वाढणी १ व्यक्ती
वेळ १५ मिनिटे
साहित्य
२ बनपाव ( पाव भाजीचे ब्रेड )
१ कांदा बारीक चिरून
१/२ टोमॅटो ची प्युरी
१/२ शिमला मिरची बारीक चिरून
लाल तिखट , मीठ , पाव भाजी मसाला
शेव
बटर
कृती
१. प्रथम एका पॅनमध्ये १ चमचा बटर गरम करून घ्यावे .
२. त्यात कापलेला कांदा अर्धा घालून परतावा .
३.कांदा भाजला कि टोमॅटो प्युरी घालून भाजून घ्यावी
४. शिमला मिरची घालून चांगला परतून घ्यावी
५. या मिश्रणात मीठ, लाल तिखट , पाव भाजी मसाला घालावा . ब्रेड च्या आत भरण्यास हे मिश्रण वापरावे .
६. भाजी नववलेल्या पण मध्येच एका बाजूस बटर घालून ब्रेड मधून कापून भाजून घ्यावा .
याच पॅनमध्ये भाजल्याने ब्रेड ला पॅनचा मसाला लागून राहील
७. भाजलेल्या ब्रेड मध्ये भाजी भरून घ्यावी. ब्रेड ला वरूनही भाजी लावून घ्यावी
८. सर्व्ह करताना वरून कच्चा कांदा आणि भरपूर शेव घालावी .
~ अमृता ...
No comments:
Post a Comment