साहित्य :
१ कप रवा
१ १/२ कप गरम पाणी
१ चमचा तूप
१ मोठा कांदा बारीक चिरून
१/२ टोमॅटो बारीक चिरून
१ इंच आले किसून
३ हिरव्या मिरच्या बारीक चिरून
कोथिंबीर बारीक चिरून
१ चमचा भिजलेले उडीद
२ चमचे भाजलेले शेंगदाणे
फोडणीसाठी तेल
जिरे १ चमचा
१/४ चमचा हिंग
मीठ चवीनुसार
सजावटीसाठी
खोवलेले ओले खोबरे
बारीक शेव
फ्रोझन मटार (ऐच्छिक )
कृती :
१. गरम तव्यावर मध्यम आचेवर रवा खरपूस भाजून घ्या .
रवा भाजताना तव्यावर तेल घालण्याची गरज नाही . भाजताना तो एकसारखा हलवत राहणे गरजेचे आहे अन्यथा तव्याला चिकटून करपू शकतो .
२. एका भांड्यात रव्याच्या दीडपट पाणी गरम करून घ्या .
३. कढईत फोडणीसाठी २ चमचे तेल गरम करा .
४. तेल गरम झाले की त्यात १ चमचा जिरे घाला .
५. चिरलेला कांदा , टोमॅटो , हिरवी मिरची , कढीपत्ता घाला .
६. कांदा पारदर्शक होईतोवर भाजून घ्या . टोमॅटोचा ही कच्चेपणा जाऊन तो नरम झाला पाहिजे .
७. किसलेले आले , फरोझल मटार घाला, भिजलेली उडीद डाळ घाला . .
८. भाजके शेंगदाणे लाटण्याने बारीक करून घाला . मिक्सरमधून बारीक केल्यास खूप पूड होते . आपल्याला फक्त त्याचा अख्खेपणा मोडायचा आहे .
९. १/४ चमचा हिंग, चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घाला .
१० आता या मिश्रणात भाजलेला रवा घाला . २ मिनिट पुन्हा सर्व जिन्नस एकावर भाजून घ्या .
११. त्यात रव्याच्या दीडपट घरं पाणी घाला .पाण्याचे प्रमाण जास्त झाले तर उपमा चिकट होतो . पाण्याचे प्रमाण कमी झाले तर उपमा कच्चा राहतो .
१२. माध्यम आचेवर कढईवर झाकणी लावून शिजवून घ्या .
१३. १ चमचा तूप सोडा .
१४. गरम गरम उपम्यावर किसलेले ओले खोबरे आणि बारीक शेव घालून सर्व्ह करा .
~ अमृता ..
No comments:
Post a Comment