साहित्य :
१/२ किलो चिकन
२ कांदे बारीक चिरून
फोडणीसाठी तेल
हळद
मसाल्यासाठी :
१ वाटी सुके खोबरे
२ चमचे पांढरे तीळ
३ लवंग
१ तमालपत्र
१/२ इंच दालचिनी
२ चमचे आले लसूण पेस्ट
६ लाल सुक्या मिरच्या
२ चमचे धने
१/२ चमचा गरम मसाला ( ऐच्छिक )
मीठ
कृती :
कोल्हापुरी पांढऱ्या रश्श्याच्या रेसिपीसाठी इथे क्लीक करा .
मालवणी चिकन मसाला :
१.सुके खोबरे किसून घ्यावे
२. एक कांदा बारीक चिरून तेलावर भाजून घ्यावा .
३. तीळ, लाल सुक्या मिरच्या , धने गरम तव्यावर भाजून घ्यावे .
४. खडा मसाला गरम तव्यावर भाजून घ्यावा .
५. साहित्यात दिलेले सर्व जिन्नस एकत्र करून त्याची बारीक पेस्ट करून घ्यावी .
६. एका जाड बुडाच्या भांड्यात ३ ते ४ चमचे तेल गरम करावे .
७. त्यात १ बारीक चिरलेला कांदा घालावा .
८. १/२ चमचा हळद घालून परतावे .
९. बारीक केलेली मसाल्याची पेस्ट घालावी .
१०. मसाल्याला तेल सुतेतोवर मसाला माध्यम आचेवर भाजून घ्यावा .
११. १/२ पेला कडकडीत गरम पाणी घालीन २ मिनिट शिजवून घ्यावा .
१२. त्यात चिकनच्या शिजलेल्या फोडी घालून हलवून घ्यावे .
१३. मंद आचेवर २ मिनिट शिजवून घ्यावे . चिकनला तेलाचा लाल तवंग येईल .
मालवणी चिकन तांदळाच्या भाकरीसोबत खायला छान लागते .
टीप :
चिकनच्या फोडी मसाल्यात घातल्या नंतर चिकन फारसे हलवू नये अन्यथा शिजलेल्या फोडी मसाल्यात शिजतात .
~ अमृता ..
No comments:
Post a Comment