आंबे डाळ ही चैत्रागौरीच्या हळदी कुंकवासाठी करतात .
कच्च्या कैरीची ही डाळ नुसती खायला ही बऱ्याच जणांना आवडते .
करीचे पन्हे कृतीसाठी इथे क्लिक करा .
साहित्य
१ वाटी कच्ची कैरी सोलून किसून
१ १/२ वाटी चणा डाळ
२ हिरव्या मिरच्या
कोथिंबीर
१/२ लिंबाचा रस
फोडणीसाठी तेल , हिंग , मोहरी
मीठ
कृती :
चणा डाळ आदल्या दिवशी भिजत घालावी
१. साधारण २ कच्च्या कैऱ्या सोलून घ्यावा .
२. कैऱ्या किसणीने किसून घ्यावा .
३. ७ ते ८ तास पाण्यात भिजलेली छान डाळ पाण्यातून उपसून घ्यावी .
४. मिक्सरमधून जाडसर वाटून घ्यावी .
५. चणाडाळ वाटताना त्यात २ हिरव्या मिरच्याही वाटून घ्यावा.
६. एका भांड्यात फोडणीसाठी २ चमचे तेल गरम करावे .
७. त्यात मोहरी आणि चिमूटभर हिंग घालावा .
८. वाटलेली डाळ घालून चटकन झाकण लावावे जे ने करून फोडणीचा वास जाणार नाही .
९. गॅसवरून भांडे उतरवून घ्यावे .
१०. त्यात किसलेली कैरी , चवीनुसार मीठ घालावे .
११. आंबटपणा कमी पडल्यास २ चमचे लिंबाचा रस घालावा
१२. १/२ चमचा भाजलेले मेथी दाणे पूड करून घातल्यास कैरी डाळ खायला छान लागते .
~ अमृता ..
No comments:
Post a Comment