साहित्य :
१ १/२ कप मैदा / गव्हाचे पीठ
१/२ कप दही
१/२ चमचा खायचा सोडा
चवीनुसार मीठ
१/२ चमचा साखर
२ चमचे तेल
१/२ वाटी कोमट दूध / कोमट पाणी
२ चमचे onion seeds / तीळ
कोथिंबीर बारीक चिरून
२ लसूण पाकळ्या किसून
कृती :
१. साहित्यात दिलेले जिन्नस १ १/२ कप मैदा / गव्हाचे पीठ,१/२ कप दही,१/२ चमचा खायचा सोडा ,चवीनुसार मीठ ,१/२ चमचा साखर,२ चमचे तेल
कोमट दूध / पाण्याव्यतिरिक्त एकत्र करावे .
२. गरजेनुसार कोमट दूध / पाणी वापरून कणिक घट्ट मळून घ्यावे .
३. ओले कापड झाकून हे कणिक कमीत कमी १/२ तास भिजण्यास ठेवावे .
४. अर्ध्या तासाने कणिक किंचित फुगून येईल .
५. मोठ्या लिंबाच्या आकाराचे गोळे करून घ्या .
६. गॅसवर साधा तवा तापण्यास ठेवून द्या . नॉनस्टिक पॅन वापरू नये .
७. कणकेचा एक गोळा घेऊन तो कोरड्या पिठात घोळवून गोल / अंडाकृती आकारात लाटून घ्या . रोटी जास्त पातळ लाटू नये .
८. चिमूटभर तीळ / onion seed , चिरलेली कोथिंबीर आणि किसलेला लसूण पूर्ण रोटीला पसरून घ्या .
९. रोटी पुन्हा एकदा हळुवार लाटून घ्या जे ने करून topping घट्ट चिकटून बसेल .
१० . आता लाटलेली रोटी पालथी टाका .
११. वर आलेल्या दुसऱ्या बाजूस भरपूर थंड पाणी पसरून घ्या . रोटी या बाजूने पूर्ण ओली झाली पाहिजे .
१२. ओली बाजू तव्याला चिकटेल अशा रीतीने रोटी तापलेल्या तव्यावर टाका .
१३. पाण्यामुळे रोटी तव्याला चिकटून बसेल .
१४. साधारण १ मिनिटात एक बाजू भाजून होते .
१५. चिकटलेल्या रोटीसाहीत तवा गॅसच्या मध्यम ज्योतीवर पालथा घाला .
१६. रोटीची ही बाजूही ज्योतीने भाजली जाईल . हे करताना तवा हलवत राहण्याची गरज आहे. रोटी कुठेही करपू देऊ नये .
१७. दोन्ही बाजू भाजल्यानंतर रोटी तव्यावरून उतरून घ्या .
१८. वरून १/२ चमचा बटर / ताजे लोणी पसरा .
टीप :
१. मैदा वापरल्यास रोटी रंगाने पांढऱ्या होतात .
२. गव्हाचे पीठ वापरल्यास रोटी गव्हाळ तांबूस रंगाच्या होतात .
३. मैद्याची रोटी गरम गरम खावी. थंड झाल्यास चिवट होते .
४. गव्हाची रोटी थंड झाल्यास चिवट होत नसल्याने वाढण्याआधी थोडा वेळ करून ठेवू शकता .
५. रोटीसाठी नॉनस्टिक पॅन वापरू नये . अन्यथा रोटीची दुसरी बाजू भाजण्यास ताव उलटा केल्यास रोटी तव्यास चिकटून राहत नाही
६. रोटी पातळ न लाटता साधारण जाडसर लाटावी तरच भाजल्यावर वरच्या बाजूस फुगून येते .
~ अमृता ..
No comments:
Post a Comment