Monday, 7 May 2018

थापट वडी / पाट वडी / बेसन वडी / Thapat wadi / Paat wadi / Besan wadi

थापट वडी म्हटलं की मला आठवते ती आईची गौरीच्या सणाला पाठवलेली वडी चपातीची शिदोरी . 

आमच्या घराची गौराईही थापट वडीची इतक्या आतुरतेने  वाट पाहात नसेल इतकी मी पाहते .

थापट वडीला काही ठिकाणी पाट वडी किंवा बेसनची वडीही म्हणतात .   


साहीत्य :
२ कप बेसन (चणाडाळ पीठ )
६ हिरव्या मिरच्या 
आले लसूण 
सुके खोबरे अर्धी वाटी 
कोथिंबीर 
तेल 
जिरे 
हिंग 
गुळाचा लहान खडा 
हळद
चवीनुसार मीठ  

कृती : 

१. मिक्सरमधून आले लसूण , मिरच्या आणि वळले खोबरे बारीक वाटून घ्या . वाटताना पाण्याचा अजिबात वापर करू नये . 
२. एका भांड्यात फोडणीसाठी तेल गरम करा . 
३. त्यात जिरे घाला . 
४. मिक्सरमधून बारीक केलेले मिश्रण घाला . 
५. ते पूर्ण भाजून घ्या . 
६. हळद , हिंग, गूळ , मीठ घालून हलवून घ्या . 
७. मोठा १ १/२ पेला गरम पाणी घाला . 
८. याला पूर्ण उकळी येऊ द्या . 
९. चाळलेले बेसन पीठ घाला . 
१०.  हे मिश्रण मोठ्या उलथण्याने हलवत राहा जे ने करून त्यात पिठाच्या अजिबात गुठळ्या होणार नाहीत . 
११. ३ ते ४ मिनिट झाकली लावून पीठ मंद आचेवर शिजू द्या . हलवल्यावर जोवर पिठाचा एकत्र गोळा होत नाही तोवर मंद आचेवर शिजवा . 
१२. एका पाटाला तेलाचा हात पुसून घ्या . 
१३. त्यावर हे शिजलेले पीठ काढून हाताने / वाटीच्या खालच्या बाजूने थापटून ताटभर पसरून घ्या . 
१४. गरम पिठावर किसलेले सुके खोबरे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर दाबून बसावा . 
१५. थंड होत आल्यावर थापलेल्या पिठाच्या सुरीने वड्या पाडा .
१६. पूर्ण थंड झाल्यावर वड्या सुरीच्या टोकाने उचलून काढून घ्या . 

टीप:
१. या वड्या २ दिवस टिकतात . 
२. २ दिवसापेक्षा जास्त शिल्लक राहिल्या तर फ्रिजमध्ये ठेवाव्या . हव्या तेव्हा काढून तव्यावर तेल घालून भाजून खाव्या . 
भाजलेल्या वड्या खायला कुरकरीत लागतात .    
३. पीठ पूर्ण शिजून त्याचा गोळा होण्याआधी वड्या पडल्या तर खाताना बेसन कच्चे  लागते . 
४. सुके खोबरे न घातल्यास पीठ एकमेकास नीट पकडून ठेवू शकत नाही आणि चवही वेगळी होते .


Ingredient : 
2 cups gram flour 
6 green chillies
Ginger garlic
Dry coconut half cup
Coriander
Oil
Cumin seeds
Asafoetida
Jaggery
Turmeric powder

Recipe : 

1. Grate the garlic, chillies and dry coconut from the grinder. Do not use water while grinding.
2. Heat oil for tempering .
3. Add cumin seeds.
4. Add the mixture from grinder .
5. Roast it well.
6. Add turmeric powder, asafoetida , jaggery, salt and stir it .
7. Add 1 1/2 large hot water to it
8. Let it be boil properly.
9. Add gram flour.
10. Keep stirring this mixture so that there should not be any cluster of flour in it..
11. Cover and cook for 3 to 4 minutes no low flame till batter come as round together.
12. Spread the oil with hands on big wooden plate.
13. Put this cooked flour no it  and spread it over wooden plate with the hand /  the lower side of  steel bowl 
14. Spread the grated dried coconut and grated chopped coriander on its top. Press it well. 
15. After cooking , cut this with knife in diamond shape.

Note:

1. You can eat these for  two days.
2. If more than 2 days, keep it in fridge. When desired, add oil to the pan and roast it.
3. If the flour is not cooked well , wadis become sticky..
4. If you don't add  dry coconut while cooking, the flour can not hold well and the flavor will be little different. .

~ अमृता ..   

No comments:

Post a Comment

Popular Posts