साहित्य
२ वाट्या गव्हाचे पीठ , १ मोठा चमचा रवा
कणिकेसाठी पाणी , मीठ , जिरे पावडर , धने पावडर , लाल मिरची पावडर
२ बटाटे उकडून( मध्यम आकार )
१ गाजर उकडून
आले लसूण पेस्ट
कृती :
१. २ उकडलेले बटाटे, १ उकडलेले गाजर किसणीने किसून घ्यावे .
मॅश केल्यास गुठळ्या राहू शकतात आणि पुऱ्या फुटतात म्हणून हे किसणीने किसून घ्यावे .
२. कणिकेसाठी २ वाट्या गव्हाचे पीठ , १ मोठा चमचा रवा ,मीठ , जिरे पावडर , धने पावडर , लाल मिरची पावडर एकत्र करावे .
रवा घातल्यास पुऱ्या खुसखुशीत होतात .
३. त्यात किसलेले मिश्रण घालावे आणि कणिक एकजीव करावी
४. गरज पडल्यास थोडे पाणी घालून घट्ट मळून घ्यावी
५. कणिक १/२ तास भिजत ठेवावी
६. नेहमीप्रमाणे पुऱ्या लाटून तेलात टाळून घ्याव्या
७. लसणाच्या किंवा शेंगदाणा चटणीसोबत छान लागतात . लहान मुलांना लपवून भाजी खाऊ घालण्याच्या यशस्वी प्रयोग :)
~ अमृता ..
No comments:
Post a Comment