खरंतर याचं नक्की नाव काय हे मलाही नाही माहीत . शाळेत असताना मी घरच्यांसोबत श्रीक्षेत्र गाणगापूर येथे दर्शनास गेले होते . तिथे पद्धत अशी आहे कि आपण ब्राम्हणाच्या हस्ते नैवेद्य अर्पण करावा लागतो. आणि तो नैवेद्य सोवळ्याने शिजवावा लागतो . त्यामुळे आम्ही ही एका ब्राम्हणाच्या घरी उतरलो . त्यांनी केलेली हि डाळ ..... ही गाणगापुरात खाल्ली म्हणून त्याच नाव गाणगापुरी डाळ :)
आलं लसूण कांद्याशिवाय एखादा पदार्थ चवदार करता येतो हा त्यादिवशी लागलेला शोध
साहित्य
२ वाट्या तूर डाळ कुकरला शिजवून
१ मोठा गुळाचा खडा किसून
मीठ , चिंच
एक लाल मिरची , तेल , जिरे , मोहरी , हळद
कृती
१. तूरडाळ जास्त पाणी घालून ४ शिट्ट्यांवर कुकरमध्ये शिजवून घ्यावी
२. एका भांड्यात फोडणीसाठी तेल गरम करावे. जिरे , मोहरी घालावी.
वाळलेली लाल मिरची घालावी .
३. जिरे , मोहरी तडतडली की शिजवलेली डाळ घालावी
४. हळद, गूळ आणि मीठ घालून एकजीव हलवावी . डाळ करताना रवीने घोटू नये . ती बऱ्यापैकी अखंड राहिली पाहीजे .

५. आंबट गोड चवीची हि डाळ करायला सोपी , कमी जिन्नस लागणारी , झटपट होणारी आणि जिभेचे चोचले पुरवणारी आहे .
~ अमृता ...
No comments:
Post a Comment