साहित्य :
१ कप मैदा
२ चमचे बेकिंग पावडर
१ अंडे
१/२ कप पिठी साखर
३ मोठे चमचे बटर
वेलची पूड
१ हापूस आंबा पूर्ण पिकलेला
१/४ कप दूध
ड्रायफ्रूट आवडीनुसार
सजावटीसाठी
जॅम
आंब्याचे पातळ काप
आवडीची फळे
कृती :
१. एका भांड्यात १ कप मैदा आणि २ चमचे बेकिंग पावडर एकत्र करून घ्या .
२. एका मोठ्या बाऊलमध्ये १ अंडे फोडून घ्या
३. . ते फुगून येईतोवर ३ ते ४ मिनिटे फेटून घ्या .
४. फेटलेल्या अंड्यात १/२ काप पिठी साखर आणि ३ चमचा बटर घाला .
५. मिश्रण अंदाजे ५ मिनिट फेटून घ्या .
६. ह्या फेटलेल्या मिश्रणात मैदा आणि बेकिंग पावडरचे मिश्रण १ -१ चमचा घालत फेटत राहा .
७. मैदा पूर्ण घालून करून झाल्यावर १/४ कप थंड दूध घाला.
८. १० मिनिट मिश्रण एकाच बाजूने फेटून घ्या .
९. १/२ आंब्याचा गर काढून त्याची मिक्शरमधून पेस्ट करून घ्या .
१०. ही पेस्ट या मिश्रणात घालून पुन्हा ५ मिनिट फेटून घ्या .
११. उरलेल्या आंब्यांपैकी अर्ध्या आंब्याचे छोटे काप करून मिश्रणात टाका .
१२. आवडीनुसार ड्रायफ्रूट घाला .
१३. मिश्रण अजून एकवार चांगले फेटून घ्या
बेकिंग :
१. ओव्हन १०० डिग्रीला २ ते ३ मिनिट प्रीहीट करून घ्या .
२. केक ज्या भांड्यात करणार ते ही भांडे ओव्हनमधून प्रीहीट करून घ्या .
३. या भांड्याला तळाला बटर पेपर लावून घ्या .
बटर पेपर नसेल तर तळाला बटर लावून घ्या
४. फेटलेले मिश्रण भांड्यात ओता .
ओव्हन नसेल तर केक कुकरमध्येही करता येतो . त्यासाठी खालील टीप वाचा .
५. ओव्हनमध्ये १५० डिग्री तापमानाला ३० मिनिट ठेवून द्या .
६. ३० मिनिटांनी केक चे भांडे बाहेर काढून तो पूर्ण बेक झाल्याची खात्री करून घ्या .
त्यासाठी केक च्या मध्यभागी सूरी पूर्ण खालीपर्यंत घालून पुन्हा वर काढा . सुरीला काहीही न चिकटता ती स्वच्छ अली पाहिजे .
सूरीला लागून मैदा थोडाजरी आला असेल तर अजून २ मिनिट बेक करा . पुन्हा एकदा चेक करा .
७. बेक झालेला केक १० मिनिट पूर्ण थंड होऊ द्या .
८. कडांनी सूरी पुरवून कडा भांड्यापासून सोडवून घ्या .
९. भांडे उलटे करून केक काढून घ्या .
१०. पूर्ण फुगलेला केक भांड्यातून अलगद बाहेर येईल.
११. फुगलेली बाजू वर येण्यासाठी केक पुन्हा एकदा प्लेटमध्ये उलटा करा .
१२. जॅम , आंब्याचे काप , आवडीची फळे लावून सजवून घ्या .
टीप :
१. ओव्हन नसेल तर हा केक कुकरमध्ये ही करता येतो .
२. कुकरमध्ये तळला मीठ घालून ५ मिनिट कुकर गरम करून घ्या .
कुकर गरम करण्याआधी त्याची शिटी बाजूला काढून ठेवा .
३. कुकरच्या भांड्याला बारात लावून केकचे मिश्रण त्यात ओता .
४. गरम कुकरमध्ये एक छोटी वाटी उपडी ताण आणि त्यावर केकचे हे भांडे ठेवा .
५. यामुळे केळीच्या भांड्याला गॅसची जास्त उष्णता लागणार नाही .
६. झाकणी लावून ३० मिनिटे ठेवून द्या .
७ बाकी कृती वरील प्रमाणे
No comments:
Post a Comment