साहित्य :
१ कप साधा रवा
१/२ कप आंबट ताक
आवश्यकतेनुसार पाणी
मीठ
१ इंच आले किसून
गाजर , कांदा , टोमॅटो बारीक चिरून
१/४ चमचा खायचा सोडा
१/२ हळद ऐच्छिक
कोथिंबीर , हिरवी मिरची
१/४ कप फ्रोझन मटार
कृती :
१ कप साधा रवा , १/२ कप आंबट ताक आणि चवीनुसार मीठ घालून एकजीव करा .
२. आवश्यकतेनुसार पाणी घालून इडलीच्या पिठाइतके घट्टसर पीठ करून घ्या .
३. त्यात बारीक चिरलेला कांदा , टोमॅटो , कोथिंबीर , हिरवी मिरची घाला .
४. १/४ कप फ्रोझन मटार घाला .
५. हे मिश्रण 1/2 तास भिजण्यासाठी ठेवून द्या .
६. १/४ चमचा खायचा सोडा घाला .
८. इडली पात्रात तळाला १ १/२ पाणी घाला ,
९. इडली पात्राच्या स्टँडच्या प्रत्येक खोलगट भागाला (जिथे इडली करतात ) बोटांनी तेल लावून घ्या .
इडली पात्राच्या स्टॅण्डमध्ये हे रव्याचे मिश्रण घाला .
१०. मध्यम आचेवर इडली पात्र ठेवून त्यावर झाकणी लावा .
११. ५ मिनिटांनी इडली पूर्ण वाफवल्यावर स्टॅन्ड बाहेर काढा .
१२. चाकूच्या टोकाने इडलीच्या कडा सोडवून घ्या .
१३. इडलीच्या तळाला खोलगट चमचा घालून हलकेच इडली उचलून घ्या .
१४. खोबरीच्या चटणीसोबत खायला द्या .
~ अमृता ..
No comments:
Post a Comment