साहित्य :
१५ ते २० ताजी पुदिन्याची पाने
कोथिंबीर
१ लिंबू
मीठ
साखर
४ पाकळ्या लसूण सोलून
जिरे
१/२ कांदा चिरून
कृती :
१. पुदीना आणि कोथिंबीर पाण्याने धुवून घ्या .
२. लिंबाचा रस काढून घ्या .
३. साहित्यात लिहिलेल्या सगळ्या वस्तू मिक्सरमध्ये घालून बारीक पेस्ट करा .
४. मीठ आणि साखर चवीनुसार वापरा .
टीप :
जास्त प्रमाणात आणि घट्ट चटणी हवी असल्यास मिक्सरमध्ये लावताना १ ब्रेडचा तुकडा घाला .
~ अमृता ..
No comments:
Post a Comment