रोग प्रतिकारक शक्ती काढा:
- 1 ग्लास पाणी
- अडीच इंच दालचिनी
- 5 काळी मिरी
- 3 लवंग
- 2 वेलदोडे
- अर्धा इंच आले
- अर्धा चमचा हळद
- 8 ते 10 तुळशीची पाने
- 2 ते 3 गवती चहा
- चवीसाठी थोडासा गुळ / मध
*कृती:*
१. लवंग, दालचिनी, वेलदोडे, काळी मिरी मिक्सरमधून वाटून घ्या.
२. १ ग्लास पाणी उकळत ठेवा.
३. त्यात १/२ चमचा बारीक केलेला मसाला घाला.
४. १/२ चमचा हळद घाला.
५. आले किसून घ्या. पाण्यात घाला.
६. तुळशीची पाने आणि गवती चहा घाला.
७. साधारण ३-४ मिनिट उकळू द्या.
८. चवीसाठी मध / साखर घाला.
१०. काढा गाळून घ्या.
११. गरम गरम काढा प्यायला द्या.
हा काढा रोगप्रतिकार क्षमता वाढविण्यासाठी खूप फायदेशीर आहे.