साहित्य :
१ कप रवा
२ चमचे मैदा / गव्हाचे पीठ
चवीनुसार मीठ
सोड्याचे पाणी / साधे पाणी
बेकिंग पावडर १/४ चमचा
तळण्यासाठी तेल
कृती :
१. कप रवा, मैदा, मीठ आणि बेकिंग पावडर कोरडे एकत्र करून घ्या .
२. गरजेनुसार सोड्याचे पाणी / साधे पाणी थोडे थोडे घालत मळून घ्या .
३. मळताना रवा हाताने दाब देऊन मऊ करून घ्यावा.
४. मळलेला रव्यावर ओले कापड झाकून १/२ तास ठेऊन द्या .
५. अर्ध्य तासाने करवंदाइतके लहान गोळे करून घ्या .
खालील फोटोमध्ये आकाराचा अंदाज येण्यासाठी बाजूला मोठी लसूण पाकळी ठेवली आहे .
६. पातळ पुऱ्या लाटून घ्या . पुऱ्या लाटताना लाटण्याला आणि पळपाटाला तेल लावून घ्या . कोरडे पीठ लावू नये .
७. लाटलेल्या पुऱ्या ओल्या कापडाने झाकून घ्या .
८. एका मोठ्या भांड्यात पुऱ्या बुडतील इतके तेल कडकडीत गरम करून घ्या .
९. तेल कडल्यानंतर गॅस बंद करा .
१०. एक एक पुरी चमच्याने दाबून तळून घ्या . चमच्याने दाबल्याने ती फुगून येईल .
मोठ्या आचेवर तळल्यास पुऱ्या थंड झाल्यावर नरम पडतात . पुऱ्या कडक राहण्यासाठी मंद आचेवर / गॅस बंद करून गरम तेलात तळाव्या .
११. थंड झाल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवा .
१२. ह्या पुऱ्या ८ दिवस वापरता येतात .
टीप :
पुऱ्या थंड झाल्यावर नरम झाल्यास ओव्हनमध्ये १०० डिग्री टेम्परेचर ला १० मिनिटे ठेवाव्या . कडक होतात .
~ अमृता ..
No comments:
Post a Comment