Friday, 29 June 2018

उपवासाची बटाटा भाजी / Fasting potato sabzi



साहित्य :

४ बटाटे उकडून 
१/ वाटी खोवलेले ओले खोबरे
२ चमचे शेंगदाण्याचं कूट 
४ हिरव्या मिरच्या 
जिरे 
मीठ , साखर 
तेल  

कृती :

१. ४ बटाटे कुकरमध्ये उकडून घ्या . 
२. थंड झाल्याला सोलून त्याचे कप करून घ्या . 
३. ४ हिरव्या मिरच्या , १ चमचा जिरे , खोवलेले ओले खोबरे मिक्सरमध्ये पाणी न वापरता बारीक करून घ्या . अगदी बारीक पेस्टची गरज नाही. २ मिनिटे नसते फिरवून घेतले तरी चालेल . 
४. एका भांड्यात फोडणीसाठी तेल गरम करा . 
५. त्यात १/४ चमचा जिरे घाला . 
६. मिक्सरमध्ये बारीक केलेले खोबऱ्याचे वाटण घालून हलवून घ्या . 
७. २ चमचे शेंगदाण्याचा कूट घाला . 
८. एकावर हलवून कापलेले बटाटे घाला . 
९. चवीनुसार मीठ आणि साखर घाला . 
१०. १ मिनिट वाफेवर शिजवून गॅस बंद करा .

~ अमृता .. 
  

ढोकळा / Dhokla





साहित्य :

१ कप बेसन
१/२ कप आंबट दही
१/२ कप पाणी
मीठ , साखर चवीनुसार
१/२ इंच आले
१/२ चमचा खायचा सोडा / इनो १ पॅक
१/२ लिंबूचा रस
फोडणीसाठी
जिरे / मोहरी
२ हिरव्या मिरच्या
कढीपत्ता


कृती :
१. बेसन आणि दही एकत्र करून चांगले एकजीव करून घ्या .  दही  शक्यतो आंबट असावे . 
२. त्यात गरजेनुसार पाणी घालून पीठ जाडसर तयार करून घ्या 
३. मीठ , साखर चवीनुसार , १/२ लिंबाचा रस आणि १/२ इंच किसलेले आले घालून एकजीव करा . 
४. १/२ चमचा खायचा सोडा किंवा  १ पॅक इनो घालीन एकावर हलवून घ्या .
५. कुकरच्या भांड्याला सर्व बाजूनी तेलाचा हात पुसून घ्या . 
६. कुकरच्या भांड्यात ते पीठ ओता . १/२ भांडे भरेल इतकेच पीठ ओतावे कारण ढोकळा फुगून भांडेभर वर येतो . 
७. कुकरमध्ये पाणी घालून , त्याच्या तळाशी  प्लेट / वाटी घालून कुकरची भांडी कुकरमध्ये ठेवा . 
८. कुकरची शिटी काढून टाका . 
९. मध्यम गॅसवर २५ मिनिटे ढोकळा कुकरमध्ये उकडू द्या . 
१०. २५ मिनिटांनी गॅस बंद करा . ढोकळा फुगून वर आलेला दिसेल . 
११. थंड झाल्यावर भांडे बाहेर काढून प्लेटमध्ये उलटे आपटा जे ने करून फुगलेला ढोकळा प्लेटमध्ये पडेल . भांड्याला चिकटला असेल तर एकवर सूरी फिरवून कडा सुट्ट्या करून घ्या. 
१२. सुरीने त्याचे चौकोनी आकारात ढोकळे कापून घ्या . 

फोडणी 
१. एका भांड्यात १ चमचा तेल गरम करा . 
२. त्यात १/२ चमचा जिरे / मोहरी घाला . 
३. ४ कढीपत्त्याची पाने , २ हिरव्या मिरच्या कापून घाला 
४. या फोडणीत ३/४  कप गरम पाणी घालून एक उकळी काढा . 
५.  चवीनुसार मीठ , साखर, १/२ लिंबाचा रस घाला . 
६. आता हे फोडणीचे गरम पाणी कापलेल्या ढोकळ्यावर सर्व बाजूने ओता .
७. १/२ तास पाणी मुरण्यास ढोकळा झाकून ठेवा . 


हा ढोकळा चटणीसोबत खायला द्या . चिंच गुळाच्या गोड चटणीसाठी इथे क्लीक करा . 

~ अमृता ..   
   






साबुदाणा वडा / Sabudaba Vada /Tapioca



साहित्य :
३ मोठे बटाटे उकडून 
१ कप साबुदाणे 
१/२ कप शेंगदाणे 
मीठ,जिरे
४ हिरव्या मिरच्या / लाल मिरची पावडर
कढीपत्ता , कोथिंबीर (ऐच्छिक )  

कृती :

१. २ मोठे बटाटे उकडून घ्या .
२. थंड झाल्यावर साले काढून मॅश करून घ्या .
३. १/२ कप शेंगदाणे भाजून , सोलून त्याचा कूट करून घ्या . शेंगदाण्याचा कूट एकदम बारीक करावा अन्यथा मोठ्या कणांमुळे वडे तळताना फुटतात.
४. ४ हिरव्या मिरच्या आणि १ चमचा जिरे मिक्सरमधून बारीक करून घ्या . हिरव्या मिरच्या ऐवजी लाला मिरची पावडर वापरली तरी चालेल .
५. वड्यासाठी बारीक / इन्स्टंट साबुदाणा वापरला तर वडे दिसायला नाजूक होतात .
 बारीक / इन्स्टंट साबुदाणा : १ कप साबुदाणा भांड्यात कडून त्यावर १ सेमी पाणी ठेवून १० मिनिटे भिजत ठेवा . १० मिनिटांनी साबुदाणा मऊ होइल . जास्तीचे पाणी निथळून काढून टाका .
मोठा साबुदाणा  : जर मोठा साबुदाणा वापरणार असाल तर तो ८ तास आधी भिजत घालावा लागतो .  १ कप साबुदाणा भांड्यात कडून त्यावर १ सेमी पाणी ठेवून १० मिनिटे भिजत ठेवा .  जास्तीचे पाणी निथळून काढून टाका . हा साबुदाणा ८ तास भिजू द्या . ८ तासांनी साबुदाणा आकाराने फुलेल आणि मऊ होईल .
६. मॅश केलेला बटाटा , भिजवलेला साबुदाणा , शेंगदाण्याचा कूट ,  मिरची ( बारीक केलेली हिरवी मिरची / लाल मिरची पावडर ),१/२   अख्खे जिरे , चवीनुसार मीठ एकत्र करा .
७. ते जिन्नस तेलाच्या हाताने मळून घ्या . मळताना अजिबात पाणी वापरू नये . साबुदाण्यात पाण्यामुळे पीठ पातळ झाले तर शेंगदाण्याचा कूट / राजगिरा पीठ वापरू शकता .
८. मळलेल्या पिठाचे लिंबाएवढे गोळे करून घ्या .
९. केळीच्या पानावर किंवा प्लॅस्टिकच्या पिशवीवर तेलाच्या हाताने वाडे थापून घ्या . वडा थापताना माध्यम पातळ थापावा . त्याला कुठेही चीर असू नये .
१०. पूर्ण कढलेल्या तेलात माध्यम आचेवर वडा दोन्ही बाजूनी सोनेरी रंग येईतोवर टाळून घ्या .
११. टिशूंपेपरवर ठेवून जास्तीचे तेल काढून घ्या .
१२. गरम गरम साबुदाणा वडे दह्यासोबत किंवा ओल्या नारळाच्या चटणीसोबत सर्व्ह करा .  

~ अमृता .. 

Sunday, 24 June 2018

चिकन काला / Chicken kala





साहीत्य :

मसाल्यासाठी : 

१ कांदा कापून
५ हिरव्या मिरच्या
२ लवंग
१ इंच दालचिनी
१ तमालपत्र
३ वेलदोडे
६ लसणाच्या पाकळ्या
२ इंच आले
पुदिना कापून
कोथिंबीर कापून
हिरव्या मिरच्यांची उभे काप
१ चमचा  गरम मसाला , धने पावडर , जिरे पावडर ,
मीठ
हळद ,
२ चमचा  लाल मिरची पावडर ,
१ मोठा बाऊल दही
१ लिंबाचा रस

चिकन १/२ किलो
तळलेल्या कांद्यासाठी  ७ ते ८ मोठे कांदे

कृती :

चिकन मॅरीनेट
१. साहित्यामध्ये दिलेला खडा मसाला (लवंग, दालचिनी , तमालपत्र , वेलदोडे ), १ मोठा कापलेला कांदा , लसूण ,आले , ५ हिरव्या मिरच्या , १/२ लिंबाचा रस एकत्र घरून घ्यावे . 
२.  मिक्सरमधून त्याची पेस्ट करून घ्या . 
३. एका मोठ्या भांड्यात चिकन स्वच्छ धुवून , आवश्यक त्या आकारात काप करून घ्या . 
४. त्यामध्ये वरील पेस्ट घाला. 
५. १ मोठा बाऊल दही घाला . ४  चमचे कच्चे तेल घाला . 
६. चवीनुसार मीठ , प्रत्येकी १ चमचा गरम मसाला, धने पावडर , जिरे पावडर , १/२ चमचा हळद, २ चमचे लाल मिरची पावडर घाला .  
७. बारीक कापलेली पुदिन्याची पाने , बारीक कापलेली  कोथिंबीर , उभ्या कापलेल्या हिरव्या मिरच्या घाला . (पुदिना आणि कोथिंबीरच्या मध्यम आकाराच्या पेंडीपैकी साधारण अर्धी पेंडी मॅरीनेट करताना वापरावी . )
८. मिश्रण एकजीव करून पूर्ण १ रात्र मॅरीनेट होण्यास फ्रिजमध्ये ठेवून द्या. 

चिकन शिजताना त्यामध्ये पाणी घालण्याची अजिबात गरज नाही . नुसत्या मसाल्याच्या सुटलेल्या पाण्यावर पूर्ण चिकन शिजून निघते . 

१. पूर्ण १ रात्र चिकन मॅरीनेट केल्यामुळे सगळ्या मसाल्याची चव चिकनमध्ये उतरते . 
२.  मॅरीनेट केलेलं चिकन सकाळी फ्रिजमधून बाहेर काढून १/२ तास ठेवून द्या . 
३. जाड बुडाच्या भांड्यात हे मिश्रण घाला . 
४. हे चिकन १० मिनिट मोठ्या आचेवर शिजू द्या    . 
५. आच मंद करून साधारण १/२ तास त्याला शिजवा . 
६. शिजताना मध्ये मध्ये हलवत राहा . त्यामुळे सगळ्या बाजूने छान शिजेल . 
८. चिकन शिजत आले की त्यात तळलेला कांदा (३ ते ४ माध्यम आकाराचे कांदे ) घालून अजून ५ मिनिट शिजवून घ्या .

तळलेला कांदा भरपूर घातल्याने याला काळसर रंग येतो आणि चवही नेहमीच्या चिकन पेक्षा झणझणीत लागते

~ अमृता ..   

ओनियन रिंग्स / Onion rings

बालगीतातल्या ओळींप्रमाणे पिंजलेला काळा कापूस खरंच एखाद्या संध्याकाळी आभाळभर पसरून जातो . वाऱ्याने जोर धरला की खापरीवर टप टप आवाज सुरु होतो ...अगदी एका लयीत आणि मग त्या लयीचा वेग वाढतच जातो ... टपटपणारा धो धो कोसळायला लागतो . 
मातीच्या धुंद वासासोबत अंगावर शहरे उठवणारा गारठा जाणवायला लागतो आणि मग कुठेतरी उभंडार , गरमा गरम खवास वाटतं . 
वाफाळणाऱ्या चहासोबत एक प्लेट भजी , वडे यांच्या कुटुंबातील एखादा पदार्थ समोर मिळाला तर पावसाची मजा अजूनच वाढते . 
मग नेहमी नेहमी कांदा भजी करून झाल्यावर काहीतरी नवं चवीला मिळावं असं जेव्हा वाटत तेव्हा हे ओनियन रिंग्स उत्तम 
महाराष्ट्रीयन चव असणारा अमराठी पदार्थ .... ओनियन रिंग्स     

ओनियन रिंग्स हा कांदे भजीसारखाच प्रकार आहे . 
पद्धत थोडी वेगळी आणि सोप्पी आहे  . 



साहित्य :

१ मोठ्या आकाराचा कांदा
२ चमचे रवा
१ वाटी बेसन (चणा डाळ पीठ )
चवीनुसार मीठ
लाल मिरची पावडर
१/४ चमचा हळद
१/२ चमचा खायचा सोडा (ऐच्छिक )

कृती :

१. कांदा मध्यभागी अशा रीतीने आडवा कापावा की नंतर त्याच्या अखंड गोल चकत्या काढता येतील .
२.  कांद्याचे पातळ गोल काप काढावेत.
३. प्रत्येक कापमधील चकत्या एकमेकांपासून विलग काढून घ्याव्यात .

पीठ तयार करण्याची कृती :

१. एका मोठ्या भांड्यात बेसन काढून घ्या .
२. त्यात २ चमचे रवा , हळद , लाल मिरची पावडर , मीठ , खाण्याचा सोडा घालावा .
३. अंदाजे १/२ कप पाणी घालून पीठ घट्टसर भिजवून घ्यावे .
४. यात घातलेला रवा भिजण्यासाठी पाह्त १० मिनिट ठेवून द्यावे .

तळण्याची  कृती :

१. एका भांड्यात १ कप तेल गरम करावे . तळण्यासाठी तेल पूर्ण काढलेले हवे अन्यथा रिंग्स मऊ पडतात .
२. विलग करून घेतलेल्या कांद्याच्या  चाकात्यांपैकी एक चकती पिठात उरण बुडवावी .
३. ती चिमट्याने उचलून काढलेल्या तेलात घालावे .
४. दोन्ही बाजूने व्यवस्थित टाळून घ्यावे .
५. जादाचे तेल काढण्यासाठी टिशू पेपरवर ठेवावे .
६. टोमॅटो सॉस किंवा आवडीच्या चटणीसोबत सर्व्ह करावे.

Ingredients:

1 large sized onion
2 tablespoon semolina
1 cup gram flour (Chana Dal flour)
Salt to taste
Red chilli Powder
1/4 tsp turmeric powder
1/2 spoon bread soda (optional)

Recipe:

1. cut onion in such a way that you can make its round shape slices.
2. Make thin round slices of onion.
3. Separate each layer slice from each other.

How to make covering batter :

1. Take gram flour in a large bowl.
2. Add 2 spoons of semolina, turmeric powder, red chili powder, salt and a soda.
3. Add approximately 1/2 cup water and mix it. 4. Keep aside for 10 minutes.

Frying Onion Rings:

1. Heat 1 cup of oil in a bowl. The oil should be completely heated, otherwise the rings will not become crispy.
2. Dip onion slice in batter.
3. Deep fry from both sides
5. To remove excess oil, place tissue on paper.
6. Serve with tomato sauce or chutney.

~ अमृता .. 

अंड्याची भूर्जी / Egg bhurji

१० पैकी ८ जणांना आवडणारी , कमी जिन्नस लागणारी , स्वादिष्ट , करायला सोपी , आणि झटपट होणारी म्हणजे अंडा भूर्जी . 
आता तिला भूर्जी  म्हणा , बुर्जी म्हणा , अंड्याची भाजी म्हणा किंवा मग आमच्यासारखं अंड्याचा गबरा म्हणा ...काहीही म्हणा . 
ती सगळ्या नावात तुमचं पोट तृप्त करेल  आणि  जिभेचेही चोचले पुरवेल . 
आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 
संडे हो या मंडे ..... रोज खाओ अंडे :)

सगळ्यांच्या घरी हा पदार्थ वरचेवर बनत असला तरी प्रत्येकाची करण्याची पद्धत थोडीफार वेगळी आणि त्यामुळे चवीत बराचसा फरक .
म्हणून  आपल्यापैकी लोकांना गाड्यावरची भुर्जी आवडते .
तर ही तुमच्या आवडीची गाड्यावरची अंडा भुर्जी    


साहित्य :

५ अंडी ( खडकी / गावरान असतील तर ६ किंवा ७)
३ मोठे कांदे बारीक चिरून 
१ टोमॅटो बारीक चिरून 
फोडणीसाठी तेल 
हळद , मीठ , लाला मिरची पावडर 
लादी पाव 

कृती :

१. फोडणीसाठी २ ते ३ मोठे चमचे तेल घालावे . 
२. तेल गरम झाल्यावर त्यात बारीक कापलेला कांदा घालून पारदर्शक होई तोवर भाजावा . 
३. बारीक चिरलेला टोमॅटो घालावा . 
४. तो पूर्ण शिजे तोवर हलवत राहावे . 
५. १/४ चमचा हळद घालावी . 
६. चवीनुसार  मीठ व १ मोठा चमचा लाल मिरची पावडर घालावी . 
७. सर्व एकजीव हलवावे . 
८. लाल मिरची पावडर घातल्यावर आच मंद करावी अथवा ती करपते . 
९. ५ अंडी फोडून त्याच्या आतील भाग घालून कवच टाकून द्यावी . 
१०. मिश्रण एकजीव करावे . 
११. बुर्जी पूर्ण भाजेतोवर मोठ्या आचेवर एकसारखी हलवत राहावी . 
१२. आवडत असल्यास शेवटी बारीक चिरलेली किथिंबीर वरून घालावी . 
तळलेली मिरची आणि भाजलेल्या पावासोबत गरम गरम बुर्जी सर्व्ह करावी . शक्यतो वापरावे 

~ अमृता .. 

काजू मसाला / Kaju masala

काजूप्रेमी आपलं प्रेम जपायला बऱ्याचवेळा हॉटेलकडे धावतात . 
काजू मसाला , काजू करी  असले पदार्थ घरी बनतात की हो आणि हॉटेलहून रुचकर , स्वच्छ . मी ही तुमच्यातीलच एक काजूप्रेमी ..... काजू मसाला घरी बनवून खाणारी


साहित्य :


मसाल्यासाठी 
१ १/२  मोठे कांदे
१ टोमॅटो
५ काजू
४ पाकळ्या लसूण
१ इंच आले
खडा मसाला : २ लवंग , तमालपत्र , दालचिनी १/२ इंच

इतर 
फोडणीसाठी तेल
१/४  चमचा हळद
२ मोठे चमचे दही
१/२ चमचा जिरे
१/२ चमचा गरम मसाला
१ चमचा लाल मिरची पावडर
चवीनुसार मीठ
१ मोठा बाउल काजू 

कृती :
काजू मसाला करण्याआधी भाजीत टाकण्याचे१ मोठा बाउल काजू गरम पाण्यात भिजत घालावे . त्यालुमे मसाल्यात लवकर शिजतात .

१. कांदा , टोमॅटो , आले ,लसूण , ५ काजू  एकत्र करावे
२. मिक्सरमधून त्याची बारीक पेस्ट करून घ्यावी .
३. भांड्यात फोडणीसाठी तेल गरम करावे .
४. तापलेल्या तेलात १/२ चमचा जिरे, लवंग , दालचिनी , तमालपात्री  घालावे
५. मिक्सरमधून बारीक केलेला मसाला घालावा .
६. तेल सुटे तोवर मसाला पूर्ण भाजून घ्यावा .
७ . भाजलेल्या मसाल्याला तेल सुटेल .
८. त्यात १/४ चमचा हळद घाला .
९. १/२ चमचा गरम मसाला व १ चमचा लाल मिरची पावडर घाला .
१०. मसाला १/२ मिनिट भाजून घ्या .
११. २ मोठे चमचे दही  १/२ चमचा साखर व चवीनुसार मीठ घाला .  
१२. मसाला हलवून एकजीव करावा .
 १३. मसाल्यात १/२ कप गरम पाणी घालावे आणि एक उकळी काढावी .
१४. गरम पाण्यात भिजलेले काजु घालावे .
१५. हवा  तितका दाटपणा येईतोवर मंद आचेवर शिजत ठेवा .


टीप :
१. काजू भीजले असल्याने लवकर शिजतात .
२. भाजी थोडी पातळ असतानाच गॅसवरून उतरवावी कारण थंड झाल्यावर तिचा दाटपणा अजून वाढतो .


Ingredients:

For gravy

1 1/2 large onions
1 tomato
5 cashew nuts
4 cloves garlic
Came in 1 inch
Khasa masala: 2 cloves, bay leaf, cinnamon 1/2 inch
1/2 spoon Garam Masala
1 spoon red chilli powder

Other: 
oil
cumin powder
1 tsp sugar
1/4 tsp turmeric powder
2 tablespoons curd
Salt to taste
1 large bowl cashew

Recipe : 

Soak 1 large bowl cashew nut in water bofore adding making this recipe.

1. Mix chopped onion, chopped tomatoes, ginger, garlic, and cashew nuts together.
2. Make a fine paste of it with small amount of water.
3. Heat oil for tempering in the vessel.
4. Add 1/2 tsp cumin seeds, cloves, cinnamon, tamarind to this oil.
5. Add  finely grated paste to it.
6. Roast the mixture for small time.
7. Oil starts separating from gravy .
8. Add 1/4 tsp turmeric powder to it.
9. Add 1/2 spoon Garam Masala and 1 spoon red chili powder.
10. Roast gravy for 1/2 minutes.
11. 2 tablespoons curd 1/2 spoon of sugar and salt to taste.
12. Stir gravy finely.
 13. Add 1/2 cup hot water to spice and let it boil on high flame.
14. Add cashews nuts soaked in hot water.
15. Cook this on low flame until gravy turns thicker as you want.


Note:
1. Cashew nuts cooks little early as we already socked them in water.
2. When the vegetable is slightly thin it should be removed from the gas.  It becomes thick when it cools down.

~ अमृता ... 

Sunday, 10 June 2018

तांदळाच्या पिठाच्या उकडीच्या भाकरी / Supersoft rice flour bhakari / bread

घरातले सगळे आपापल्या कामात मग्न असतात आणि अशावेळी एकदमच स्वयंपाक खोलीतून धाप धाप असा आवाज यायला सुरु होतो .आणि त्यासोबत बांगड्याचा किणकिणाट . 
 ज्यांनी भाकरीची चव चकलीये त्याच्या लगेच लक्षात येत . 
आई भाकरी थापतेय 

भाकरी म्हणजे एक कला आहे जी आईकडून लेकीला वारसा हक्काने मिळते . मलाही भाकऱ्या शिकवायला माझ्या आईने कष्ट घेतलेच की . 


परातभर पसरलेलं ते कोरडं पीठ , त्यावर तिने अलगद हाताने फिरवलेलॆ गोळा मध्यभागी जाऊन बसतो . आणि मग माझी आई त्या धाप धाप आवाजाच्या लयीत गोल गोळ्याची पातळसर परातभर मावेल अशी भाकरी थापते . 

भाकरी थापायलाही खूप सवय असावी लागते बरं का . इतक्या सहज सहजी जमणार काम न्हवे ते .हात फक्त डावीकडून उजवीकडे फिरवायचा . फक्त हातांसोबत भाकरीही फिरली पाहिजे परातीत . 
पिठात एकदा हात घालून बघाच हो नक्की मग लक्षात येईल ... आई नेमकं काय दिव्य करत असेल . 

खरी कसोटी तर याच्या पुठे आहे राव 
थापलेली  भाकरी परातीतून उचलून तव्यात टाकायची कशी ?????
याच कौशल्य शिकवायला शेजारी आईचं उभी असली पाहिजे . 

हो आणि तव्यात ती फुगलीही पाहिजे ... ट ट ट ....म    
हात भाजू न देता तितक्याच चलाखीने ज्योतीवरून फिरवत आली  की मग काम फत्ते 

उगाच म्हटलंय होय .... आधी हाताला चटके मग मिळते भाकर  

भारतातील राहू द्या पण कमीत कमी महाराष्ट्रातील तरी प्रत्येक गृहिणीला भाकरी थापता आलीच पाहिजे . 
या मटण , चिकन आणि माश्याच्या कालवनांसोबत भाकरी खाण्यात जी मजा आहे ती चपातीमध्ये नाही हो 
काहीही म्हणा .. आणि पटलं तर शिकून घ्या भाकऱ्या :)


साहित्य :

१ कप तांदळाचे पीठ
पाणी
२ चमचे तेल

भाकरीची उकड शिजवण्याकरिता तांदळाचे पीठ आणि पाणी समप्रमाणात घ्यावे . इथे १ कप पिठासाठी १ कप पाणी वापरावे  





कृती :

तांदळाच्या पिठाची उकड :

१. तांदळाचे पीठ आणि पाणी दोन वेगळ्या भांड्यात समप्रमाणात काढून घ्यावे . 
२. इथे १ कप पिठास १ कप पाणी घ्यावे 
३. एका भांड्यात हे पाणी गरम करण्यास ठेवावे . 
४. पाण्याला उकळी आली की त्यात २ चमचे तेल टाकावे . 
५. मोजून घेतलेले तांदळाचे पीठ उकळत्या पाण्यात घालावे . 
६. जलद गतीने हलवून उकड एकजीव करावी . गॅसवरून उतरून ठेवावी  
७. झाकणी ठेवून १/२ मिनिट उकड भांड्यात ठेवावी .
८. ही उकड गरम असतानाच परातीत काढून घ्यावी . 
९. थंड पाण्याचा हात लावून भाकरीच्या पिठासाठी मऊ मळून घ्यावी . 
१०. साधारण १ वाटी पाणी थोडे थोडे घालून मऊपणा येईतोवर उकड मळून घ्यावी . 
११. उकडीचा चिकटपणा पूर्ण निघून जाईल आणि मऊ पिठाचा गोळा तयार होईल . 
१२. पीठ सरळ मळले नाही अन्यथा मळताना पाणी कमी वापरले तर भाकरी कडक होतात   

भाकरी थापण्याची पद्धत :


भाकरी भाजण्यासाठी तवा ती थापण्याआधीच गरम करत ठेवावा .

१. कोरड्या पळपाटावर , परातीत तांदळाचे कोरडे पीठ पसरून घ्यावे .
२. मळलेल्या पिठाचा दोन हातात गोल पुरवून मध्यम आकाराचा गोळा करावा .

   पिठाच्या गोळ्याला कुठेही चीर नसेल तरच पीठ चांगले मळले गेले असे समजा .
   गोळ्याला चीर असेल तर भाकरी थापताना मोडते .

३. हा गोळा परतीच्या , पळपाटाच्या मध्यभागी कोरड्या पिठावर ठेवावा .



४. उजव्या हाताने डावीकडून उजवीकडे गोळा फिरवत भाकरी थापावी .
५. भाकरीच्या कडांसहित ती सर्व बाजूनी पातळ थापावी .


भाकरी भाजण्याची पद्धत :


१. थापलेली भाकरी उजव्या हाताच्या बोटानी अलगद सरकवत डाव्या हाताच्या पंजावर घ्यावी 
२. डाव्या हातावरच्या भाकरीचा वरचा भाग खाली जाईल अशा पद्धतीने ती तापलेल्या तव्यात टाकावी .
भाकरीसाठी तवा पूर्ण तापलेलाच हवा अन्यथा भाकरी जास्त वेळ तव्यात राहते आणि कडक होते .  
३. साधारण १/२ मिनिटाने उजव्या हाताच्या बोटांनी तव्यातील भाकरीच्या वरच्या बाजूस  थंड पाणी पसरून घ्यावे 
४. भाकरीच्या कडा साधारण १/२ मिनिटात सुटायला सुरु होतात. 
५. कडा सुटल्या की हलक्या हाताने भाकरी पालटावी . 
६. भाकरीची पाणी लावून पलटलेले बाजू पूर्ण भाजली की भाकरी नुसत्या बोटाने तवाभर फिरू शकते . 
 तव्यात भाकरी न फिरत चिकटून राहिली असेल तर तिला अजून थोडा वेळ भाजावी .  
याला भाकरी नीट पचली असं म्हणतात . 
७. ही पचलेली भाकरी डाव्या चिमटीने तव्यातून वर उचलावी . 
८. तवा गॅसवरून बाजूला करावा . 
९. डाव्या हातातील भाकरी गॅसच्या ज्योतीवर पालथी करावी . 
१०. दर सेकदाला ज्योतीवरून हलवत सर्व बाजूनी भाजून घ्यावी .   
११. भाकरी जितकी  पातळ थापली असेल तितकी भाजताना लवकर फुगते. 
१२. जर घरी ज्योतीची शेगडी  नसेल , तुम्ही जर इलेकट्रीक शेगडी वापरात असाल तर शेवटच्या टप्प्यातील ज्योतीवर भाकरी भाजणे शक्य होत नाही . अशावेळी ती याच पद्धतीने तव्यात पालथी टाकावी . 
१३. वरच्या बाजूने रुमालाने हलकेच दाब देत गोल फिरवत भाजावी . 
१४. रुमालाने दाब दिल्याने ज्योतीशिवायही भाकरी फुगते .   

टीप :
१. पीठ सरळ मळले नाही अन्यथा मळताना पाणी कमी वापरले तर भाकरी कडक होतात

~ अमृता .. 

मालवणी चिकन / Malawani chicken






साहित्य :

१/२ किलो चिकन
२ कांदे बारीक चिरून
फोडणीसाठी तेल
हळद
मसाल्यासाठी :
१ वाटी सुके खोबरे
२ चमचे पांढरे तीळ
३ लवंग
१ तमालपत्र
१/२ इंच दालचिनी
२ चमचे आले लसूण पेस्ट
६ लाल सुक्या मिरच्या
२ चमचे धने
१/२ चमचा गरम मसाला ( ऐच्छिक )
मीठ

कृती :

चिकन शिजवण्याच्या कृतीसाठी इथे क्लिक करा .

कोल्हापुरी पांढऱ्या रश्श्याच्या रेसिपीसाठी इथे क्लीक करा . 

मालवणी चिकन मसाला : 




१.सुके खोबरे किसून घ्यावे
२. एक कांदा बारीक चिरून तेलावर भाजून घ्यावा .
३. तीळ, लाल सुक्या मिरच्या , धने  गरम तव्यावर भाजून घ्यावे .
४. खडा मसाला गरम तव्यावर  भाजून घ्यावा .
५. साहित्यात दिलेले सर्व जिन्नस एकत्र करून त्याची बारीक पेस्ट करून घ्यावी .  





६. एका जाड बुडाच्या भांड्यात ३ ते ४ चमचे तेल गरम करावे .
७. त्यात १ बारीक चिरलेला कांदा घालावा .
८. १/२ चमचा हळद घालून परतावे .
९. बारीक केलेली मसाल्याची पेस्ट घालावी .
१०. मसाल्याला तेल सुतेतोवर मसाला माध्यम आचेवर भाजून घ्यावा .
११. १/२ पेला कडकडीत गरम पाणी घालीन २ मिनिट शिजवून घ्यावा .
१२. त्यात चिकनच्या शिजलेल्या फोडी घालून हलवून घ्यावे .
१३. मंद आचेवर २ मिनिट शिजवून घ्यावे . चिकनला तेलाचा लाल तवंग येईल .
मालवणी चिकन तांदळाच्या भाकरीसोबत खायला छान लागते .



टीप :

चिकनच्या फोडी मसाल्यात घातल्या नंतर चिकन फारसे हलवू नये अन्यथा शिजलेल्या फोडी मसाल्यात शिजतात .

~ अमृता .. 

चिकन, मटण शिजवण्याची पद्धत / How to cook chicken , meat



साहित्य :
१/२ किलो चिकन / मटण 
१ कांदा बारीक चिरून 
मीठ गरम पाणी 
तेल 
आले लसूण पेस्ट 

दही 

कृती :

पांढऱ्या रस्श्याच्या रेसिपीसाठी इथे क्लीक करा .

चिकन शिजवण्याची कृती

१. चिकन स्वच्छ धुवून घ्या .
२. त्यात १ वाटी दही , २ चमचे आले लसूण पेस्ट घालून एकत्र हलवा .

मटण शिजवायचे असेल तर त्याला दही लावून मॅरीनेट करण्याची गरज नाही . स्वच्छ धुवून कांद्यात फोडणी घाला . बाकी कृती सारखीच .



३. हे मिश्रण १ तास मुरण्यासाठी ठेवूं द्या .
४. १ तासानंतर चिकन शिजवण्याच्या भांड्यात फोडणीसाठी तेल गरम करून घ्या .



५. त्यात १ बारीक चिरलेला कांदा घालून २ मिनिट परतून घ्या .
६. मॅरीनेट केलेलं चिकन घालून हलवून घ्या .
चिकन फोडणी घालताना हळद वापरायची नाही . आपल्याला रस्सा पांढरा हवाय .



७. आवश्यक तितके मीठ घालून हलवा  .
८. झाकणी लावून मंद आचेवर शिजत ठेवा .(शक्यतो झाकण्यासाठी खोलगट ताट वापरावे . त्यावर पाणी ठेवता येईल आणि वाफेवर आतील चिकन शिजेल ).  मिठामुळे चिकनला पाणी सुटेल . याच पाण्यात चिकन शिजू द्या .
९.  चिकनला सुटलेले पाणी संपले की मग ताटावर गरम करत ठेवलेले पाणी अर्धी वाटी चिकन मध्ये ओता .



१०. पुन्हा झाकलेल्या ताटावर पाणी भरून ठेवा.
११. जोवर चिकन शिजत नाही तोवर ते तटावरच्या गरम पाण्याने शिजवा
चिकनमध्ये एकदम सगळे पाणी ओतू नये . अर्धा वाटी पाणी संपल्यावर मगच पुढील पाणी ओतावे . चिकन लवकर शिजते आणि हाडांचा सूप चांगला येतो .
12. चिकन / मटण शिजल्यानंतर त्यातील फोडी बाजूला काढून घ्या .



१३. फोडी  बाजूला केल्यानंतर शिल्लक राहिलेले सूप पांढरा , तांबडा रस्सा बनवण्यास वापरा .  

पांढऱ्या रस्श्याच्या रेसिपीसाठी इथे क्लीक करा .



मटण शिजवायचे असेल तर त्याला दही लावून मॅरीनेट करण्याची गरज नाही . स्वच्छ धुवून कांद्यात फोडणी घाला . बाकी कृती सारखीच . 

टीप :
मटण शिजण्यास जास्त वेळ लागत असेल आणि शिजून हवे तितके मऊ होत नसेल तर शिजताना सुपारीचा तुकडा टाकावा . 

साधारणपणे लाल रंगाचे मटण शिजण्यास उशीर लागतो .  

~ अमृता .. 

Popular Posts