Friday, 29 June 2018

ढोकळा / Dhokla





साहित्य :

१ कप बेसन
१/२ कप आंबट दही
१/२ कप पाणी
मीठ , साखर चवीनुसार
१/२ इंच आले
१/२ चमचा खायचा सोडा / इनो १ पॅक
१/२ लिंबूचा रस
फोडणीसाठी
जिरे / मोहरी
२ हिरव्या मिरच्या
कढीपत्ता


कृती :
१. बेसन आणि दही एकत्र करून चांगले एकजीव करून घ्या .  दही  शक्यतो आंबट असावे . 
२. त्यात गरजेनुसार पाणी घालून पीठ जाडसर तयार करून घ्या 
३. मीठ , साखर चवीनुसार , १/२ लिंबाचा रस आणि १/२ इंच किसलेले आले घालून एकजीव करा . 
४. १/२ चमचा खायचा सोडा किंवा  १ पॅक इनो घालीन एकावर हलवून घ्या .
५. कुकरच्या भांड्याला सर्व बाजूनी तेलाचा हात पुसून घ्या . 
६. कुकरच्या भांड्यात ते पीठ ओता . १/२ भांडे भरेल इतकेच पीठ ओतावे कारण ढोकळा फुगून भांडेभर वर येतो . 
७. कुकरमध्ये पाणी घालून , त्याच्या तळाशी  प्लेट / वाटी घालून कुकरची भांडी कुकरमध्ये ठेवा . 
८. कुकरची शिटी काढून टाका . 
९. मध्यम गॅसवर २५ मिनिटे ढोकळा कुकरमध्ये उकडू द्या . 
१०. २५ मिनिटांनी गॅस बंद करा . ढोकळा फुगून वर आलेला दिसेल . 
११. थंड झाल्यावर भांडे बाहेर काढून प्लेटमध्ये उलटे आपटा जे ने करून फुगलेला ढोकळा प्लेटमध्ये पडेल . भांड्याला चिकटला असेल तर एकवर सूरी फिरवून कडा सुट्ट्या करून घ्या. 
१२. सुरीने त्याचे चौकोनी आकारात ढोकळे कापून घ्या . 

फोडणी 
१. एका भांड्यात १ चमचा तेल गरम करा . 
२. त्यात १/२ चमचा जिरे / मोहरी घाला . 
३. ४ कढीपत्त्याची पाने , २ हिरव्या मिरच्या कापून घाला 
४. या फोडणीत ३/४  कप गरम पाणी घालून एक उकळी काढा . 
५.  चवीनुसार मीठ , साखर, १/२ लिंबाचा रस घाला . 
६. आता हे फोडणीचे गरम पाणी कापलेल्या ढोकळ्यावर सर्व बाजूने ओता .
७. १/२ तास पाणी मुरण्यास ढोकळा झाकून ठेवा . 


हा ढोकळा चटणीसोबत खायला द्या . चिंच गुळाच्या गोड चटणीसाठी इथे क्लीक करा . 

~ अमृता ..   
   






No comments:

Post a Comment

Popular Posts