साहित्य :
२ कप अख्खा बासमती तांदूळ
तेल
जिरे , लवंग , दालचिनी , तमालपात्री , वेलदोडे
१ चमचा आले लसूण पेस्ट
२ हिरव्या मिरच्या
तळलेला कांदा १ वाटी
गरम मसाला १/२ चमचा
केसर १/२ चमचा
१/४ कप सफरचंदाचे काप
१/४ कप द्राक्षे
१/४ कप अननस
बदाम , अक्रोड , काजू , मनुके मिळून १/२ कप
कोथिंबीर बारीक चिरून
कृती :
१. बासमती तांदूळ धुवून निथळून १/२ तास ठेवून द्या .
२. १/२ चमचा केसर कोमट दुधात भिजवून घ्या .
३. बदाम , अक्रोड , काजू कोमट पाण्यात १० मिनिटे भिजवून घ्या . त्यामुळे ते नरम होतील .
४. २ मोठे कांदे तळून घ्या . तळलेल्या कांद्याच्या रेसिपीसाठी इथे क्लिक करा .
५. मोठ्या भांड्यात फोडणीसाठी २ मोठे चमचे तेल गरम करा .
६. त्यात जिरे , २ लवंग , १/२ इंच दालचिनी , १ तमालपात्री , २ वेलदोडे सोलून घाला .
७. २ चमचे आले लसूण पेस्ट आणि गरम मसाला पावडर घाला .
८. धुतलेले बासमती तांदूळ घालून हलके होईतोवर भाजून घ्या .
९. चवीनुसार मीठ घाला .
१०. तांदळाच्या दीडपट पाणी घालून भट मध्यम आचेवर सडसडीत शिजवून घ्या .
पाण्याचे प्रमाण भाताच्या प्रकारानुसार बदलू शकते .
११. साधारण १० मिनिटांनी भट पूर्ण शिजेल .
१२. सजलेला भात मोठ्या ताटात पसरून १ चमचा तूप घाला आणि थंड होऊ द्या . भात ताटात पसरल्यामुळे सडसडीत मोकळा होतो .
१३. भातात चिरलेली कोथिंबीर , फळांचे काप , सुकामेवा आणि तळलेला कांदा घालून एकजीव करा .
हलवताना भाताची शिते मोडणार नाहीत याची काळजी घ्यावी .
१४. आता हा पुलाव पुन्हा जुन्या फोडणीच्या भांड्यात घाला .
१५. मध्यम गॅसवर तवा ठेवून त्या गरम तव्यावर ते पुलावचे भांडे ३ ते ४ मिनिट ठेवून द्या .
१६. गॅस बंद करा . गर गरम काश्मिरी पुलाव रायता सोबत खायला द्या .
टीप :
१. काश्मिरी पुलाव फळांचे काप आणि मनुके घातल्याने अजिबात तिखट होत नाही. तिखटपणा हवा असल्यास आवडीनुसार हिरवी मिरची वाटून घालावी . .
~ अमृता ..
No comments:
Post a Comment