Sunday, 24 June 2018

अंड्याची भूर्जी / Egg bhurji

१० पैकी ८ जणांना आवडणारी , कमी जिन्नस लागणारी , स्वादिष्ट , करायला सोपी , आणि झटपट होणारी म्हणजे अंडा भूर्जी . 
आता तिला भूर्जी  म्हणा , बुर्जी म्हणा , अंड्याची भाजी म्हणा किंवा मग आमच्यासारखं अंड्याचा गबरा म्हणा ...काहीही म्हणा . 
ती सगळ्या नावात तुमचं पोट तृप्त करेल  आणि  जिभेचेही चोचले पुरवेल . 
आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 
संडे हो या मंडे ..... रोज खाओ अंडे :)

सगळ्यांच्या घरी हा पदार्थ वरचेवर बनत असला तरी प्रत्येकाची करण्याची पद्धत थोडीफार वेगळी आणि त्यामुळे चवीत बराचसा फरक .
म्हणून  आपल्यापैकी लोकांना गाड्यावरची भुर्जी आवडते .
तर ही तुमच्या आवडीची गाड्यावरची अंडा भुर्जी    


साहित्य :

५ अंडी ( खडकी / गावरान असतील तर ६ किंवा ७)
३ मोठे कांदे बारीक चिरून 
१ टोमॅटो बारीक चिरून 
फोडणीसाठी तेल 
हळद , मीठ , लाला मिरची पावडर 
लादी पाव 

कृती :

१. फोडणीसाठी २ ते ३ मोठे चमचे तेल घालावे . 
२. तेल गरम झाल्यावर त्यात बारीक कापलेला कांदा घालून पारदर्शक होई तोवर भाजावा . 
३. बारीक चिरलेला टोमॅटो घालावा . 
४. तो पूर्ण शिजे तोवर हलवत राहावे . 
५. १/४ चमचा हळद घालावी . 
६. चवीनुसार  मीठ व १ मोठा चमचा लाल मिरची पावडर घालावी . 
७. सर्व एकजीव हलवावे . 
८. लाल मिरची पावडर घातल्यावर आच मंद करावी अथवा ती करपते . 
९. ५ अंडी फोडून त्याच्या आतील भाग घालून कवच टाकून द्यावी . 
१०. मिश्रण एकजीव करावे . 
११. बुर्जी पूर्ण भाजेतोवर मोठ्या आचेवर एकसारखी हलवत राहावी . 
१२. आवडत असल्यास शेवटी बारीक चिरलेली किथिंबीर वरून घालावी . 
तळलेली मिरची आणि भाजलेल्या पावासोबत गरम गरम बुर्जी सर्व्ह करावी . शक्यतो वापरावे 

~ अमृता .. 

No comments:

Post a Comment

Popular Posts