हिरव्या मिरचीचा खरडा आणि भाकरी ..... १ नंबर
आजपर्यंत भारतीय आणि भारताच्या बाहेर ही खूप डिश खाल्ल्या . पण खरड्यासारखी tempting आजवर सापडली नाही मला .
पहिला खास खाल्ल्या खाल्ल्या जिभेला कशी चरचरी येते . आम्हा कोल्हापूरकरांनी जितकं प्रेम रंकाळ्यावर केलय तितकंच कदाचित त्याहून थोडं जास्तच खरडा भाकरीवर केलंय
पूर्वीच्या बायका मिक्सरऐवजी खरडा खलबत्यात ठेचून बनवतं . कदाचित यामुळेच त्याला मिरचीचा ठेचा असंही नाव आहे .
इतकं तिखट नसेल जमत ( पचत :P ) खायला तर तुम्ही का हिरव्या मिरचीचा खरडा दह्यासोबत खाऊन बघा . थोडा तिखटपणा कमी जाणवेल आणि न खाल्ल्याचं दुःख ही नाही राहणार कोण्या खवय्याला :)
ज्या लोकांना खुपच कमी तिखट खाण्याची सवय असेल त्यांनी टीप क्र ४ आवर्जून वाचावी .
साहित्य :
२० ते २२ हिरव्या मिरच्या (टीप क्र . १)
१ मोठी वाटी कोथिंबीर निवडून , धुवून
२ चमचे मोठे मीठ (पांढरे)
७ ते ८ लसूण पाकळ्या
१ मध्यम आकाराचा कांदा उभा कापून
१/ २ चमचा लिंबाचा रस (ऐच्छिक)
कृती :
१. हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून , कापडाने पुसून कोरड्या करून घ्या .
२. मिरचीची देठे खुडून घ्या .
३. ७ ते ८ लसूण पाकळ्या सोलून घ्या .
४. १ मोठी वाटी कोथिंबीर निवडून , धुवून उन्हामध्ये पसरवून वाळवून घ्या.
५. १ मध्यम आकाराचा कांदा उभे काप करून घ्या .
६. तापलेल्या लोखंडी तव्यावर मिरच्या , लसूण आणि कांदा २ चमचे तेल घालून चांगला भाजून घ्या
७. भाजलेले हे पदार्थ थंड होऊ द्या .
८. त्यात २ चमचे मोठे मीठ घालून खलबत्त्यात मिरचीचा ठेचा चांगला ठेचून घ्या . (टीप क्र. ३)
हल्ली बऱ्याच घरी खलबत्ता मिळत नाही . ज्यांच्याकडे नसेल त्यांनी हे मिश्रण मिक्सरमधून फिरवून घ्या .
९. १/ २ चमचा लिंबाचा रस खालून एकजीव करून घ्या .
टीप :
१. खरड्यासाठी मिरच्या घेताना गडद हिरव्या काळपट रंगाच्या आणि अंगाने बारीक घ्याव्या . कारण जाडी वाढली की तिखटपणा कमी येतो ...... मिरचीचा :)
२. मिरचीचा देठाला बाजूने वास घेऊन मिरची किती तिखट आहे हे ओळखता येते .
३. खलबत्त्याने ठेचून केलेल्या खरड्याची चव मिक्सरमधून काढलेल्या खरड्यापेक्षा जास्त चांगली लागते . शेवटी जुनं ते सोनंच :)
४. खरड्याचा तिखटपणा कमी करण्यासाठी बारीक करताना त्यात १/२ वाटी भाजके शेंगदाणे सोलून घालावे .
मग काय ..... कधी करताय खरडा भाकरी :)
Ingredients:
20 to 22 green chillies (Refer note no. 1)
1 large bowl coriander washed
2 tbsp salt (white)
7 to 8 garlic cloves1
1 medium size chopped onion
1/2 spoon lemon juice (optional)
Recipe:
1.Wash green chillies, dry them with clean cloth.
2. Chop the chilli's stem.
3. Peel 7 to 8 garlic cloves.
4. Take 1 large bowl of coriander. Wash it well. Wipe with tissue or cloth . Make it dry in sunlight.
5. Chop 1 medium sized onion.
6. Add chilli, garlic and onion and 2 tbsp oil to an iron pan and roast it well.
7. Keep it cool down.
8. Add 2 tbsp of salt to it and crush it well. (Note no.3)
Use traditional stone grinder to make this recipe. If it's not available, you can use regular electric grinder.
9. Take 1/2 spoon of lemon juice and mix it well.
Note:
1. While selecting green chilli for Khar, take dark green coloured and thin chillies.
2. If you will cut chilli's stem part and smell, you can guess how spicy chilli is .
3. Taste of chilli thech made with traditional stone grinder is awesome than electric grinder.Afterall old is gold.
4. To make thech less spicy, add roasted crushed peanuts .
~ अमृता
No comments:
Post a Comment