होळी रे होळी .... पुरणाची पोळी
होळीनिमित्तची आजची खास पोस्ट .... तेलावरची पुरण पोळी
माझी आई नेहमी म्हणते , ज्या बाईला तेलावरची पुरणपोळी करता आली ती खरी सुगरण . पिठावरची काय कोणालाही लाटता येते . आणि हो ... हे १००% खरं आहे . कारण तेलावरची पोळी लाटताना हात एकतर खूप नाजूक हलवावा लागतो आणि दुसरं म्हणजे जराशी घाई केली कि पोळी फुटलीच म्हणून समजा .
थोडी मोठी वाटेल वाचताना पण जमतील तितके सगळे बारकावे लिहिले आहेत . करताना सगळ्या गोष्टी काळजीपूर्वक अमलात आणा .
१० आकाराच्या मध्यम पोळ्या
वेळ: २0 मिनिटे (पुरण आणि पीठ तयार असल्यास)
साहित्य
१ वाटी हरभरा डाळ (चणा डाळ )
१ वाटी गूळ किसून किंवा बारीक चिरून
२ वाट्या गव्हाचे पीठ
तेल
मीठ
पाणी
वेलदोडे
बडीशेप
पुरणाची कृती
१. हरभरा डाळ स्वच्छ धुवून एका मोठ्या भांड्यात दुपट्ट पाणी घालून शिजत ठेवावी
२. अर्ध्या तासात डाळ पूर्ण शिजते . बोटांवर डाळ दाबून पाहावी .
३. शिजलेल्या डाळीचे पाणी दुसऱ्या भांड्यात ओतून घ्यावे .
४. पाणी बाजूला केलेल्या शिजलेल्या कोरड्या डाळीत किसलेला गूळ , बडीशेप आणि वेलदोडे पूड एकत्र करावी
५ . हे मिश्रण १० मिनिट एकजीव होई तोवर शिजवावे.
६. त्याचा भांड्यात घट्टसर गोळा तयार होईल .
७. मिश्रण थंड आल्यावर पुरण यंत्रातून / मिक्सरमधून पुरण वाटून घ्यावे .
टीप : पुराणात गूळ जास्त झाला तर पोळ्या कडक होतात .
कणकेची कृती
१. २ वाट्या गव्हाचे पीठ , ३ चीनचे तेल , मीठ घालून कणिक मळून घ्यावी .
२. या पोळीसाठी कणिक अगदी सैलसर आणि मऊ मळावी .
३. यासाठी हात ओला करून करून कणिक मुठीने तींबावी.
४, झाकण ठेवून १ तास भिजण्यास ठेवावी .
पोळीची कृती ;
पोळी लाटायला सुरु करण्या आधी चालू गॅसवर तवा पालथा घालून गरम होऊ द्यावा .
१. कणकेचा मध्यम आकाराचा गोळा घेऊन पोळपाटावर २ चमचे तेल घालून एकदा उभा आणि एकदा आडवा लाटून लहान पुरीचा आकार करावा . .
२. पुरणाचा कणकेपेक्षा साधारण मोठा गोळा घेऊन लाटलेल्या कणकेमध्ये घालून गोळा बंद करून घ्यावा .
३. पळपाटावर पुन्हा १ चमचा तेल घालून पोळी लाटून घ्यावी
४ . पोळी लाटताना अजिबात उचलू नये . गरज पडल्यास पोळपाट फिरवावा. लाटणे एकाच दिशेने ( खाली किंवा वर ) फिरवावे. अन्यथा पोळी फुटते .
५. लाटलेली पोळी लाटण्याला गुंडाळून अलगद उचलावी
६. पालथ्या गरम तव्यावर पोळी लाटण्यानेच टाकावी
७ . दोन्ही बाजूस खरपूस भाजून घ्यावी
८ . तूप घालून गरम गरम वाढावी . थंड पोळ्या दूधाबरोबर/ गुळवणी सोबत छान लागतात.
गुलवणी कृती
१. एका पातेल्यात १ पेला पाणी गरम करण्यास ठेवा .
२. त्यात २ मोठे गुळाचे खडे टाका
३. एक उकळी येऊन गुल विरघळेल . मिश्रण थंड होऊ द्या .
४. हि गुळवणी थोडंसं दूध मिक्स करून पोळी सोबत खायला द्यावी
~ अमृता ..

No comments:
Post a Comment