साहित्य :
१ कप केक / साधा कोणताही केक
१ पेला थंड दूध
२ चमचे साखर
१ /२ चमचा लिक्विड चॉकलेट / प्लेन चॉकलेट
कृती :
१. थंड दुधात साखर , लिक्विड / प्लेन चॉकलेट केकचे तुकडे घाला
२. १ चमचा वॅनिला आईस्क्रीम घाला .
३. मिक्सरमधून फिरवून घ्या .
४. सर्व्ह करताना रिकाम्या पेल्याला आतून लिक्विड चॉकलेट पसरून घ्या .
५. त्यात तयार शेक घाला . वरून १ चमचा शेकचा फेस घाला .
६. वरून केकचा चुरा पसारा.
७. थंड शेक प्यायला छान लागतो .
टीप :
१. वाढदिवसानंतर घरी उरलेला केक वापरला तरी चालेल .
२. वॅनिला आईस्क्रीम ऐच्छिक आहे .
३. केक थोड्या प्रमाणातच घाला अन्यथा शेक फार घट्ट होतो .
Ingredients :
1 cup cake / any type of cake
1 glass cold milk
2 tsp sugar
1/2 spoon liquid chocolate / plain chocolate
Recipe:
1. Add sugar, liquid / plain chocolate cake pieces in cold milk
2. Add 1 spoon vanilla ice cream.
3. Move through the grinder.
4. While serving, spread liquid chocolate inside the empty glass .
5. Put a ready chocolate cake shake in it.
6. Spread crunched cake pieces on top. Decorate with liquid chocolate.
7. Serve cold chocolate cake shake .
Note:
1. You can use the cake remaining after birthday party.
2. Vanilla ice cream is optional.
3. Don't use more cake , otherwise the shake becomes very thick.
~ अमृता ..
No comments:
Post a Comment