्या वड्याला मध्यभागी गोलाकार भोक करून घ्या .
६. सोनेरी रंगाचा होईतोवर वडा दोन्ही बाजूनी तळून घ्या .



७. तळलेले वाडे टिशूंपेपरवर काढून घ्या . जास्तीचे तेल  टिशूंपेपरमध्ये ओढले जाईल.
८. एका भांड्यात १/२ कप पाणी घेऊन त्यात १/२ चमचा साखर आणि चवीनुसार मीठ घालून विरघळून घ्या.
९. तळलेले वडे थंड झाले की या पाण्यात घालून १० मिनिटे भिजू द्या .


१०. १० मिनिटं नंतर बोटानी हलके दाबून जास्तीचे पाणी काढून घ्या .

 
दही वड्यासाठी लागणारे दही :
  

१. एका मोठ्या भांड्यात २ बाउल दही काढून घ्या . 
२. त्यात चवीनुसार मीठ , ३ चमचे साखर , १/२ चमचा जिरे पावडर घाला . 
३. १/२ कप पाणी घालून दही चांगले फेटून घ्या . 
४. फ्रिजमध्ये १/२ तास ठेवून थंड करा . 
खजूर आणि चिंचेची गोड चटणी तयार करून घ्या .

दही वडा कसा वाढावा ? 



१. एका मोठ्या बाऊलमध्ये तळला २ पळी दही घालून घ्या . 
२. त्यावर पाण्यातून पिळलेले ३ वडे ठेवा .
३. त्यावर पुन्हा २ पळी दही घाला . 
४. वरून १ मोठा  चमचा  चिंच गुळाची गोड चटणी घाला . 
५. त्या वरून लाल मिरची पावडर भुरभुरा . 
६. सजावटीसाठी वरून कोथिंबीर पेरा .   

~ अमृता .. 

दही मिरची / Curd chillies

साहित्य :

२ मोठे कांदे उभे चिरून
२ हिरव्या मिरच्या उभ्या चिरून
३ चमचे दही
मीठ
फोडणीसाठी तेल
१/४ चमचा हळद

कृती :

१. २ मोठे कांदे उभे चिरून घ्या . फार पातळ काप करू नका अन्यथा करपतात .
२. २ हिरव्या मिरच्या मधून उभ्या चिरून घ्या. मिरच्या शक्यतो तिखट असाव्यात .
३. फोडणीसाठी भांड्यात तेल गरम करा .
४. त्यात चिरलेल्या मिरच्या आणि कांदा घाला .
५. मध्यम आचेवर वाफेवर (पाणी न घालता ) भांड्याला झाकणी लावून कांदा नरम होईतोवर शिजवा .
शिजवताना थोड्या थोड्या वेळाने झाकणी काढून कांदा हलवून घ्या अन्यथा तळाला चिकटून करपतो .  
६ . १/४ चमचा हळद घालून परतून घ्या .
कांदा शिजण्याआधी हळद घालू नये . तो शिजण्यास लागणार वेळ जास्त असल्याने हळद करपू शकते .
७. ही  फोडणी पूर्ण थंड होऊ द्या .
८. थंड झाल्यानंतर त्यात २ चमचे दही आणि चवीनुसार मीठ घालून घालून हलवून घ्या .
९. भाकरीबरोबर खायला दही मिरची छान लागते

~ अमृता ..  

व्हेजिटेबल रवा इडली/ इन्स्टंट रवा इडली / Vegetable Rawa Idli / Instant Rawa Idali with step by step pictures


साहित्य :

१ कप साधा रवा
१/२ कप आंबट ताक
आवश्यकतेनुसार पाणी
मीठ
१ इंच आले किसून
गाजर , कांदा , टोमॅटो बारीक चिरून
१/४ चमचा खायचा सोडा
१/२ हळद ऐच्छिक
कोथिंबीर , हिरवी मिरची
१/४ कप फ्रोझन मटार

कृती :

१ कप साधा रवा , १/२ कप आंबट ताक आणि चवीनुसार मीठ घालून एकजीव करा .
२. आवश्यकतेनुसार पाणी घालून इडलीच्या पिठाइतके घट्टसर पीठ करून घ्या .

३. त्यात बारीक चिरलेला कांदा , टोमॅटो , कोथिंबीर , हिरवी मिरची घाला .

४. १/४ कप फ्रोझन मटार घाला .
५. हे मिश्रण 1/2  तास भिजण्यासाठी ठेवून द्या .

६. १/४ चमचा खायचा सोडा घाला .
८. इडली पात्रात तळाला १ १/२ पाणी घाला ,
९. इडली पात्राच्या स्टँडच्या प्रत्येक खोलगट भागाला  (जिथे इडली करतात ) बोटांनी तेल लावून घ्या .
 इडली पात्राच्या स्टॅण्डमध्ये हे रव्याचे मिश्रण घाला .

१०. मध्यम आचेवर इडली पात्र ठेवून त्यावर झाकणी लावा .
११. ५ मिनिटांनी इडली पूर्ण वाफवल्यावर स्टॅन्ड बाहेर काढा .
१२. चाकूच्या टोकाने इडलीच्या कडा सोडवून घ्या .
१३. इडलीच्या तळाला खोलगट चमचा घालून हलकेच इडली उचलून घ्या .
१४. खोबरीच्या चटणीसोबत खायला द्या .

~ अमृता ..

कडधान्यांचा सँडविच रोल / Sprouts Sandwich Roll with step by step pictures



साहित्य : 

१/२ कप मोड आलेले कडधान्य (मूग , मटकी आवडीनुसार )
१/२ कांदा , १/२ टोमॅटो, बारीक चिरून
 किसलेली काकडी
१/४ चमचा हळद , हिंग , चवीनुसार मीठ
२ ब्रेड चे स्लाइस
१ चमचा टोमॅटो सॉस
१ चमचा हिरवी चटणी

कृती :

१. आपल्या आवडीनुसार कोणतेही कडधान्य  ८ तास भिजत घालावे.
२. भिजलेले कडधान्य पाणी निथळवून ८ तास सुटी कापडात बांधून त्याला मोड येऊ द्या .
३. या मोड आलेल्या कडधान्याला हिंग मिठाची हळद घालून फोडणी घाला .
४. फोडणी थंड झाल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा,  टोमॅटो, काकडी घालून एकत्र करा .
५. २ ब्रेडचे स्लाइस घेऊन त्याच्या कडा कापून घ्या .



६. ब्रेडचा उरलेला मधला भाग लाटण्याने लाटून घ्या .
७. त्यावर१ चमचा हिरवी चटणी  ,  टोमॅटो सॉस पसरून घ्या .

 

८. कडधान्याचे वरील प्रमाणे फोडणी घातलेले मिश्रण ब्रेडवर पसरून घ्या .
कांदा , टोमॅटो, किसलेली काकडी पसरून घ्या .



९. त्याचा रोल बनवून घ्या .


१०. गरम तव्यावर बटर लावून हा रोल सर्व बाजूनी भाजून घ्या .
११. चटणीसोबत गरम गरम खायला द्या.



टीप :
शिल्लक राहिलेली मटकी उसळ ही वापरू शकता .

~ अमृता ..   

रवा उपमा / उपीट / Rawa upama / Upit



साहित्य :

१ कप रवा
१ १/२ कप गरम पाणी
१ चमचा तूप
१ मोठा कांदा बारीक चिरून
१/२ टोमॅटो बारीक चिरून
१ इंच आले किसून
३ हिरव्या मिरच्या बारीक चिरून
कोथिंबीर बारीक चिरून
१ चमचा भिजलेले उडीद
२ चमचे भाजलेले शेंगदाणे
फोडणीसाठी तेल
जिरे १ चमचा
१/४ चमचा हिंग
मीठ चवीनुसार  
सजावटीसाठी
खोवलेले ओले खोबरे
बारीक शेव
फ्रोझन मटार (ऐच्छिक )

कृती :

१. गरम तव्यावर मध्यम आचेवर  रवा खरपूस भाजून घ्या .
रवा भाजताना तव्यावर तेल घालण्याची गरज नाही . भाजताना तो एकसारखा हलवत राहणे गरजेचे आहे अन्यथा तव्याला चिकटून करपू शकतो .  
२. एका भांड्यात रव्याच्या दीडपट पाणी गरम करून घ्या .
३. कढईत फोडणीसाठी २ चमचे तेल गरम करा .
४. तेल गरम झाले की त्यात १ चमचा जिरे घाला .
५. चिरलेला कांदा , टोमॅटो , हिरवी मिरची , कढीपत्ता घाला .
६. कांदा पारदर्शक होईतोवर भाजून घ्या . टोमॅटोचा ही कच्चेपणा जाऊन तो नरम झाला पाहिजे .
७. किसलेले आले , फरोझल मटार घाला, भिजलेली उडीद डाळ घाला .  .
८. भाजके शेंगदाणे लाटण्याने बारीक करून घाला . मिक्सरमधून बारीक केल्यास खूप पूड होते . आपल्याला फक्त त्याचा अख्खेपणा मोडायचा आहे .
९. १/४ चमचा हिंग, चिरलेली कोथिंबीर  आणि चवीनुसार मीठ घाला .
१० आता या मिश्रणात भाजलेला रवा घाला . २ मिनिट पुन्हा सर्व जिन्नस एकावर भाजून घ्या .
११. त्यात रव्याच्या दीडपट घरं पाणी घाला .पाण्याचे प्रमाण जास्त झाले तर उपमा चिकट होतो . पाण्याचे प्रमाण कमी झाले तर उपमा कच्चा राहतो .
१२. माध्यम आचेवर कढईवर झाकणी लावून शिजवून घ्या .
१३. १ चमचा तूप सोडा .
१४.  गरम गरम उपम्यावर किसलेले ओले खोबरे आणि बारीक शेव घालून सर्व्ह करा .

~ अमृता .. 

Wednesday 25 July 2018

राजमा / Rajama with step by step pictures


साहित्य : 

१ वाटी राजमा 
२ मोठे कांदे 
२ मोठे टोमॅटो 
१ लवंग , १/२ इंच दालचिनी , १ तमालपत्र 
१ चमचा आले लसूण पेस्ट 
१ चमचा  लाल मिरची पावडर 
१ चमचा धने जिरे पावडर
१/४ चमचा हळद 
चवीनुसार मीठ 
१/२ चमचा साखर 
१ चमचा बटर , तेल  

कृती : 

१. १ वाटी राजमा ८ तास पाण्यात भिजवावा . 
२. त्यांनतर ४ शिट्ट्या करून कुकरमधून शिजवून घ्यावा .

३. २ मोठे कांदे आणि टोमॅटोची मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्या .  
४. एका मोठ्या भांड्यात फोडणीसाठी १ चमचा तेल गरम करा . 
५. त्यात जिरे , लवंग , दालचिनी , तमालपत्र घाला .
६. कांदा  टोमॅटोची  पेस्ट घालून त्याला तेल सुटेतोवर भाजून घ्या .
७. १/४ चमचा हळद घाला . 
८. १ चमचा आले लसूण पेस्ट घालून भाजून घ्या . 
९. त्यात १ चमचा लाल मिरची पावडर , गरम मसाला , धने जिरे पावडरआणि चवीनुसार मीठ  घाला. 
१०. मसाला पूर्ण भाजला कि मग त्यात शिजलेला राजमा घाला . 
११. राजमा मसाल्यासहीत शिजण्यासाठी तो कुकरमध्ये शिजल्यानंतर शिल्ल्लक राहिलेले पाणी वापरा . 


१२. १/२ चमचा साखर घाला . 
१३. जिरा राईस सोबत किंवा रोटीसोबत गरम गरम राजमा सर्व्ह करा .  



~ अमृता .. 

Popular Posts