साहित्य :
१ १/२ कप उडीद डाळ
२ १/२ कप पाणी
मीठ
तळण्यासाठी तेल
साखर
२ मोठे बाउल दही
जिरा पावडर
लाल मिरची पावडर
कोथिंबीर बारीक चिरून
चिंच गुळाची गॉड चटणी
कृती :
१. १ १/२ कप उडीद डाळ स्वच्छ धुवून २ १/२ कप पाण्यात ६ तास भिजत ठेवा .
२. ६ तासांनी त्यातील नाही काढून मिक्सरमधून पेस्ट करून घ्या .
३. चवीनुसार मीठ घाला .
४. एका भांड्यात तळण्यासाठी तेल गरम करा .
५. तेल पूर्ण तापले की त्यात चमच्याने वडे सोडा . लहान चमच्याच्या मागच्या बाजूने तेलात सोडलेल्या वड्याला मध्यभागी गोलाकार भोक करून घ्या .
६. सोनेरी रंगाचा होईतोवर वडा दोन्ही बाजूनी तळून घ्या .
७. तळलेले वाडे टिशूंपेपरवर काढून घ्या . जास्तीचे तेल टिशूंपेपरमध्ये ओढले जाईल.
८. एका भांड्यात १/२ कप पाणी घेऊन त्यात १/२ चमचा साखर आणि चवीनुसार मीठ घालून विरघळून घ्या.
९. तळलेले वडे थंड झाले की या पाण्यात घालून १० मिनिटे भिजू द्या .
१०. १० मिनिटं नंतर बोटानी हलके दाबून जास्तीचे पाणी काढून घ्या .
दही वड्यासाठी लागणारे दही :
१. एका मोठ्या भांड्यात २ बाउल दही काढून घ्या .
२. त्यात चवीनुसार मीठ , ३ चमचे साखर , १/२ चमचा जिरे पावडर घाला .
३. १/२ कप पाणी घालून दही चांगले फेटून घ्या .
४. फ्रिजमध्ये १/२ तास ठेवून थंड करा .
खजूर आणि चिंचेची गोड चटणी तयार करून घ्या .
दही वडा कसा वाढावा ?
१. एका मोठ्या बाऊलमध्ये तळला २ पळी दही घालून घ्या .
२. त्यावर पाण्यातून पिळलेले ३ वडे ठेवा .
३. त्यावर पुन्हा २ पळी दही घाला .
४. वरून १ मोठा चमचा चिंच गुळाची गोड चटणी घाला .
५. त्या वरून लाल मिरची पावडर भुरभुरा .
६. सजावटीसाठी वरून कोथिंबीर पेरा .