कच्च्या कैरीची खूप वेगवेगळ्या प्रकारे चटणी करता येते . यातील माझ्या आवडीची ही
कैरीची लाल चटणी.
खूप पटकन ही होते आणि फार काही जिन्नस ही नाही लागत .
कच्च्या कैरीची आंबट गोड लाल चटणी
साहित्य :
२ कच्च्या कैऱ्या
१/२ वाटी सुके खोबरे
२ लसूण पाकळ्या (ऐच्छिक)
मीठ , गूळ , लाल मिरची पावडर , हळद
फोडणीसाठी तेल , मोहरी
कृती :
१. कैऱ्या स्वच्छ धुवून त्याची साले काढून घ्याव्या .
२. कैरीचे बारीक काप करून ठेवावे .
३. १/२ वाटी सुके खोबरे आणि १ मच्यम आकाराचा गुळाचा खडा किसून घ्यावे .
४. मिक्सरमध्ये कैरीचे काप , किसलेले सुके खोबरे , लसूण पाकळ्या आणि गूळ बारीक करून घ्या .
५. फोडणीसाठी तापवलेल्या तेलात मोहरी, घालावी .
६. मोहरी तडतडली की १/२ चमचा हळद , १ चमचा लाल मिरची पावडर घालून परतून घ्यावे .
७. लगेचच मिक्सरमधील मिश्रण घालून वरून झाकणी झाकावी . लगेच मिश्रण घातल्याने हळद करपणार नाही आणि झाकणीमुळे फोडणीचा वास चटणीमध्येच राहील .
८. चवीनुसार मीठ घालून चटणी घट्ट होईतोवर मंद आंचेवर हलवत रहा.
Ingredients:
2 raw mangoes
1/2 cup dried coconut
2 garlic cloves (optional)
Salt, jaggery, red chilli powder, turmeric powder
For tempering oil, mustard seeds
Recipe:
1. Clean raw mangoes and peel it.
2. Chop it in small pieces.
3. Grate 1/2 cup dry coconut and 1 medium-sized jaggery
4. Grate raw mango pieces, grated dried coconut, garlic cloves and jaggery in a mixer.
5. Add mustard in frying oil heated for tem.
6. Add 1/2 spoon turmeric powder, 1 spoon red chilli powder and sauté it.
7. Immediately add a grated paste of raw mango and cover the lid.
8. After adding the salt as per your taste, keep stirring chutney for some time.
~ अमृता ..
No comments:
Post a Comment