१/२ किलो चिकण
१ वाटी दही (सायट्याचे दही नको)
२ चमचे आले लसूण पेस्ट
तेल
१ मध्यम आकाराचा कांदा
१/२ वाटी बटर
१/२ वाटी तीळ
१ कांदा कापून
६ लसणाच्या कुड्या
१ इंच आले
१ इंच दालचिनी
२ लवंग
१ पान तमालपत्र
१५ काजू
२ वेलदोडे
२ लाल सुक्या मिरच्या
कृती :
पांढऱ्या रस्श्याच्या रेसिपीसाठी इथे क्लीक करा .
चिकन शिजवण्याची कृती
१. चिकन स्वच्छ धुवून घ्या .
२. त्यात १ वाटी दही , २ चमचे आले लसूण पेस्ट घालून एकत्र हलवा .
३. हे मिश्रण १ तास मुरण्यासाठी ठेवूं द्या .
४. १ तासानंतर चिकन शिजवण्याच्या भांड्यात फोडणीसाठी तेल गरम करून घ्या .
५. त्यात १ बारीक चिरलेला कांदा घालून २ मिनिट परतून घ्या .
६. मॅरीनेट केलेलं चिकन घालून हलवून घ्या .
चिकन फोडणी घालताना हळद वापरायची नाही . आपल्याला रस्सा पांढरा हवाय .
७. आवश्यक तितके मीठ घालून हलवा .
८. झाकणी लावून मंद आचेवर शिजत ठेवा .(शक्यतो झाकण्यासाठी खोलगट ताट वापरावे . त्यावर पाणी ठेवता येईल आणि वाफेवर आतील चिकन शिजेल ). मिठामुळे चिकनला पाणी सुटेल . याच पाण्यात चिकन शिजू द्या .
९. चिकनला सुटलेले पाणी संपले की मग ताटावर गरम करत ठेवलेले पाणी अर्धी वाटी चिकन मध्ये ओता .
१०. पुन्हा झाकलेल्या ताटावर पाणी भरून ठेवा.
११. जोवर चिकन शिजत नाही तोवर ते तटावरच्या गरम पाण्याने शिजवा
चिकनमध्ये एकदम सगळे पाणी ओतू नये . अर्धा वाटी पाणी संपल्यावर मगच पुढील पाणी ओतावे . चिकन लवकर शिजते आणि हाडांचा सूप चांगला येतो .
12. चिकन / मटण शिजल्यानंतर त्यातील फोडी बाजूला काढून घ्या .
मसाला :
१. नॉनस्टिक पण गरम करा . त्यात २ चमचे तेल घाला .
२. साहीत्यमध्ये दिलेला सर्व मसाला पॅनमध्ये भाजून घ्या .
३. मिक्सरमधून पेस्ट करून घ्या . आवश्यक तितके पाणी वापरा .
बटर चिकन :
१. एका मोठ्या भांड्यात ४ ते ५ चमचे तेल गरम करा .
२. त्यात १/२ वाटी बटर घाला आणि हलवा.
३. मसाल्याची पेस्ट घालून मसाला पूर्ण भाजून घ्या .
४. १ वाटी गरम पाणी घाला .
५. मसाला ५ मिनिट शिजू द्या .
६. मसाला पूर्ण शिजला की त्यात चिकनच्या शिजलेल्या फोडी घालून एकदाच हलवून घ्या .
७. सर्व्ह करताना वरून १. चमचा बटर आणि क्रीम ( ऐच्छिक ) घाला .
Ingredient:
1/2 kg of chicken
1 cup curd
2 tablespoon garlic paste
Oil
1 medium sized onion
1/2 small cup butter ( homemade will be great)
For Butter chicken gravy :
1/2 cup Sesame seeds
1 chopped onion
6 garlic cloves
1 inch ginger
1 inch cinnamon
2 cloves
1 bay leaf
15 cashew nuts
2 cardamom
2 dry red chillies
Recipe:
Click here for Pandhara Rassa Recipe
How to cook chicken :
1. Clean the chicken pieces.
2. Add 1 cup curd, 2 spoon of garlic paste, and stir it all together.
3. Keep this mixture for 1 hour.
4. After 1 hour marination , heat oil for tempering in cooking vessel.
5. Add 1 finely chopped onion and fry for 2 minutes.
6. Add marinated chicken and stir .
Do not use turmeric powder while cooking chicken. We need a white chicken soup for making rassa.
7. Add salt as per taste.
8. Cover the lid and cook on low flame (Choose a lid to cover cooking vessel in such a shape that you can keep water on it. Chicken mixture will start leaving some water due to added salt. Cook the chicken in the same water.
9. Once the water released by the chicken is over n mixture is getting dry , add half cup of hot water in it. Use water which we kept on lit while cooking.
10. Fill the water on the covered dish again.
11. Cook until the chicken become soft.
Do not pour the water in the chicken completely. Add only half a cup of water at a time. Chicken cooks fast and bone soup gets better taste if you use this cooking method.
12. Remove chicken pieces from soup and keep them aside.
Butter chicken gravy :
1. Heat a nonstick pan. Put 2 spoon of oil in it.
2. Roast all the spices ingredients given above in heated pan.
3. Make a fine paste of it in grinder. Use water as needed.
How to make Butter chicken:
1. Heat 4-5 spoons of oil in a large bowl.
2. Add 1/2 cup butter and stir it.
3. Add Masala paste and roast masala for a while.
4. Put 1 cup of hot water.
5. Cook Masala in water for 5 minutes.
6. Add cooked chicken pieces to the masala and stir it only once.
7. Serving 1 from Spoon butter and cream (optional).
~ अमृता ..
No comments:
Post a Comment