कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा ही कोल्हापूर ची खासियत आहे .
पांढऱ्या रश्याची जी चव कोल्हापूरकरांना जमते ती दुसऱ्या कुणालाही जमत नाही हे अगदी विश्वासाने सांगू शकते मी .....
कदाचित कोल्हापूरच्या पाण्याची चव वेगळी असावी :)
हा पांढरा रस्सा प्यायला १ नंबर लागतो . ७ ते ८ वाट्या पांढरा रस्सा कोल्हापूरकर सहज पितात .
कार्यक्रमात जेवणाच्या पंगतीत पांढरा रस्सा वाढायला वाढपी येताना दिसला
कि सगळ्यांच्या ताटातील रश्याच्या वाट्या आपोआप रिकाम्या होतात .
यावरूनच त्याच्या चवीचा अंदाज आला असेल .
कोल्हापूरकर असा वा नसा ... एकदा पांढरा रस्सा करून बघाच .... दरवेळी करायची इच्छा होईल
जगात भारी .... कोल्हापुरी ! उगाच नाही म्हणत :)
साहित्य
१/२ किलो मटण किंवा चिकण हाडांसहित
१ वाटी दही (सायट्याचे दही नको)
२ चमचे आले लसूण पेस्ट
तेल
१ मध्यम आकाराचा कांदा
१ नारळ
१० काजू
४ चमचे खसखस
२ लवंग
१ इंच दालचिनी
तमालपात्री
२ सुक्या लाल मिरच्या
मीठ
कृती :
चिकन शिजवण्याची कृती
१. चिकन स्वच्छ धुवून घ्या .
२. त्यात १ वाटी दही , २ चमचे आले लसूण पेस्ट घालून एकत्र हलवा .
३. हे मिश्रण १ तास मुरण्यासाठी ठेवूं द्या .
४. १ तासानंतर चिकन शिजवण्याच्या भांड्यात फोडणीसाठी तेल गरम करून घ्या .
५. त्यात १ बारीक चिरलेला कांदा घालून २ मिनिट परतून घ्या .
६. मॅरीनेट केलेलं चिकन घालून हलवून घ्या .
चिकन फोडणी घालताना हळद वापरायची नाही . आपल्याला रस्सा पांढरा हवाय .
७. आवश्यक तितके मीठ घालून हलवा .
८. झाकणी लावून मंद आचेवर शिजत ठेवा .(शक्यतो झाकण्यासाठी खोलगट ताट वापरावे . त्यावर पाणी ठेवता येईल आणि वाफेवर आतील चिकन शिजेल ). मिठामुळे चिकनला पाणी सुटेल . याच पाण्यात चिकन शिजू द्या .
९. चिकनला सुटलेले पाणी संपले की मग ताटावर गरम करत ठेवलेले पाणी अर्धी वाटी चिकन मध्ये ओता .
१०. पुन्हा झाकलेल्या ताटावर पाणी भरून ठेवा.
११. जोवर चिकन शिजत नाही तोवर ते तटावरच्या गरम पाण्याने शिजवा
चिकनमध्ये एकदम सगळे पाणी ओतू नये . अर्धा वाटी पाणी संपल्यावर मगच पुढील पाणी ओतावे . चिकन लवकर शिजते आणि हाडांचा सूप चांगला येतो .
मटण शिजवण्याची कृती
१. मटण स्वच्छ धुवून घ्या .
२. मटणाला दही लावून मॅरीनेट करण्याची गरज नाही .
३. भांड्यात फोडणीसाठी तेल गरम करा .
वरील चिकन शिजवण्याची कृती मधील क्र . ५ पासून कृती पहा
चिकन शिजवण्याच्या पद्धतीनेच मटण शिजवा .
चिकन / मटण शिजल्यानंतर त्यातील फोडी बाजूला काढून घ्या .
पांढरा रस्सा कृती :
१. एक नारळ फेसून खवणून घ्या .
२. मिक्सरमध्ये थोडं पाणी घालून बारीक करून त्याचे दूध काढून घ्या .
३. नारळाचा चव पूर्ण कोरडा होईतोवर मिक्सरमधून पुन्हा पुन्हा फिरवून घट्ट दाबून दूध काढा'.
४. गाळण्याने गाळून घ्या .
५. ४ चमचे खसखस गरम पाण्यात अर्धा तास भिजत घाला.
४. मिक्सरमध्ये त्याची पेस्ट करून घ्या .
५. मिक्सरमधून काजुंचीही पेस्ट करून घ्या .
६. पांढरा रस्सा फोडणीसाठी भांड्यात तेल गरम करून घ्या . चिकन / मतं शिजवताना आपण आधीच तेल वापरले असल्याने रस्सा फोडणीसाठी कमी तेल घाला
७. काढलेल्या तेलात लवंग, दालचिनी , तमालपत्र , वेलदोडे , सुक्या लाल मिरच्या घाला .
८. त्यात खसखस पेस्ट घालून परतून घ्या .
९. काजू पेस्ट घालून परतून घ्या .
१०. मटण / चिकन शिजवलेले सूप घाला व एक उकळी काढा .
११. नारळाचे दूध घालून ढवळून घ्या आणि गॅस बारीक करा . नारळाचे दूध घातल्या नंतर रश्याला उकळी येत काम नये अन्यथा पांढरा रस्सा फुटतो .
१२. चवीनुसार मीठ घाला . शिजतेवेळी आपण मीठ घातले असल्याने रश्यात जास्त मीठ घालण्याची गरज नाही .
१३. गरम गरम पंधरा रस्सा प्यायला १ नंबर लागतो :)
जगात भारी .... आम्ही कोल्हापुरी :)
~ अमृता ..
No comments:
Post a Comment