उन्हाळा सुरु झाला रे झाला की आईस्क्रीमचे डोहाळे लागतात सगळ्यांना . अगदी लहानापासून मोठ्यांपर्यंत .
उन्हाळ्याची सुट्टी म्हणून मग पिल्लांसाठी घरी बाबानी वेगवेगळी फळेही आणून ठेवलेली असतात. पण नुसती फळे आवडीने खातील तर ती मुलं कसली :)
मग त्या फळांचं कस्टर्ड केलं तर ? भारी आयडिया आहे .....
आता घरी कस्टर्ड पावडर नाहीये म्हणून उगाच कारणं नकोयेत .....
कारण हे फ्रुट कस्टर्ड आपण कुठल्याही इसेंन्स आणि पावडरशिवाय १००% फळांपासून करणार आहोत .
आहेत कुठे ....
कॅलरीजची आकडेमोड करून खाणाऱ्या महाभागांना .... अ ... चुकून म्हटलं बर का :P
तर कॅलरीजची आकडेमोड करून खाणाऱ्यांनाही मनसोक्त खाता येईल अशी डिश..
चॉकलेट फ्रुट कस्टर्ड
आणि चॉकलेट म्हटलं की कुठलं आलाय पथ्य आणि कॅलरीज .... :D
साहित्य :
६ पूर्ण पिकलेली केळी
१/४ वाटी दूध
१ सफरचंद
१ वाटी द्राक्षे
४ ते ५ स्ट्रॉबेरी
२ चमचे साखर
१ चमचा पीनटबटर
१ चमचा न्यूटेला ( किंवा चॉकलेट सिरप )
२ कप केक ( ऐच्छिक )
बदामाचे काप सजावटीसाठी
कृती :
१. सर्व केळी सोलून, साखर घालून मिक्सरमधून फिरवून त्याची पेस्ट करून घ्या . ही पेस्ट करताना गरज वाटल्यास १/४ वाटी थंड दूध वापरा .
२. केळ्याची पेस्ट केला मोठ्या बाऊलमध्ये काढून घ्या .
३. त्यात १ चमचा पीनटबटर , १ चमचा न्यूटेला ( किंवा चॉकलेट सिरप ) घालून चांगले एकजीव करून घ्या .
४. सफरचंदाचे बारीक पातळ काप करून घ्या . साल काढण्याची गरज नाही .
५. स्ट्रॉबेरीचे लहान काप करून घ्या .
६. आता बाऊलमधील मिश्रणात सफरचंदाचे काप , द्राक्षे , स्ट्रॉबेरीचे काप घालून एकत्र करा .
घरी अजून कोणती गोड फळे असतील तर ती ही वापरण्यास हरकत नाही .
७. २ कप केकचा हाताने चुरा करून मिश्रणात मिसळा .
८. हे चॉकलेट फ्रुट कस्टर्ड १/२ तास थंड होण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवून द्या . (जिथे आपण बर्फ करतो त्या फ्रिजरमध्ये नाही .)
९. १/२ तासांनी हे चॉकलेट फ्रुट कस्टर्ड खाण्यास तयार ....
१०. सर्व्ह करताना एका काचेच्या बाऊलमध्ये ३/४ चॉकलेट फ्रुट कस्टर्ड भरून घ्या .
११. वरून अजून थोडे फळांचे काप पसरावा .
१२. सजावटीसाठी वरून बदामाचे काप घाला .
Ingredients:
6 full-riped bananas
1/4 cup milk
1 apple
1 cup grapes
4 to 5 strawberries
2 tsp sugar
1 spoon peanutbuter
1 spoon nuella (or chocolate syrup)
2 cups cake (optional)
For decoration almonds
Action:
1. Peel all the bananas, add 2 tsp sugar and put them in a mixer and make a paste of it. Use 1/4 cup cold milk if needed.
2. Transfer banana paste in a large bowl.
3. Add 1 spoon peanut butter, 1 spoon of nutella (or chocolate syrup) and mix it well.
4. Finely chop the apple in thin n small pieces. No need to remove it's cover.
5. Chop strawberries into small slices.
6. Now mix the apple slices, grapes, strawberry slices in a bowl of banana mixture.
If there are other sweet fruits at home then you can use it.
7. Smash 2 cup cakes and mix it in the bowl.
Chocolate fruit custard is ready.
8. Put this chocolate fruit custard in the refrigerator to cool for 1/2 hours.
9. Chocolate fruit custard will ve ready to eat in 1/2 hour.
10. Fill 3/4 chocolate fruit custard in a glass bowl while serving.
11. Put some more fruit slices on top of it.
12. Put almond slices on top for decoration.
~ अमृता
No comments:
Post a Comment