Thursday, 19 April 2018

कच्च्या कैरीचे झटपट लोणचे / Kairiche Lonche / Quick Raw Mango Pickle

लहानपणी आमच्या अंगणात एक मोठं आंब्याचं झाड होत . उन्हाळा सुरु झाला की प्रत्येक फांदीला कैऱ्या लगडलेल्या दिसायच्या .

मग त्या कैऱ्यांची राखण आणि  झाडावर आहेत तोवरच मोजून भावंडांमध्ये त्यांची वाटणी असे बरेच उदयॊग दिवसभर चालायचे .

दुपारच्या जेवणाची वेळ झाली की आई आम्हाला झाडावर चढून २ कैऱ्या काढायला सांगायची . 

काय सरसर चढायचो झाडावर तेव्हा .... भारी होत सगळंच ... अख्खी सुट्टी आंब्याच्या भोवती नाचायची :)
मग त्या नुकत्याच तोडलेल्या कैरीचं आई ५ मिनिटात लोणचं करायची . आई त्याला कैरीचं करम असंच म्हणते
  
आणि मग आम्ही सगळे ते भांड चकचकीत दिसेतोवर चाटून पुसून खायचो :)  


साहित्य :

२ कच्च्या कैऱ्या
लाल तिखट , मीठ , साखर
२ लसूण पाकळ्या सोलून
फोडणीसाठी तेल , जिरे, मोहरी, हिंग

कृती :

१. कैऱ्या स्वच्छ धुवून चिरून लहान फोडी करून घ्यावा.
२. २ लसूण पाकळ्या सोलून चेचून घ्याव्या .
३. फोडणीसाठी २ चमचे तेल गरम करावे .
४. त्यात जिरे मोहरी घालावे .
५.  चेचलेला लसूण घालावा
६. , १/२ चमचा हळद, १/२ चमचा हिंग, १ चमचा लाल तिखट, १/२ चमचा साखर घालावे
७. मिश्रण परतवून लगेचच गॅस बंद करून भांडे गॅसवरून उतरवून ठेवावे .
८. फोडणी थंड झाल्यावर त्यात कैरीच्या फोडी घालून हलवून घ्यावा जेणे करून फोडणी सगळ्या फोडींना व्यवस्थित लागेल .
 ९. चवीनुसार मीठ घालावे.
१०. एकदा हलवून झाकणी बंद करून ५ मिनिटं लोणचे तसेच ठेवावे . त्याला पाणी सुटले की चव चांगली येते .


Ingredients:

2 raw unripped mangos
Red chili powder
salt, sugar
2 peeled garlic cloves

For tempering oil, cumin seeds, mustard seeds, asafoetida

Action:

1. Clean the raw mangoes and chop them into small pieces.
2. Peel 2 garlic cloves.
3. Heat 2 tbsp oil for tempering in a pot.
4. Add cumin seeds.
5. Add chopped garlic
6. Add 1/2 spoon turmeric powder, 1/2 spoon asafoetida, 1 spoon red chilli powder, 1/2 spoon sugar
7. Mix it well.
Turn off gas n put a pot down.
8. Once the tempering is cool, add chopped mango pieces and stir it so that the tempering should be done properly.
9. Add salt to taste.
10. Once done, close the lid and keep the pickle for 5 minutes .

~ अमृता .. 

No comments:

Post a Comment

Popular Posts