साहित्य :
२ कप मैदा
२ मोठे चमचे छान डाळीचे पीठ (बेसन)
२ चमचे तेल
चवीनुसार मीठ
१/२ चमचा ओवा, १/२ चमचा जिरे
१/२ चमचा लाल मिरची पावडर
१/४ हळद
सारणासाठी :
१ वाटी किसलेले सुके खोबरे
१ चमचा आल्याची पेस्ट
२ मोठे चमचे लसूण किसून
४ मोठे चमचे बारीक शेव
१ मोठा चमचा तीळ
१ मोठा चमचा बेसन
१ छोटा चमचा बडीशेप
चवीनुसार मीठ
१ छोटा चमचा धने पूड / धने
१ चमचा गरम मसाला
१ चमचा लाल मिरची पावडर
२ चमचे पिठी साखर
बारीक चिरलेली कोथिंबीर
१/२ लिंबाचा रस
कृती :
बाकरवडीच्या वरच्या आवरणाचे कणिक :
१. २ कप मैदा आणि २ मोठे चमचे बेसन कोरडे एकत्र करून घ्या .
२. त्यात चवीनुसार मीठ , १/२ चमचा ओवा, १/२ चमचा जिरे ,१/२ चमचा लाल मिरची पावडर ,१/४ हळद घालून एकत्र करा .
३. २ मोठे चमचे कढलेले तेल घाला .
४. आवश्यक तितके पाणी घालून पीठ घट्ट मळून घ्या .
५. ओला कापडा झाकून ३० मिनिटे कणिक भाजू द्या .
बाकरवडीचे सारण:
१. १ वाटी सुके खोबरे बारीक किसून घ्या . तव्यावर भाजून घ्या .
२. १ मोठा चमचा बेसन भाजून घ्या .
३. १ मोठा चमचा तीळ आणि १ छोटा चमचा बडीशेप भाजून घ्या .
४. वरील सर्व जिन्नस एकत्र करा .
५. त्यात १ चमचा आल्याची पेस्ट, २ मोठे चमचे लसूण किसून घाला .
६. ४ मोठे चमचे बारीक शेव घाला .
७. चवीनुसार मीठ,१ चमचा गरम मसाला,१ चमचा लाल मिरची पावडर ,२ चमचे पिठी साखर ,बारीक चिरलेली कोथिंबीर १/४ कप घाला .
८. १ छोटा चमचा धने पूड / धने भाजून घाला .
९. १/२ लिंबाचा रस घाला .
१०. हे सर्व एकजीव करून किंचित चिकटपणा येईतोवर हाताने घट्ट दाबून मळा .
बाकरवडी :
१. बिजलेल्या कणिकेचा मोठ्या लिंबाएवढा गोळा करून तो लांबट लाटून घ्या .
२. त्यावर २ -३ थेम्ब पाणी पसरून वरचा भाग ओलसर करून घ्या.
३. लाटलेल्या बाकरवडीच्या पानावर २ ते ३ मोठे चमचे सारण पसरून घ्या .
४. हाताने दाबून घट्ट बसवून घ्या .
५. लाटलेल्या पानाचा घट्ट रोल करून घ्या . रोल सैल बसला तर तळताना सारण बाहेर येईल .
६. रोलचे २ ते ३ सेन्टी मीटरचे काप करून घ्या .
७. बाकरवडी पूर्ण बुडेल इतके तेल तळण्यासाठी गरम करून घ्या .
८. मंद आचेवर बाकरवडी सोनेरी रंग येइतोवर तळून घ्या . बाकरवडी मंद आचेवर तळली तरच कुरकुरीत होते अन्यथा वरचे आवरण मऊ पडते आणि आतील सारण कच्चे राहते .
९. थंड झाल्यावर हवाबंद डब्यात ठेवाव्यात .
~ अमृता ..
No comments:
Post a Comment