साहित्य :
१ वाटी राजमा
२ मोठे कांदे
२ मोठे टोमॅटो
१ लवंग , १/२ इंच दालचिनी , १ तमालपत्र
१ चमचा आले लसूण पेस्ट
१ चमचा लाल मिरची पावडर
१ चमचा धने जिरे पावडर
१/४ चमचा हळद
चवीनुसार मीठ
१/२ चमचा साखर
१ चमचा बटर , तेल
कृती :
१. १ वाटी राजमा ८ तास पाण्यात भिजवावा .
२. त्यांनतर ४ शिट्ट्या करून कुकरमधून शिजवून घ्यावा .
३. २ मोठे कांदे आणि टोमॅटोची मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्या .
४. एका मोठ्या भांड्यात फोडणीसाठी १ चमचा तेल गरम करा .
५. त्यात जिरे , लवंग , दालचिनी , तमालपत्र घाला .
६. कांदा टोमॅटोची पेस्ट घालून त्याला तेल सुटेतोवर भाजून घ्या .
७. १/४ चमचा हळद घाला .
८. १ चमचा आले लसूण पेस्ट घालून भाजून घ्या .
९. त्यात १ चमचा लाल मिरची पावडर , गरम मसाला , धने जिरे पावडरआणि चवीनुसार मीठ घाला.
१०. मसाला पूर्ण भाजला कि मग त्यात शिजलेला राजमा घाला .
११. राजमा मसाल्यासहीत शिजण्यासाठी तो कुकरमध्ये शिजल्यानंतर शिल्ल्लक राहिलेले पाणी वापरा .
१२. १/२ चमचा साखर घाला .
१३. जिरा राईस सोबत किंवा रोटीसोबत गरम गरम राजमा सर्व्ह करा .
~ अमृता ..
No comments:
Post a Comment