साहित्य :
१/२ किलो पनीर
१ १/२ वाटी सोललेले मटार
२ माध्यम आकाराचे कांदे
१ मोठा टोमॅटो
आले , लसूण
जिरे , हळद , तेल
२ पुदिन्याची पाने (ऐच्छिक )
बटर
कृती :
१. कांदा , टोमॅटो , १ इंच आले , ४ लसूण पाकळ्या , २ पुदिना पाने याची मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घ्या .
२. एका पॅनमध्ये फोडणीसाठी तेल गरम करा .
३. या गरम तेलात पनीरचे काप सोनेरी होईतोवर तळून घ्या .
४. पनीरचे तळलेले काप बाजूला काढून घ्या .
५. गरम तेलात जिरे घाला .
६. मिक्सरमधून बारीक केलेली पेस्ट घाला .
७. मसाला चांगला भाजून घ्या .
१ चमचा बटर , १/४ चमचा हळद , चवीनुसार मीठ , १/२ चमचा साखर ,१ चमचा लाल मिरची पावडर , १/२ चमचा गरम मसाला घाला .
८. १/२ पेला गरम पाणी घालून मसाला मंद आचेवर ५ मिनिट शिजवून घ्या .
९. मसाला शिजला आणि गरजेपुरता घट्ट झाला की त्यात तळलेले पनीर घाला .
१०. २ मिनिटे भाजी शिजवून मटार घाला .
सोललेले मटार भाजीत घालण्यापूर्वी २ मिनिट उकळत्या पाण्यात शिजवून घ्या . फ्रोझन मटार वापरले असतील तर भाजीत घालण्याआधी शिजवण्याची गरज नाही .
११. मंद आचेवर भाजी ३ ते ४ मिनिट शिजवा .
Ingredients:
1/2 Kg Paneer
1 1/2 cup peeled green peas
2 medium sized onions
1 large tomato
Ginger, garlic
Cumin seeds, turmeric, oil
2 mint leaves (optional)
1 spoon butter
Recipe:
1. Finely chop the onion, tomatoes. Add it with 1 inch ginger, 4 garlic cloves, and 2 mint leaves in grinder . Make a fine paste of it .
2. Heat oil for tempering in a pan.
3. Fry the cottage cheese till it become golden in color in this heated oil.
4. Remove fried cottage cheese aside.
5. Add cumin seeds in hot oil.
6. Add fine paste of spices from the grinder.
7. Roast the gravy well.
Add 1 spoon butter, 1/4 teaspoon turmeric, salt to taste, 1/2 spoon sugar, 1 spoon red chilli powder, 1/2 spoon garam masala.
8. Add 1/2 cup hot water and cook for 5 minutes on low flame.
9. When gravy gets required thickness, add fried paneer in it.Cook it foe another 1 minute.
10. Add green peas.
If you are using fresh peas , cook these green peas for two minutes in hot water before adding into gravy.
If frozen peas are used, then there is no need to cook before adding into gravy.
11. Cook on low flame for another 3 to 4 minutes.
No comments:
Post a Comment